Anjali Damania To The Point Interview: झी 24 तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाची जिल्हाधिका-यांना पूर्ण कल्पना होती असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय
Anjali Damania To The Point Interview: झी 24 तासने बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाची जिल्हाधिका-यांना पूर्वकल्पना होती असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे.
टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत दमानियांनी पुण्याच्या जिल्हाधिका-यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिका-यांची भूमिका संशयास्पद आहे. जिल्हाधिका-यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. अमेडिया कंपनीनं जमीन व्यवहार मे महिन्यात केल्यानंतर जून महिन्यानंतर बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियावर जमीन रिकामी करण्यासाठी दबाव आणला होता. या संदर्भात बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियानं एक पत्रही जिल्हाधिका-यांना लिहिलं होतं. त्यावर जिल्हाधिका-यांनी संबंधित प्रांत आणि तहसीलदारांना याबाबत सूचना दिल्याचा दावाही दमानियांनी केला आहे. जिल्हाधिका-यांनी जाणिवपूर्वक या प्रकरणाकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. पुण्याच्या जिल्हाधिका-यांना निलंबित करण्यात यावं किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे. बोटॅनकिल गार्डन्सने 16 जून 2025 रोजी तात्काळ मध्यस्थी करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. ही केद्रांची एजन्सी असताना. काही माणसांनी त्रास दिला असून, जागा खाली करण्याची धमकी दिली आहे असं त्यांनी सांगितलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी हे गांभीर्याने घ्यायला हवं होतं. जिल्हाधिकारी एसजीओना पत्र लिहून चौकशी करत अभिप्राय देण्याची मागणी करतात. म्हणजे यांना माहिती नाही असं होईल का. एसजीओनी तहसीलदारांना पत्र लिहिलं. 14 जुलैला ते उत्तर देतात. सगळ्या पत्रात तात्काळ कारवाई, 24 तासात अभिप्राय असे उल्लेख आहेत. सिंचन घोटाळ्याप्रमाणे प्रत्येक कागदपत्रात शब्द वापरले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली नसल्याने त्यांना आधी निलंबित करायला हवं, असं अंजली दमानियांनी म्हटलं आहे. पार्थप्रकरणी दमानिया खरगे समितीची भेट घेणारकोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशाराही अंजली दमानियांनी दिला आहे. जमीन गैरव्यवहाराचा तपास करणा-या खरगे समितीसमोर आपण अमेडिया आणि पार्थ पवार कसे या प्रकरणात थेट सहभागी असल्याचे पुरावे देणार असल्याचं त्या म्हणाल्या. खरगे समितीनं म्हणणं ऐकून घेतलं नाहीतर या प्रकरणी आपण थेट कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेडिया कंपनीचे खरे मालक पार्थ पवारच असून जमीन गैरव्यवहारात त्यांची थेट सही नसली तरी त्यांची भूमिका महत्वाची असल्याचं अंजली दमानियांनी सांगितलं आहे.
Parth Pawar Pune Land Deal Pune Parth Pawar Land Deal Pune Koregaon Park Land Deal
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Japan Earthquake issued Tsunami warning: ভয়ংকর ভূকম্পন, তীব্র আতঙ্ক! স্তব্ধ জনজীবনে জারি সুনামির সতর্কতা... উত্তাল সমুদ্র ফিরিয়ে দিচ্ছে দুঃস্বপ্নের স্মৃতি...Japan issues tsunami advisory after six point two six magnitude earthquake
Read more »
'तुम्हाला मोदी-शाहदेखील वाचवू शकणार नाहीत', अंजली दमानियांचा अजित पवारांना इशाराAnjali Damania On Ajit Pawar: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यातील पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Read more »
पार्थ यांना हा व्यवहार रद्द करता येणार नाही! अंजली दमानियांनी सांगितलं कारण; अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणीAnjali Damania On Koregaon Park Land Deal: अंजली दमानिया यांनी काल महसुल मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज या व्यवहारासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा व्यवहार दोन्ही पक्षांनी ठरवून रद्द करता येणार नसल्याचं म्हटलं.
Read more »
UPSC Interview Questions: वह कौन सी चीज है, जो पूरे महीने में एक बार आती है और 24 घंटे पूरे होने पर चली जाती है?UPSC Interview Questions: वह कौन सी चीज है, जो पूरे महीने में एक बार आती है और 24 घंटे पूरे होने पर चली जाती है? यूपीएससी में पूछे गए इस सवाल का जवाब आज आपको बताते हैं.
Read more »
SSC: BIG UPDATE: যোগ্যদের মধ্যে কতজন ডাক পাচ্ছেন... শনিবারই ইন্টারভিউয়ের তালিকা প্রকাশ করবে SSC!SSC Teacher Recruitment: BIG UPDATE SSC will publish list of eligible candidates for interview on Saturday
Read more »
अजित पवारांनी बिल्डरच्या पैशातून खरेदी केला जरंडेश्वर कारखाना; अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, 'खात्यातून 44 कोटी...'Anjali Damania Allegation on Ajit Pawar: जरंडेश्वर प्रकरणात अंजली दमानियांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. कारखाना खरेदीसाठी बिल्डरचा पैसा आला असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. ओंकार बिल्डरच्या खात्यातून 44 कोटी आले असं त्यांनी सांगितलं आहे.
Read more »
