Anjali Damania On Koregaon Park Land Deal: अंजली दमानिया यांनी काल महसुल मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज या व्यवहारासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा व्यवहार दोन्ही पक्षांनी ठरवून रद्द करता येणार नसल्याचं म्हटलं.
Anjali Damania On Koregaon Park Land Deal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली. पार्थ पवार यांच्या कंपनीच्या माध्यमातून झालेल्या जमीन व्यवहार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी असं वाटत असल्यास अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
यावेळेस दमानिया यांनी कायद्यामधील तरतुदीवर बोट ठेवत हा व्यवहार दोन्ही पक्षकांरांना असा रद्द करता येणार नाही असंही म्हटलं. सरकारने न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन हा व्यवहार रद्द करुन घेण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या. चौकशी निष्पक्ष कशी होईल?अमेडिया कंपनीबाबत पुणे जमीन प्रकरणातील महत्वाचे खुलासे मी करत आहे, असं दमानिया यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यास सुरुवात करताना म्हटलं. पुढे बोलताना, चौकशी समितीत सदस्य हे पुण्याचेच आहेत. चौकशी निष्पक्ष कशी होईल? असा सवाल उपस्थित केला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी दमानिया यांनी केला आहे. शितल तेजवानीवर कोणतीही कारवाई न करणा-या कलेक्टरवरही कारवाई व्हावी, असं दमानिया यांनी म्हटलंय. पार्थ पवारांना हा व्यवहार रद्द करता येणार नाहीहा व्यवहार आता सरकारनं सिव्हील कोर्टात दावा केल्यानंतरच रद्द होईल. सरकारला प्रक्रीयेनुसार व्यवहार रद्द करता येईल. पार्थ पवार, शितल तेजवानी, अमेडीया कंपनी हा व्यवहार रद्द करु शकत नाहीत, असं दमानिया म्हणाल्या. ज्यानं घोटाळा केलाय त्याला व्यवहार रद्द करण्याचा अधिकार नाही, असंही त्या म्हणाल्या....तर फक्त दिग्विजय पाटील जबाबदारपार्थ पवारनं जर असं सिद्ध केलं की या व्यवहाराबद्दल मला काही माहितीच नव्हतं तरच केवळ दिग्विजय पाटीलला जबाबदार धरलं जाऊ शकतं. मात्र, डॉक्युमेंटवर पार्थ पवारांची सही आहे, असं दामनियांनी म्हटलं आहे. अशा प्रकरणांमध्ये काय शिक्षा असते याबद्दल बोलताना दमानिया यांनी, सरकारी जमीन जर अशाप्रकारे कुणी ताब्यात घेत असेल तर 7 ते 14 वर्षे शिक्षा आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे, असं स्पष्ट केलं.बानकुळेंनाही सांगितलं की...मंगळवारी दामनिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या मला समिती पुढे सामान्य नागरिक म्हणून ठेवायच्या आहेत असं मी त्यांना सांगितलं. हे लँड माफिया कशा पद्धतीने स्कॅम करतात हे मला सांगायचं आहे. अनेक लोकांनी दिलेल्या पेपर मी आज बावनकुळे यांना दाखवले. 1930 सालचे सातबारा दिले, असं या भेटीनंतर दामनिया म्हणाल्या. तसेच, आताच्या घटकेला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की सरकारने 42 कोटी रुपये देऊन तो व्यवहार रद्द करण्याबाबत नोटीस काढली तीच मुळात चुकीची आहे. व्यवहार रद्द करण्याचा अधिकार महसूल विभागकडे नाही. हा व्यवहार रद्द आणि विषय संपला असं बिलकुल नाही, असंही दामनियांनी सांगितलेलं.
Land Deal Parth Pawar Case Anjali Damania Demand Resignation Ajit Pawar
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Pune Koregaon Park Land Deal: '...तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का?', अंबादास दानवेंचा अजित पवारांना थेट सवालPune Koregaon Park Land Deal: चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का? , अंबादास दानवेंचा अजित पवारांना थेट सवाल
Read more »
Pune Land Row: Ajit Pawar Cancels Son’s Firm’s Deal; Orders Probe Amid Rs 300-Crore ControversyThe decision comes amid mounting political pressure and demands for his resignation over a ₹300-crore land transaction involving 40 acres of government land in Pune’s upscale Mundhwa-Koregaon Park area.
Read more »
'पार्थवर गुन्हा...' मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरेगाव जमीन गैरव्यवहारावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रियाKoregaon Park Land Controversy : आताच्या क्षणाची मोठी बातमी. पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि गुन्ह्याची नोंद यासंदर्भात शरद पवार यांचं सूचक वक्तव्य... पाहा काय म्हणाले...
Read more »
'पोरगं बापावर गेलंय', ठाकरे सेनेचा निशाणा! 'कोणत्या काबाडकष्टातून पार्थने 300 कोटी...'Pune Koregaon Park Land Deal: रविवारी सकाळी घरातला पोरगा पिशवी घेऊन मटण आणायला निघाला तरी ‘एक किलो आणू की दीड किलो’ यावर बापाशी चर्चा करतो, असा उल्लेख लेखात आहे.
Read more »
Pune Land Scam : मोठी बातमी! शीतल तेजवाणीच्या घरातून काही महत्त्वाचे पुरावे हाती; देशातच...Pune Koregaon Park Land Deal: झी 24 तास उघड केलेला पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन घोटाळ्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांना महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
Read more »
'तुम्हाला मोदी-शाहदेखील वाचवू शकणार नाहीत', अंजली दमानियांचा अजित पवारांना इशाराAnjali Damania On Ajit Pawar: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यातील पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Read more »
