Maharashtra Weather News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा उकाडा सुरू झाला असून थंडी ओसरू लागल्याचे चिन्हे आहेत. आजचा हवामानाचा अंदाज काय सांगतो?
Maharashtra Weather News: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची लाट जाणवू लागली होती. मात्र त्यानंतर थंडी हळूहळू ओसरु लागली आहे. कमाल तापमानातदेखील वाढ होत आहे. त्यामुळं राज्यात थंडी ओसरली का? असा सवाल नागरिकांना पडला आहे.
राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 15 अंशाच्या वर गेला आहे. त्यामुळं हुडहुडी गायब झाली आहे. दुपारच्या वेळेस तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. तसंच, वाढलेला उकाडा हा रात्री उशिरापर्यंत कायम राहत आहे. श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ही प्रणाली उद्यापर्यंत तामिळनाडू आणि पदुच्चेरीकडे येण्याची शक्यता आहे. तसंच, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सेनयार चक्रीवादळ निर्माण झाले आहे. सध्या उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले आहेत. त्यामुळं मागील आठवड्यातील तापमान 23 अंशावर गेले होते. आताही उकाड्यात वाढ झाली असून कमाल तापमान 35 अंशापर्यंत गेले आहे.राज्यातील ढगाळ हवामान हळूहळू निवळत असल्याचे समोर येत आहे. आज किमान तापमानात दोन ते तीन अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम असून उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. FAQ1) राज्यात थंडी ओसरली आहे का?होय, नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाणवलेली थंडी हळूहळू ओसरली आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा १५ अंशांच्या वर गेला आहे.2) दिवसा आणि रात्री हवामान कसे आहे?दुपारच्या वेळेस तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. तसेच, वाढलेला उकाडा रात्री उशिरापर्यंत कायम राहत आहे.3) बंगालच्या उपसागरात कोणती हवामान प्रणाली सक्रिय आहे?श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात सेनयार नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
Heatwave Temperature Rise Vidarbha Cold Partly Cloudy Skies Hot Day Meteorological Update Summer Forecast Weather Alert Temperature Drop Maharashtra Weather News Maharashtra News Weather Today At My Location हवामान आजचे हवामान
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सावध व्हा! वादळी वाऱ्यांमुळं महाराष्ट्रात ‘इथं’ कोसळधार...; एका क्षणात बदलणार हवामान, काही समजायच्या आतच...Maharashtra Weather News : मान्सून वाऱ्यांनी देशाकडे पाठ फिरवली असली तरीही कमी दाबाच्या पट्ट्यानं आता महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती केली आहे.
Read more »
मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार; राज्यातील 'या' भागात विजांसह कोसळणार पाऊसMaharashtra Weather News Today: आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे.
Read more »
नुसतं धुकं अन् गारठा... पुणे, महाबळेश्वरहून अधिक थंड महाराष्ट्रातील हा भाग; किमान तापमानाचा आकडा हुडहूडी भरवणाराMaharashtra weather news : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, आता राज्याच्या कोणत्या भागामध्ये आहे किमान तापमान? जाणून घ्या...
Read more »
राज्यात कुठं पडलीये कडाक्याची थंडी? हिवाळ्याची भक्कम पकड असतानाही कुठे असेल पावसाची हजेरी?Maharashtra weather news : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राजच्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असली तरीही...
Read more »
बिनधास्त आखा हिवाळी सहलीचे बेत... आठवड्याअखेर राज्यात हुडहूडी! उत्तरेकडे हिमवर्षावाचा कहर!Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असली तरीही मुंबई शहर आणि उपनगर मात्र इथं अपवाद ठरत आहे.
Read more »
Maharashtra Weather News : ऐन थंडीत नवं संकट; महाराष्ट्राच्या ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशाराMaharashtra Weather News : फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या 4 राज्यांमध्ये आयएमडीकडून पावसाचा इशारा. कुठे बाळगावी अधिक सावधगिरी?
Read more »
