राज्यात कुठं पडलीये कडाक्याची थंडी? हिवाळ्याची भक्कम पकड असतानाही कुठे असेल पावसाची हजेरी?

Maharashtra Weather News News

राज्यात कुठं पडलीये कडाक्याची थंडी? हिवाळ्याची भक्कम पकड असतानाही कुठे असेल पावसाची हजेरी?
WinterMaharashtra Weather 11 November 2025Weather Forecast
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 134 sec. here
  • 50 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 218%
  • Publisher: 63%

Maharashtra weather news : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राजच्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असली तरीही...

Maharashtra weather news : नोव्हेंबर महिन्यामध्ये अखेर महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये हिवाळ्यानं जोर धरल्याचं पाहायला मिळालं. राजस्थान, मध्य प्रदेशापासून अगदी जम्मू काश्मीर आणि हिमाचल, उत्तराखंडमध्येही थंडीचा कडाका वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे.

मध्य भारतापासून उत्र भारत आणि उत्तर पूर्व भारतामध्ये वाढणारा थंडीचा कडाका महाराष्ट्रावरही परिणाम करताना दिसत आहे. जिथं, राज्यातील उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानाच्या किमान आकड्यात आणखी घट होईल असं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट झाली असून, पुढील 24 तासांमध्ये हवामान कोरडं राहील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, निफाड, धुळे इथं गारठा वाढला असून, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी धुक्याची दाट चादर असल्यामुळं इथंसुद्धा झोंबणाऱ्या थंडीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई आणि नवी मुंबईसह शहरातील उपनगरीय भागांमध्येसुद्धा गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. तुलनेनं दक्षिण महाराष्ट्र आणि एकंदर दक्षिण भारत मात्र इथं अपवाद ठरताना दिसत आहे, जिथं तापमानात चढ- उतार पाहायला मिळत आहेत.राज्यात एकिकडे हिवाळा दर दिवसागणिक जोर धरताना दिसत असल्यामुळं अनेकांनी आतापासूनच हिवाळी सहलींचे बेत आखण्यास सुरुवात केली असून, येत्या काळात थंडीचे हे दिवस सातत्यानं असेच राहणार असून, त्यात तापमानात आणखी घट अपेक्षित असल्यानं राज्यातील गिरीस्थानांकडेही अनेकांची पावलं वळताना दिसत आहेत. तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुणे - 29.4/ 13.4धुळे- 30.0/ 8.0 कोल्हापूर - 28.7/ 16.9महाबळेश्वर- 25.3/ 12.5नाशिक- 29.4/ 10.7 मुंबई - 32.0/ 18.4 Minimum Temperature: No large change in minimum temperature over northern parts of Maharashtra region and gradual rise over southern parts of the state during next 5 days.तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/7N3D4BxWgs— Regional Meteorological Center,Mumbai November 11, 2025देशभरातही थंडीचा कहर... पाहा प्राथमिक अंदाज.... केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या प्राथमिक माहितीनुसार तामिळनाडू, केरळ आणि माहे इथं पुढील 24 तासांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव सुरू राहिल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचलच्या स्पितीचं खोरं आणि मनालीमध्ये जोरदार हिमवृष्टी अपेक्षित असून उत्तराखंडमध्ये प्रामुख्यानं चमोली, नैनीताल, मसूरी इथं शीतलहर आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. FAQनोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात हवामान कसं आहे?नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात हिवाळा जोर धरत असून, राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तापमानाच्या किमान आकड्यात 2 ते 3 अंशांची घट झाली आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज काय?पुढील 24 तासांमध्ये हवामान कोरडं राहील असा प्राथमिक अंदाज आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून, उत्तरेकडील भागांमध्ये तापमानात आणखी घट अपेक्षित आहे.देशभरात थंडीचा कडाका कसा आहे?देशाच्या बहुतांश भागांमध्ये हिवाळा जोर धरला असून, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये थंडी वाढत आहे. उत्तर भारत आणि उत्तर पूर्व भारतात शीतलहर तीव्र होत असून, महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम दिसत आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Winter Maharashtra Weather 11 November 2025 Weather Forecast Todays Weather Weather Forecast Latest News In Marathi Weather Forecast News In Marathi News On Weather Forecast In Marathi Maharashtra Rain Updates Mumbai Rain October Heat Konkan Weather News Weather In My Area Cyclone Rain Strong Wind Haistorm Mumbai Temprature Unseasonal Rain Hailstorm Cold Wave Winter Vibes Maharashtra Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Mumbai Rains Weather At My Location Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग आयएमडी

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोदवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे.
Read more »

Maharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंताMaharashtra Weather News : उन्हामुळं सर्वत्र रखरखाट, समुद्रावरून वाहू लागले उष्ण वारे; आठवडाअखेरीस हवामानानं वाढवली चिंताMaharashtra Weather News : राज्यात सूर्याचं कोपणं सुरु असतानाच आता किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण, मध्येच उष्ण वाऱ्यांनी वाढवली अडचण. पाहा हवामान वृत्त...
Read more »

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; धुळीच्या वादळाचाही इशारा... हवामान आणखी किती धडकी भरवणार?महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; धुळीच्या वादळाचाही इशारा... हवामान आणखी किती धडकी भरवणार?Maharashtra Weather News : फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »

हुश्श! अखेर पावसाचा जोर ओसरला; ही विश्रांती क्षणिक की वादळापूर्वीची शांतता?हुश्श! अखेर पावसाचा जोर ओसरला; ही विश्रांती क्षणिक की वादळापूर्वीची शांतता?Maharashtra Weather News : जवळपास संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये पावसानं सबंध महाराष्ट्रात थैमान घातल्याचं पाहायला मिळालं.
Read more »

राज्यातला पाऊस थांबणार कधी? अखेर हवामान विभागाने सांगितली तारीखराज्यातला पाऊस थांबणार कधी? अखेर हवामान विभागाने सांगितली तारीखMaharashtra Weather News: महाराष्ट्रात धुमाकुळ घातलेला पाऊस माघार कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
Read more »

मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार; राज्यातील 'या' भागात विजांसह कोसळणार पाऊसमुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार; राज्यातील 'या' भागात विजांसह कोसळणार पाऊसMaharashtra Weather News Today: आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:00:47