राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, आजपासून मुसळधार पावसाचा इशारा, 'या' 4 जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Today News

राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, आजपासून मुसळधार पावसाचा इशारा, 'या' 4 जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra News TodayWeather UpdateMaharashtra Weather Forecast
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 95 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather Today: महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट तर चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कसं असेल आजचं हवामान जाणून घ्या.

Maharashtra Weather Today : महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट तर चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कसं असेल आजचं हवामान जाणून घ्या.महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतायेत.

गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला आहे. तसंच, पाऊस पडून गेल्यानंतर उकाडादेखील वाढला आहे. पावसात अवकाळी पावसामुळं शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसंच हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4-5 दिवस अवकाळी पाऊस होणार आहे. अनेक जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या या स्थितीमुळं महाराष्ट्रातदेखील मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यावेळी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील 2 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी पुढील चार पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी काही भागांत गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूरला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.भविष्य

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra News Today Weather Update Maharashtra Weather Forecast Weather Today Maharashtra Weather Update In Marathi आजचे हवामान Weather Today At My Location Weather Update

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

कुठे उन्हाची काहिली तर कुठे पावसाचा इशारा; आज महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? वाचा IMD चा इशाराकुठे उन्हाची काहिली तर कुठे पावसाचा इशारा; आज महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? वाचा IMD चा इशाराMaharashtra Weather Update: कुठे उन तर कुठे उन्हाची काहिली असा अजब खेळ सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय.
Read more »

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'या' जिल्ह्यांत तापमान आणखी वाढणार, तीन दिवस महत्त्वाचेराज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'या' जिल्ह्यांत तापमान आणखी वाढणार, तीन दिवस महत्त्वाचेMaharashtra Weather Update: एप्रिल महिन्याला सुरवात होताच तापमानाने उच्चांक गाठायला सुरवात केली आहे. राज्यात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read more »

राज्यात ऊन-पावसाचा खेळ! 'या' जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा, तर काही भागात तापमान उष्णतेची लाटराज्यात ऊन-पावसाचा खेळ! 'या' जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा, तर काही भागात तापमान उष्णतेची लाटMaharashtra Weather Today: यंदा एप्रिलमध्येच सूर्याने रौद्र रूप धारण केल्याचे चित्र आहे. मात्र काही ठिकाणी उन्हाची काहिली असतानाच काही भागात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Read more »

लख्ख सूर्यप्रकाश नाहीसा होणार; काळ्या ढगांची दाटी होत राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारालख्ख सूर्यप्रकाश नाहीसा होणार; काळ्या ढगांची दाटी होत राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशाराMaharashtra Weather News : जे सांगितलं तेच होतंय...; राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा मारा, कुठे दिसणार सर्वाधिक प्रभाव? तुमच्या जिल्ह्यात आणि शहरात हवामानाची काय स्थिती?
Read more »

पुढील 24 तासांमध्ये थैमान! स्टेटसमध्ये फोटो पोस्ट करताय तो हा मान्सून नाही; या वादळी पावसाला म्हणायचं तरी काय?पुढील 24 तासांमध्ये थैमान! स्टेटसमध्ये फोटो पोस्ट करताय तो हा मान्सून नाही; या वादळी पावसाला म्हणायचं तरी काय?Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढील 24 तासांत वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Read more »

चक्रीवादळाचे संकेत पाहता मुंबई, रायगडसह 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; काळेकुट्ट ढग दाटून येणार आणि...चक्रीवादळाचे संकेत पाहता मुंबई, रायगडसह 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; काळेकुट्ट ढग दाटून येणार आणि...Maharashtra Weather News : हवामानाचा चिंता वाढवणारा इशारा. दुपारनंतर अचानकच होणार मोठे बदल... हा कोणत्या भागामध्ये संभाव्य संकटाचा इशारा?
Read more »



Render Time: 2026-04-02 07:48:36