Maharashtra Weather Today: यंदा एप्रिलमध्येच सूर्याने रौद्र रूप धारण केल्याचे चित्र आहे. मात्र काही ठिकाणी उन्हाची काहिली असतानाच काही भागात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Today: यंदा एप्रिलमध्येच सूर्याने रौद्र रूप धारण केल्याचे चित्र आहे. मात्र काही ठिकाणी उन्हाची काहिली असतानाच काही भागात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असतानाच महाराष्ट्रातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज ढगांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळं या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणपासून ते तामिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं राज्यात एकीकडे उन्हाची काहिली वाढली आहे. चर तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर गारांचा पाऊसदेखील झाला. विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात जालना, बीड, परभणी, हिंगोली येथे उष्ण हवामानाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.बीड जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून तापमानाचा पारा 43 डिग्री सेल्सिअसवर गेल्याने नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले होते. एकीकडे पाण्याचा तीव्र दुष्काळ असताना, दुसरीकडे तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळत आहे. मात्र याच उष्णतेचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना जोरदार पावसाने दिलासा दिला आहे. बीडच्या केज परिसरात सुसाट वाऱ्यासह अर्धा तास झालेल्या पावसाने नागरिकांना प्रचंड उकाड्यापासून तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा आणि ज्वारी बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यात आंब्याचा अक्षरशः सडा पाहायला मिळाला. पहिल्यांदाच आंब्याचे उत्पन्न चांगले झाले होते. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात आंबा पिक जमीनदोस्त झाला आहे.मुंबई बातम्या
Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Rain Unseasonal Rain Hailstorm Cold Wave Winter Vibes Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र Weather Today At My Location
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Weather Update : कोकणात यलो अलर्ट, तर काही भागात विजांसह पावसाची शक्यता; एप्रिल महिना नेमका कसा?Maharashtra Weather Update : गुढीपाडव्याला कसं असेल महाराष्ट्रातील वातावरण?
Read more »
राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; भर उन्हात 'हे' काय?एप्रिल महिन्यात उकाड्यासोबत अवकाळी पावसाचा स्थिती निर्माण झाली आहे. असं असताना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Read more »
राज्यात दोन दिवस अवकाळी पावसाचा IMD चा इशारा; अनेक भागात गारपीटMaharashtra Weather Alert : हवामान खात्याने महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला होता. आज महाराष्ट्रातील अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने सोमवारीही या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
Read more »
कुठे उन्हाची काहिली तर कुठे पावसाचा इशारा; आज महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? वाचा IMD चा इशाराMaharashtra Weather Update: कुठे उन तर कुठे उन्हाची काहिली असा अजब खेळ सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय.
Read more »
राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'या' जिल्ह्यांत तापमान आणखी वाढणार, तीन दिवस महत्त्वाचेMaharashtra Weather Update: एप्रिल महिन्याला सुरवात होताच तापमानाने उच्चांक गाठायला सुरवात केली आहे. राज्यात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read more »
घराबाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात उष्णतेचा प्रकोप, 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणारMaharashtra Weather Today: विदर्भात उष्णतेचा प्रकोप सुरूच असून उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका वाढणार आहे. कसे असेल आजचे हवामान
Read more »
