Shops Open in Maharashtra: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यात आता दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार वगळून इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू राहणार आहेत.
Shops Open in Maharashtra: महाराष्ट्र ातील नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यात आता दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार वगळून इतर सर्व आस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू राहणार आहेत.
राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जारी करण्यात आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाने दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांवरील वेळेचे निर्बंध कायम ठेवताना इतर आस्थापना 24 तास खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून होणाऱ्या अनावश्यक अडथळ्यांवर उपाययोजना होईल.मद्य विक्री आस्थापनांवर निर्बंध19 डिसेंबर 2017 च्या अधिसूचनेनुसार, परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि मद्य विक्री करणारी दुकाने यांच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. ३१ जानेवारी 2020 च्या सुधारित अधिसूचनेने थिएटर आणि सिनेमागृहांना यातून वगळले, परंतु मद्य विक्रीशी संबंधित आस्थापनांवरील वेळेचे बंधन कायम आहे. त्यामुळे या आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार नाहीत.24 तास व्यवसायाला मुभाअधिनियमाच्या कलम 16 नुसार, मद्य विक्री वगळता इतर आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस 24 तास सुरू ठेवता येतील, परंतु कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला सलग 24 तासांची साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, दुकाने, व्यापारी संकुले यांना व्यवसायाच्या संधी वाढतील.तक्रारींची दखलस्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मद्यविक्री नसलेल्या आस्थापनांना २४ तास चालवण्यास अडथळे निर्माण केल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. लोकप्रतिनिधींनीही याबाबत आवाज उठवला होता. या तक्रारींची दखल घेत शासनाने अधिनियमाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.FAQप्रश्न: महाराष्ट्र शासनाच्या नव्या अधिसूचनेनुसार कोणत्या आस्थापना २४ तास सुरू ठेवता येतील?उत्तर: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ च्या कलम १६ अंतर्गत, मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांवगळता इतर सर्व आस्थापना, जसे की रेस्टॉरंट्स, दुकाने आणि व्यापारी संकुले, आठवड्याचे सर्व दिवस २४ तास सुरू ठेवता येतील. मात्र, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून सलग २४ तासांची सुटी देणे बंधनकारक आहे.प्रश्न: मद्य विक्रीशी संबंधित आस्थापनांवर कोणते निर्बंध आहेत?उत्तर: १९ डिसेंबर २०१७ आणि ३१ जानेवारी २०२० च्या अधिसूचनांनुसार, परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि मद्य विक्री करणारी दुकाने यांच्या उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा शासनाने निश्चित केल्या आहेत. त्यामुळे या आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार नाहीत.प्रश्न: शासनाने हा निर्णय का घेतला आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल?उत्तर: स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मद्यविक्री नसलेल्या आस्थापनांना २४ तास चालवण्यास अडथळे निर्माण झाल्याच्या तक्रारी आणि लोकप्रतिनिधींच्या निवेदनांमुळे शासनाने हा निर्णय घेतला. अधिनियमाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आले आहेत. हा निर्णय www.maharashtra.gov.in वर उपलब्ध असून, डिजिटल स्वाक्षरीसह जारी करण्यात आला आहे.
Hotels Open Rules Maharashtra Shop Rules State Governments Big Decision महाराष्ट्र दुकाने हॉटेल्स राज्य सरकार दारुची दुकाने बियर शॉप Zee 24 Taas
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
रस्सी से गला घोंटा, होश आने पर दो चाकूओं से काटी गर्दन, फिर लगाई आग... अंशिका मर्डर केस में फौजी का कबूलनामाHimachal Crime: हिमाचाल के ऊना जिले में 24 वर्षीय अंशिका मर्डर केस में चौंकाने वाले खुलासे हुए। ये खुलासे किसी और ने नहीं खुद हत्या करने वाले फौजी ने किए हैं।
Read more »
भारतीय सिनेमा की 'मनहूस' फिल्म: 24 साल में बनी, एक्टर्स और डायरेक्टर की जान लीयह एक ऐसी फिल्म की कहानी है जिसे भारतीय सिनेमा की सबसे 'मनहूस' फिल्म माना जाता है। 24 साल में बनी इस फिल्म ने दो एक्टर्स और डायरेक्टर की जान ले ली। फिल्म 'लव एंड गॉड' के बनने के दौरान कई हादसे हुए, जिससे इसे मनहूस कहा गया। यह लैला-मजनू की कहानी पर आधारित थी, जिसमें निम्मी और संजीव कुमार लीड रोल में थे।
Read more »
मध्य प्रदेश में 24 IAS अफसरों का तबादला, 12 जिलों के बदले गए कलेक्टरमध्य प्रदेश सरकार ने 24 IAS अधिकारियों का तबादला किया है, जिसमें 12 जिलों के कलेक्टर भी शामिल हैं। भिंड के कलेक्टर संजीव श्रीवास्तव को अवैध रेत खनन को लेकर विधायक से विवाद के कारण हटाया गया, जबकि डिंडौरी की कलेक्टर नेहा मारव्या को भी बदला गया। कई अधिकारियों को नई जिम्मेदारियां दी गई हैं, जबकि कुछ को उनके विवादों के कारण हटाया गया है।
Read more »
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच..., वाचा 24 कॅरेटचा भावGold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज किती आहे दर जाणून घेऊयात.
Read more »
સુહાગરાતના ગણતરીના કલાકોમાં 75 વર્ષના વૃદ્ધને મોત આંબી ગયું, 24 કલાક પહેલા થયા હતા બીજા લગ્નJaunpur News:યુપીના જૌનપુર જિલ્લાથી અત્યંત ચોંકાવનારો મામલો સામે આવ્યો છે. લગ્નના ગણતરીના કલાકોમાં જ દુલ્હેરાજાને મોત આંબી ગયું.
Read more »
यूपी में गौतमबुद्ध नगर पुलिस कमिश्नरेट ने दूसरा स्थान हासिल किया, जानिए कौन सी रिपोर्ट जारी हुईGautam Buddha Nagar Police Commissionerate: गौतमबुद्ध नगर ने यूपी-112 रिस्पांस टाइम रिपोर्ट में दूसरा स्थान हासिल किया है। सितंबर में इस कमिश्नरेट का औसत प्रतिक्रिया समय 3 मिनट 24 सेकेंड रहा।
Read more »
