Abu Azmi on Marathi: भिवंडीत मराठीची गरज काय? अबू आझमींचा सवाल, म्हणाले 'हिंदीतच बोलणार, कशाला...'

Abu Azmi News

Abu Azmi on Marathi: भिवंडीत मराठीची गरज काय? अबू आझमींचा सवाल, म्हणाले 'हिंदीतच बोलणार, कशाला...'
MarathiHindiBhiwandi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 106 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Abu Azmi on Marathi: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भिवंडीत मराठीची गरज काय? असं विधान त्यांनी केलं आहे.

Abu Azmi on Marathi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी ते आले होते. यावेळी अबू आझमी यांनी हिंदी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मात्र मराठीत प्रतिक्रिया देण्यासाठी नकार देत त्यांनी भिवंडीत मराठीची गरज काय? असा प्रतिप्रश्न केला. अबू आझमींच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय.महाराष्ट्रात राहणा-या परप्रांतीयांचं हिंदीप्रेम काही केल्या कमी होत नाही. आता सपा नेते अबू आझमींना हिंदीचा पुळका आला आहे. अबू आझमी भिवंडीच्या दौ-यावर असताना त्यांनाही अशीच हिंदीप्रेमाची उबळ आली. भिवंडीत आहे म्हणजे हिंदी बोलणार असं अबू आझमींनी सांगून टाकलं. भिवंडीत मराठी कशाला बोलायचं असा प्रतिप्रश्नच त्यांनी उपस्थित केला.अबू आझमींच्या हिंदीप्रेमावर मनसेनं कडाडून टीका केली आहे. अबू आझमी चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचा टोलाही मनसेनं लगावला आहे. अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याचा भाजपनं निषेध केला आहे. महाराष्ट्रात मराठीतच बोलावं लागेल असं भाजपनं ठणकावून सांगितलं आहे.अबू आझमींनी मराठीविरोधात त्यांच्या मनात किती द्वेष आहे हा द्वेषच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण हा त्यांचा प्रयत्न मराठी माणसाला चिथावणी देणारा तर नाही ना असा संशय घेण्यासाठीही जागा निर्माण झाली आहे.FAQ1) अबू आझमींच्या भिवंडीतील विधानाचा वाद काय आहे?समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू कासीम आझमी हे ३० सप्टेंबर २०२५ रोजी भिवंडी महानगरपालिकेत कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेले होते. तेथे मराठी माध्यमांनी मराठीत प्रश्न विचारल्यावर त्यांनी हिंदीत उत्तर देत, मराठीची गरज काय? हे भिवंडी आहे. हे उत्तर जर दिल्ली किंवा उत्तर प्रदेशात गेला तर कोण समजेल? मराठी आणि हिंदीत काय फरक आहे? मी मराठी बोलू शकतो, पण गरज काय? असे वादग्रस्त विधान केले. यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सन्मानाबाबत नवा वाद पेटला आहे.2) अबू आझमींचे नेमके विधान काय होते?मराठी पत्रकारांनी मराठीत बोलण्याची विनंती केल्यावर आझमी म्हणाले, मराठी ही फक्त महाराष्ट्रापर्यंत जाईल. मी हिंदीत बोललो तर माझे म्हणणे पूर्ण देशापर्यंत पोहोचेल. त्यांनी मराठी बोलण्यास नकार देत भिवंडीला वेगळे संबोधले.3) मनसेने काय प्रतिक्रिया दिली?मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांनी तीव्र शब्दांत म्हटले, अबू आझमी, तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करता. मग उत्तर प्रदेशच्या भैय्यांची काळजी घेताना महाराष्ट्रात हिंदी का? भिवंडी महाराष्ट्रात आहे, इथे फक्त मराठी चालेल. मराठी बोलायला लाज वाटत असेल तर मनसे स्टाइलमध्ये उत्तर देऊ. यातून मनसेकडून धमकीचा इशारा देण्यात आला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi Hindi Bhiwandi

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

चाल शेकी शेकी...मराठी गाने पर छोटी सी बच्ची ने किया बिंदास डांस, स्टेप्स में बड़े-बड़ों को दी टक्कर; देख लिया तो भूल नहीं पाएंगे VIDEOचाल शेकी शेकी...मराठी गाने पर छोटी सी बच्ची ने किया बिंदास डांस, स्टेप्स में बड़े-बड़ों को दी टक्कर; देख लिया तो भूल नहीं पाएंगे VIDEOLittle Girl Marathi Dance: छोटे-छोटे बच्चे ऐसे परफॉर्मर निकलते हैं कि बड़े-बड़ों की हवा टाइट कर Watch video on ZeeNews Hindi
Read more »

मुंबईकरांच्या लाइफलाइनला मिळणार बूस्टर डोस; लोकलचे रुप बदलणार तर, फेऱ्याही वाढणारमुंबईकरांच्या लाइफलाइनला मिळणार बूस्टर डोस; लोकलचे रुप बदलणार तर, फेऱ्याही वाढणारMumbai Local Train Update In Marathi: मुंबई लोकलचे रुप बदलणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 5 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे
Read more »

‘सोनू सूद पूरग्रस्त पंजाबच्या मदतीला धावला,’ मराठवाड्यातील पूरानंतर मराठी कलाकार कुठे? आमदाराची पोस्ट‘सोनू सूद पूरग्रस्त पंजाबच्या मदतीला धावला,’ मराठवाड्यातील पूरानंतर मराठी कलाकार कुठे? आमदाराची पोस्टMaharashtra Rain Marathi Actors Actress: अभिनेता सोनू सूद मुंबईमध्ये राहत असूनही पंजाबमध्ये पूर आला असता मदतीला धावून गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Read more »

Gandhi Jayanti Wishes in Marathi: अहिंसा हे दुर्बलाचे नाही तर... महात्मा गांधी जयंतीनिमित्त शेअर करा हे विचार, खास मराठमोळ्या शुभेच्छा.Gandhi Jayanti Wishes in Marathi: अहिंसा हे दुर्बलाचे नाही तर... महात्मा गांधी जयंतीनिमित्त शेअर करा हे विचार, खास मराठमोळ्या शुभेच्छा.Gandhi Jayanti Shubhechcha Wishes in Marathi: महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या तत्वांवर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
Read more »

ये भिवंडी है, यहां मराठी की क्या जरूरत, अबू आजमी के बयान पर बवाल, नवनीत राणा बोलीं-महाराष्ट्र छोड़कर चले जाएंये भिवंडी है, यहां मराठी की क्या जरूरत, अबू आजमी के बयान पर बवाल, नवनीत राणा बोलीं-महाराष्ट्र छोड़कर चले जाएंMumbai Bhiwandi Hindi Marathi Row: महाराष्ट्र में एक बार फिर समाजवादी पार्टी के नेता अबू आसिम आजमी के बयान पर भाषा विवाद खड़ा हो गया है। अबू आजमी ने भिवंडी में कहा था कि मराठी की क्या जरूरत है। इस पर अबू आजमीन चौतरफा घिर गए हैं। आजमी पर नवनीत राणा ने भी हमला बोला...
Read more »



Render Time: 2026-04-02 06:02:11