बिनशर्थ पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजप नेते म्हणतात 'घाईमध्ये...'

Raj Thackeray News

बिनशर्थ पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजप नेते म्हणतात 'घाईमध्ये...'
Narendra Modi ShapathvidhiBJP Reactionबिनशर्थ पाठींबा राज ठाकरे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 109 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 96%
  • Publisher: 63%

Raj Thackeray absent in Narendra Modi Shapathvidhi: देशात एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी देशविदेशातील नेते उपस्थित होते. एनडीएतील नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं.

Raj Thackeray absent in Narendra Modi Shapathvidhi : पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र अनेकांना खटकली.देशात एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

यावेळी देशविदेशातील नेते उपस्थित होते. एनडीएतील नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. असे असताना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र अनेकांना खटकली. पण याचं कारण समोर आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता. महायुतीच्या नेत्यांसाठी त्यांनी जाहीर सभादेखील घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते, त्यामुळे ते जिंकून आल्याचा दावाही मनसैनिकांनी केला. निकाल लागला. एनडीएला बहुमत मिळाले. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला. यात देशभरातील व्यावसायिकांसह, बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील दिसले. दरम्यान राज ठाकरेंना या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते.शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नसणं चर्चेचा विषय झालाय. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान घाईमध्ये निमंत्रण द्यायचं राहिलं असेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला बोलवलं असतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता, असे ते म्हणाले. महायुतीला आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबत होते. आम्हाला निमंत्रण असतं तर ते कळलं असतं. मात्र राज्यात मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आम्हाला आमंत्रण देण्यात विसरले असावेत, असे महाजन म्हणाले. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपामध्ये संपली आहे. गरज असेल तेव्हा उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे. त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता. राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही? हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतात, असेही ते म्हणाले. एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. मनसे पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणे अपेक्षित नसल्याचे महाजन म्हणाले.'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Narendra Modi Shapathvidhi BJP Reaction बिनशर्थ पाठींबा राज ठाकरे शपथविधीचे आमंत्रण Mns Maharashtra Navnirman Sena Modi Cabinet 3.0 NDA Government PM Modi Oath Ceremony Prakash Mahajan Raj Thackeray Baherun Pathimba मोदी शपथविधी एनडीए सरकार राज ठाकरे

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखमोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
Read more »

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारउद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारउद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. कलानगरच्या नवजीवन हायस्कूलमध्ये उद्धव ठाकरेंनी मतदान केलं. उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेंनीही मतदान केलं.
Read more »

एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाहीएलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाहीसमुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया.
Read more »

'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं''मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'Fighting Against Modi Is More Useful: मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले, असा चिमटाही ठाकरे गटाने काढला असून सध्या एनडीएमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.
Read more »

लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षलोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षMNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
Read more »

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद नाही, रोहित पवार म्हणतात 'त्यांच्याकडे आता एकच पर्याय'अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद नाही, रोहित पवार म्हणतात 'त्यांच्याकडे आता एकच पर्याय'PM Modi Shapath Grahan LIVE : नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील मित्रपक्षांच्या मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. यावरुन शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय.
Read more »



Render Time: 2026-04-02 15:05:09