PM Modi Shapath Grahan LIVE : नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील मित्रपक्षांच्या मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. यावरुन शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय.
PM Modi Shapath Grahan LIVE : नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील मित्रपक्षांच्या मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. यावरुन शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा शपथविधी सोहळा पार पडतोय. एनडीएच्या घटकपक्षातील मंत्र्यांचाही आज शपथविधी होणारे...यासाठी दिल्लीमध्ये जोरदार तयारी सुरूये. कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीये. विदेशी पाहुणेही दिल्लीत दाखल झालेत. तर महाराष्ट्रातून 6, उत्तर प्रदेशातून 9, बिहारमधून 8, गुजरातमधून 6, ओडीशातून 3, कर्नाटकमधून 5, मध्यप्रदेशातून 4, गोव्यातून आणि जम्मू काश्मीरमधून प्रत्येकी एक असे एकूण 48 खासदार शपथ घेण्याची शक्यता आहे. पण यात अजित पवारांच्या राष्टवादीला एकही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही.यावरुन शरद पवार गटाचे नेत रोहित पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीच्या कारवाईतून त्यांना मुक्ती मिळालीय. त्यामुळे अजित पवार गटाला व्यक्तिगत गिफ्ट मिळालंय. अजित पवार गट आणि शिंदेंना राज्याशी काही देणंघेणं नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी मंत्रिपदाची मागणी करत असून, अजित पवारांचा पक्ष येत्या काळात राहणार नाही. निवडणूक लढविण्यासाठी अजित पवार गटाकडे कमळ हाच पर्याय आहे. असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. दरम्यान रोहित पवार सारख्या गल्लीतल्या नेत्यांनी प्रसिद्धीसाठी दिल्लीतल्या घडामोडी वर भाष्य करू नये असा फलटवार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलंय...अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी पुढील वेळेस मंत्रीपद दिलं तरी चालेलं असं सांगितलं. अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्रीपदाबाबत बैठक झाली त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. राज्यमंत्रीपदासाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. मात्र कॅबिनेट मंत्री राहिले असल्यानं राज्यमंत्री करता येणार नाही असं पटेलांचं मत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं, भविष्यात त्यांचा विचार होईल असंही फडणवीस म्हणालेत.नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश असणार आहे. यात भाजपचे नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. तर रामदास आठवलेंना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय. प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत. तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. पण नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळ स्थान दिले जाणार नाही अशी माहिती भाजप हायकमांडकडून मिळालीय. राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आलंय. याआधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे MSME मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. यावेळी दोन्ही खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीये.'मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे', पंकजा मुंडेंची समर्थकांसाठी पोस्ट, 'तुम्हाला शपथ आहे...'
NDA Government Formation PM Modi Oath-Taking Ceremony NDA Election Results 2024 BJP Congress India Alliance NDA Lok Sabha 2024 PM Modi Leader PM Modi Swearing In Ceremony Delhi High Security Delhi Traffic Diversions Modi Swearing In Delhi Police Security PM Modi Oath Ceremony नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान पद दिल्ली सुरक्षा व्यवस्था Rohit Pawar Criticis Ajit Pawar Ajit Pawar Group Has No Single Mp In Modi Cabinet
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
Read more »
आता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेटChar Dham Yatra News: चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Read more »
'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...', रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले...Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Read more »
लोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणारAjit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
Read more »
शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
Read more »
Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
Read more »
