Jayant Patil Letter To CM Devendra Fadnavis: आता शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पाठवलेल्या या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Jayant Patil Letter To CM Devendra Fadnavis : राज्यात मागील काही आठवड्यांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी असं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांतील सुमारे 17 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आला असून, शेतीचे आणि ओढ्यालगत असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शेतातील माती वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. जयंत पाटलांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं...महोदय,राज्यात पावसाचे थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांतील तब्बल 17 लाख 85 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर येऊन शेतीचे आणि ओढ्यालगत असलेल्या घरांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पुर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे.अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कार्यपध्दतीमुळे पंचनामे वेळेत होत नसून त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली जात नाही. पंचनामे झाले तरी वास्तव नुकसानाचे योग्य मुल्यमापन होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. पाऊस सर्वत्र पडलेला असल्यामुळे नुकसानही सर्वच शेतकऱ्यांचे झाले आहे. बँकांचे हप्ते कसे फेडायचे, मुलांचे शिक्षण कसे करायचे असे प्रश्न पिडीत शेतकरी करत आहेत.त्यामुळे पीकविमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना तातडीने विमा दावे अदा करण्याचे आदेश द्यावेत. बँकाकडून होत असलेली वसुलीची कार्यवाही तात्काळ थांबवावी. शेतकऱ्यांसाठी अतिरीक्त बियाणे व खतांचा पुरवठा उपलब्ध करुन द्यावा.तरी, सरकारने पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा थांबवावा आणि शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी. केवळ पीक नुकसान नव्हे तर जनावरांचे, घरांचे व गोठ्यांचे नुकसान यासाठीही मदत जाहीर केली जावी. जयंत पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे पत्र शेअर केलं आहे.राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल ३० जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, घरे, जनावरे, गोठे पाण्याखाली गेले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. बळीराजा इतक्या अडचणीत असताना या सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही?सरकारने राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर… pic.twitter.com/8vW73Vzxqw— Jayant Patil- जयंत पाटील September 18, 2025आता या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री काही मोठा निर्णय जाहीर करणार का याबद्दल मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांनी हे पत्र लिहिलं आहे, हे विशेष! FAQमहाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान किती प्रमाणात झाले आहे?महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांतील सुमारे 17 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आला असून, शेतीचे आणि ओढ्यालगत असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शेतातील माती वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी काय आहेत?अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे पंचनामे वेळेत होत नाहीत आणि त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली जात नाही. पंचनामे झाले तरी वास्तव नुकसानाचे योग्य मूल्यमापन होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांसमोर कोणत्या आर्थिक आणि कुटुंबीय समस्या उद्भवल्या आहेत?पाऊस सर्वत्र पडल्यामुळे नुकसान सर्व शेतकऱ्यांचे झाले आहे. बँकांचे हप्ते कसे फेडायचे, मुलांचे शिक्षण कसे करायचे, असे प्रश्न पिडीत शेतकरी विचारत आहेत. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांसाठी विमा आणि बँकिंग मदतीच्या मागण्या काय आहेत?पीक विमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना तातडीने विमा दावे अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आहे. तसेच, बँकाकडून होत असलेली वसुलीची कार्यवाही तात्काळ थांबवावी, असे सांगितले जात आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाईसाठी पंचनामा प्रक्रिया आवश्यक असून, वैयक्तिक तक्रारींवर थेट विमा मिळत नाही.
NCP Leader Jayant Patil CM Devendra Fadnavis Wet Drought Wet Drought In Maharashtra
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
‘बिहार के स्मार्ट प्रीपेड बिजली मीटर चीटर मीटर, CM नीतीश भी धोखेबाज’, तेजस्वी का तीखा हमलाTejashwi Yadav News : बिहार के स्मार्ट प्रीपेड मीटर को तेजस्वी यादव ने चीटर मीटर कहा है। दरअसल शुरू से ही बिजली उपभोक्ता स्मार्ट बिजली मीटर में गड़बड़ियां गिना रहे हैं, लेकिन बिजली विभाग कान में तेल डाले बैठा है। तेजस्वी यादव ने इसीलिए इसे मुद्दा बनाया...
Read more »
MP : चूहाकांड के बाद CM ने कहा- MYH को पूरी तरह स्वच्छ बनाने का संकल्प लेंWebDunia is a leading Hindi news and content platform offering the latest updates and in-depth coverage on entertainment, lifestyle, astrology, religion, current affairs, and more. Stay informed with breaking Hindi news, trending web stories, and exclusive features.
Read more »
7113 कोटींची संपत्ती असलेल्या BJP चा आपल्याच माजी CM च्या अंत्यसंस्काराचा खर्च देण्यास नकारRow in Gujarat Over Payment Of Ex CM Funeral: एअर इंडियाचे एआय-171 विमान 12 जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळले.
Read more »
‘पतपेढीच्या विजयाने अर्ध्या...’, ‘तुम्ही ब्रँड नाही’वरुन फडणवीसांना मनसे इशारा; 'खानाची भीती दाखवून...'Raj Thackeray MNS Slams CM Devendra Fadnavis: मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा असून यावरुन भाजपाने केलेल्या टीकेवर राज ठाकरेंच्या मनसेनं उत्तर दिलंय.
Read more »
जयपुर में डिप्टी CM दिया कुमारी ने दिया स्वच्छता संदेश, शॉल ओढ़ाकर किया सफाईकर्मियों का सम्मानJaipur News: देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन पर राजस्थान में भाजपा की ओर से सेवा पखवाड़ा चलाया जा रहा है. सेवा पखवाड़े के तहत गुरुवार को प्रदेश की उपमुख्यमंत्री दिया कुमारी ने शहर के प्रमुख पर्यटन स्थल जंतर मंतर पर झाड़ू लगाकर स्वच्छता का संदेश दिया.
Read more »
राजिम से रायपुर तक दनादन दौड़ेगी ब्रॉड गेज ट्रेन, CM साय ने दिखाई हरी झंडीRajim MEMU Train News: राजधानी राजपुर से राजिम के बीच चलने वाली बहुप्रतीक्षित ब्रॉड गेज ट्रेन की शुरुआत हो गई है. सीएम साय ने राजिम से हरी झंडी दिखाकर मेमू ट्रेन को रवाना किया. इससे राजिम और गोबरा के लोगों को रायपुर आने-जाने में आसानी होगी.
Read more »
