US government shutdown 2025: भविष्यात अधिक गंभीर रुप धारण करणार हे संकट.... आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेची ही काय अवस्था?
US government shutdown 2025: सत्ताबदल, त्यानंतर धोरणात्मक बदल आणि आर्थिक महासत्ता म्हणून जगभरात ख्याती असणाऱ्या अमेरिकेची सुत्र पुन्हा हाती आल्यानंतर घेण्यात आलेले आयातशुल्कासह कैक निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडताना दिसत आहेत.
जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घडामोडींपैकी एक असणाऱ्या अमेरिकेत सध्या सरकारी शटडाऊनचा टप्पा आतापर्यंतच्या सर्वात भीषण वळणावर आला असून, आता याचा थेट परिणाम देशातील नोकरदार वर्ग आणि हवाई वाहतुकीवरही दिसत आहे. अमेरिकी परिवहन सचिव सीन डफी यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार देशातील 40 विमानतळांवरील कार्यवाहीत 10 टक्क्यांनी घट करण्यातयेत आहे. शटडाऊनमुळं हजारो एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि TSA अधिकारी पगाराशिवायच नोकरी करण्यास भाग पडले असून, नोकरदार वर्गामध्ये कपात झाल्यानं हवाई मार्गानं होणाऱ्या वाहतुकीमध्ये सुरक्षिततेचेही मोठे प्रश्न उपस्थित राहत आहेत. अमेरिकेतील सद्यस्थिती नेमकं काय सांगते? अमेरिकेतील सरकारी शटडाऊन आतापर्यंतचं सर्वात मोठं शटडाऊन असून, त्यास 36 दिवस पूर्ण झाले आहेत. देशाच्या इतिहासातील हे सर्वात मोठं शटडाऊन असल्याचं म्हचलं जात आहे. यापूर्वी 2018-19 मध्ये 35 दिवसांचं शटडाऊन झालं होतं. अमेरिकेत शटडाऊन तेव्हा होतं, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्राध्यक्ष आगामी आर्थिक वर्षासाठीच्या खर्चास मंजुरी देणाऱ्या विधेयकावर सहमती दर्शवत नाहीत. ही परिस्थिती सहसा डेमोक्रेट्स आणि रिपब्लिकन या दोन्ही गटांमध्ये असणाऱ्या मतभेदांमुळे उत्पन्न होते. सध्या यामागे आरोग्य सेवांवरील अनुदान, विशिष्ट सरकारी कार्यक्रमांवर होणारा खर्च अशी कारणं सांगण्यात येत आहेत. कायदेशीररित्या सरकारी कोषातील पैसा कमी झाल्यास कमी आवश्यक सेवा आणि विभाग बंद करण्यास सरकार भाग पडतं. तर, अत्यावश्यक सेवा सीमित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवल्या जातात. भारताच्या चिंतेत भर? सध्या अमेरिकेत सरकारी शटडाऊन सुरू असल्या कारणानं भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष अमेरिकेत नोकरीच्या निमित्तानं असणाऱ्या नोकरदार वर्गासमवेत व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनाही कैक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळं प्रामुख्यानं भारतातील IT आणि इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गाचा समावेश आहे. आयात शुल्काचा निर्णयसुद्धा यात महतत्वाची भूमिका बजावत असून, आधीच तणावाचा सामना कराणाऱ्या व्यापारि संबंधांवरही हे शटडाऊन परिणाम करताना दिसत आहे. Trump नीति फसली! Tariff War च्या नादात अमेरिकेचं दिवाळं; पगाराशिवाय लोक करतायत नोकऱ्या, भारतीयांवर काय परिणाम? https://t.co/LZELfhytAdभविष्यात अधिक गंभीर रुप धारण करणार हे संकट.... आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेची ही काय अवस्था? #news #shutdown #america #worldnews— ZEE २४ तास November 7, 2025हेसुद्धा वाचा : Explained : खरेदी खत तयार करण्याची प्रक्रिया काय? या टप्प्यानंतर पुढची प्रक्रिया समजून घ्या जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता राष्ट्र असणाऱ्या देशातील अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या अनिश्चिततेमुळं वैश्विक गुंतवणूकदारांच्या विश्वासाला हादरा बसला असून, त्याचा परिणाम भारताच्या शेअर मार्केटमध्ये आणि रुपयावरही दिसत आहे. यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांवरही परिणाम होत असून, डॉलरची मागणी वाढून रुपयावर आणखी ताण येऊ शकतो. कधी संपणार हे संकट? अमेरिकेतील हे संकट नेमकं कधी संपणार याबाबत कोणतीही शाश्वती नसून, राष्ट्रपती आणि काँग्रेस मधील कोणत्याही स्वरुपातील तडजोडीचे संकेत अथवा तारीख निश्चित नाही. ज्यामुळं कोणत्याही प्रकारचं हमीपात्र वक्तव्य सरकारच्या प्रतिनिधींकडूनही करण्यात येत नाही. FAQअमेरिकेतील सरकारी शटडाऊन म्हणजे काय?सरकारी शटडाऊन तेव्हा होते जेव्हा अमेरिकी काँग्रेस आणि राष्ट्राध्यक्ष आगामी आर्थिक वर्षासाठीच्या खर्च विधेयकावर सहमती गाठत नाहीत. यामुळे सरकारी कोषातील पैसा कमी होतो आणि कमी आवश्यक सेवा व विभाग बंद होतात. सध्याचे शटडाऊन किती दिवस चालले आहे आणि ते का इतके मोठे आहे?सध्याचे शटडाऊन 36 दिवस चालले असून, ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे आहे. यापूर्वी 2018-19 मध्ये 35 दिवसांचे शटडाऊन झाले होते.शटडाऊनचा अमेरिकेतील नोकरदार वर्ग आणि हवाई वाहतुकीवर कसा परिणाम होत आहे?हजारो एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि TSA अधिकारी पगाराशिवाय काम करत आहेत. परिवहन सचिव सीन डफी यांच्या घोषणेनुसार, 40 विमानतळांवरील कार्यवाहीत 10% घट झाली आहे.
World News US Government Shutdown 2025 FAA Flight Cuts US Airports Delay United Airlines Reaction American Airlines Flights Longest Government Shutdown Sean Duffy FAA News US Aviation News Flight Cancellations USA Air Traffic Controllers No Pay TSA Strike अमेरिका विश्व बातम्या
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Baba Vanga Donald Trump: বিশ্ব জুড়ে পরমাণু যুদ্ধ লাগল বলে! বাবা ভাঙ্গার ভবিষ্যদ্বাণী আর ট্রাম্পের মন্তব্য এক সুরে বাঁধা...কী ভাবে সম্ভব?Baba Vangas Biggest Prediction baba vanga Donald Trump Will Baba Vangas prediction come true about war nuclear weapons Pakistan russia china europe
Read more »
Trump Tariff पर सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट में क्या-क्या हुआ? अग्निपरीक्षा के दौरान धरा रह गया कॉन्फिडें...US Tariff के मामले को लेकर अमेरिका के Supreme Court में सुनवाई हो चुकी है. इस दौरान न्यायालय ने ट्रंप प्रशासन के फैसले पर संशय जाहिर कर दिया है. जिसके बाद ट्रंप के कॉन्फिडेंस को तगड़ी ठेस लग सकती है.
Read more »
Following Mamdani’s Decisive Victory, Trump Softens Stance On NYC Funding, Says He’ll Aid ‘A Little Bit’After Zohran Mamdani’s historic New York victory, Trump softens stance on federal aid, pledging limited support despite earlier threats.
Read more »
Tariff Row: डोनाल्ड ट्रंप की बढ़ सकती है मुश्किलें, टैरिफ केस में सुप्रीम कोर्ट में आज से सुनवाई होगी शुरूTariff Row: डोनाल्ड ट्रंप की बढ़ सकती है मुश्किलें, टैरिफ केस में सुप्रीम कोर्ट में आज से सुनवाई शुरू Donald Trump Supreme Court Tariff Case hearing
Read more »
G20 Summit: जी20 शिखर सम्मेलन में शामिल होने जोहान्सबर्ग नहीं जाएंगे डोनाल्ड ट्रंप, जानें क्या बोले अमेरिकी राष्ट्रपतिDonald Trump Confirms He Won’t Attend South Africa G20 Summit: जी20 शिखर सम्मेलन में शामिल होने जोहान्सबर्ग नहीं जाएंगे डोनाल्ड ट्रंप, जानें क्या बोले अमेरिकी राष्ट्रपति G20 Summit विदेश
Read more »
Pak-Afghan War: पाकिस्तान ने शांति वार्ता से पहले ही अफगानिस्तान को दी धमकी, जानें क्या बोले पाकिस्तानी रक्षा मंत्रीPak-Afghan War: पाकिस्तान ने शांति वार्ता से पहले ही अफगानिस्तान को दी धमकी, जानें क्या बोले पाकिस्तानी रक्षा मंत्री Pakistan Defence Minister Khwaja Asif Warns Afghanistan for Army Action विदेश
Read more »
