Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हीडिओ कॉल करण्यात आला होता. एकदा नव्हे तर दोन वेळा व्हीडिओ कॉल करण्यात आल्याचं उघड झालंय.
Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता.संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हीडिओ कॉल करण्यात आला होता.
एकदा नव्हे तर दोन वेळा व्हीडिओ कॉल करण्यात आल्याचं उघड झालंय. व्हीडिओ कॉलवरून देशमुखांची क्रूर हत्या कुणी बघितली, हा तपासामधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता. देशमुखांच्या अमानवीय खूनानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला होता. टोळक्यानं संतोष देशमुखांना घेरलं. काठी, गॅस पाईप, फायटर आणि इतर धारदार शस्त्रानं देशमुखांवर वार करण्यात आले. अत्यंत अमानुषपणे देशमुखांना मारहाण केली जात होती आणि हा सगळा प्रकार व्हीडिओ कॉलवरून दाखवला जात होता, अशी धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आली आहे. मात्र व्हीडिओ कॉल कुण्या एका व्यक्तीला केला नसून एका व्हॉट्सअप ग्रूपलाच व्हीडिओ केल्याची धक्कादायक माहिती आता तपासातून समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हीडिओ कॉल केल्याचं उघड झालंय.'मोक्कार पंती' नावाच्या व्हॉट्सअप ग्रूपवर व्हीडिओ कॉल करण्यात आला होता. आरोपी सुदर्शन घुले आणि जयराम चाटेनं व्हीडिओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रूपमधील 17 ते 19 वर्ष वयोगटातील 6 जणांनी मारहाणीचा व्हीडिओ पाहिल्याचं समोर आलंय. मारहाण होत असताना दोनवेळा कॉल केल्याचं उघड झालंय. मारहाण करताना आणि त्याच्या आधी सुद्धा या ग्रुप वर व्हीडिओ कॉल केल्याचं तपासात उघड झालाय, हा कॉल तब्बल 6 जणांनी पहिला होता आता त्यांनाही ओळखून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांकडून फायटर, गॅस पाईप, आणि काठीनं संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा गुन्हा करत असताना आरोपीच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा पश्चाताप दिसून येत नव्हता...आरोपी हे कृत्य करताना पाशवी आनंद घेत होते असंही तपासात याआधी उघड झालंय. त्यात आता फक्त आरोपी नाही तर व्हीडिओ ग्रूपवरही अनेक जण हा प्रकार पाहत होते...म्हणजे गुन्ह्यात इतरही काही लोकांचा सहभाग आहे का, या दृष्टीनंही आता तपास सुरू आहे. आधी संतोष देशमुखांची क्रूर हत्या आणि त्यानंतर त्या हत्येचा विकृत आनंद आरोपी घेत होते. व्हीडिओ कॉलवरून देशमुखांची हत्या कुणी बघितली हादेखील तपासामधला अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मारेक-यासंह ज्यांनी व्हीडिओ कॉलवरून ही क्रूर हत्या बघितली त्यांनाही याप्रकरणात सहआरोपी केलं जाणार का, हेही पाहणं महत्त्वाचंय.स्पोर्ट्स
Santosh Deshmukh Murder Santosh Deshmukh Murder Video Call Whatsapp Group Zee 24 Taas
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'तो' इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने...; ताडोबातला थरारक Video पाहाचBiker And Tiger Encounter Video: वन्यजीव आणि मानवाचा आमना-सामना होण्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
Read more »
Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रमTimeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
Read more »
जनवरी राशिफल 2025: मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबीजानेवारी राशीभविष्यजाने आपल्याकडे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबी आणि अपेक्षित बदल म्हणून आहे
Read more »
Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Read more »
मोठा ट्विस्ट? संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या तिघांचा मर्डर झाल्याचा दावा; रात्री 11.30 ला...Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड शहरामध्ये मुक मोर्चाचं आयोजन केलेलं असतानाच एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
Read more »
महाराष्ट्रात बीड प्रकरण आणि शिवसेनेत प्रवेशमहाराष्ट्रात बीड सरपंच हत्या प्रकरण आणि शिवसेनेत प्रवेश याबद्दलच्या बातम्या
Read more »
