Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

Beed Sarpanch News

Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
Maharashtra Winter SessionSantosh DeshmukhMurder Case
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 153 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 88%
  • Publisher: 63%

Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.

Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्.; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.

Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये निवेदन केलं. आरोपी कोणीही असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असं आश्वासन देतानाच मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांची बदली केली जाणार असल्याची घोषणा केली. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तसेच न्यायालयीन चौकशीही केली जाणार असल्याचं फडणवीसांनी सभागृहाला सांगितलं. एवढ्यावरच न थांबता संतोष देशमुख यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे सांगितलं."मस्साजोग प्रकरण अत्यंत गंभीर आहे. हे प्रकरण केवळ हत्येपर्यंत मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खणून बीड जिल्ह्यातील कायद्याची स्थिती बदलावी लागेल," असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणातील घटनाक्रम सांगितला."आवादा एनर्जीने बीड जिल्ह्यात सोलर प्रकल्पातून मोठी गुंतवणूक केली आहे. ही कामे आम्हाला द्या, अन्यथा आम्हाला खंडणी द्या म्हणत तिथे अनेकजण वावरत आहेत. तसाच प्रकार 6 डिसेंबर 2024 रोजी घडला. मस्साजोग येथील कंपनीच्या कार्यालयात आरोपी गेले. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ आणि मारहाण केली. यावेळी आरोपींकडून अधिकाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यावेळी स्थानिक सरपंच संतोष देशमुख तिथे आले. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये मारहाण झाल्याचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला," असं फडणवीस म्हणाले.काळ्या रंगाची स्कॉर्पिओ तिथे... पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी,"9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख एकटेच आपल्या गावी जात होते. पेट्रोलपंपावर आत्येभावाला भेटले तिथून ते दोघे निघाले. त्यावेळी टोलनाक्यावर त्यांची गाडी पोहोचली तेव्हा टोलनाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि अजून एक गाडी त्यांची वाट पाहत होते. गाडी टोलवरुन पुढे गेल्यावर गाडी आडवली. त्यांनी आधी चालकाच्या बाजूच्या गाडीची काच फोडली. त्यानंतर त्यांना कळलं की संतोष हे दुसऱ्या बाजूला बसले. त्यांनी दुसऱ्या बाजूची काच फोडून संतोष यांना बाहेर काढलं. नंतर त्यांना गाडीमध्येच तारांनी मारहाण केली. संतोष जिवंत नाही हे समजल्यावर त्यांनी तिथेच त्यांना सोडून पळ काढला. सरपंचाचा भाऊ विष्णू चाटेच्या संपर्कात होता. संतोषला सोडतो म्हणायचा पण सोडत नव्हता, या मारहाणीत संतोष यांचा मृत्यू झाला," असं सांगितलं."29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने वीज कंपनीला काम बंद करण्याची धमकी दिली होती. 2 कोटी द्या अन्यथा काम बंद करा असे कराडने सांगितले, धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडला. त्यामुळे खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकारांचा तपास सुरू आहे," असंही फडणवीस म्हणाले."बीड प्रकरणात मास्टर माईंड कुणीही असो कारवाई करणारच," असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. या प्रकरणामध्ये बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बीडचे माजी नगराध्यक्षयांचा थेट संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. फडणवीस यांनी थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेत सभागृहामध्ये विधान केलं."वाल्मिक कराडबद्दल पुरावे असतील, कुणासोबत फोटो असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल," असं फडणवीस यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितलं.मनोरंजन

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Winter Session Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad Who Is Walmik Karad Connection Dhananjay Munde

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
Read more »

फडणवीस आणि अमृता यांची ती पहिली भेट; 90 मिनिटांत नेमकं काय घडलं?फडणवीस आणि अमृता यांची ती पहिली भेट; 90 मिनिटांत नेमकं काय घडलं?देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही जोडी राजकारणातील चर्चेतील जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी काय?
Read more »

KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
Read more »

'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
Read more »

800 CCTV, 20 मिनिटांत...; महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्या प्रकरणात काय घडलं? पुणे पोलिसांनी सांगितला घटनाक्रम800 CCTV, 20 मिनिटांत...; महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्या प्रकरणात काय घडलं? पुणे पोलिसांनी सांगितला घटनाक्रमPune Satish Wagh Murder Case Full Timeline: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सतीश वाघ हत्या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे. या प्रकरणामध्ये आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहोचले पाहूयात...
Read more »

IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून जवळपास 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केलं.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:14:45