Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'

Sarpanch News

Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'
Santosh DeshmukhSantosh Deshmukh Murder CaseBeed Mp
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 88 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नेते धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये आपली भूमिका मांडताना पत्रकारांसमोर सोनावणेंनी अनेक महत्त्वाची विधानं केली.बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी 9 डिसेंबर रोजी निघ्रृण हत्या करण्यात आली. यासंदर्भात बोलताना सोनावणे यांनी,"ही सुरवात मे महिन्यात झाली. खंडणीच्या प्रकरणातून याची सुरवात झाली," असं म्हटलं. पुढे त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगितला. तसेच पुढे बोलताना त्यांनी,"त्या दिवशी पोलिसांना नेमका फोन कोणी केला याची चौकशी करा," अशी मागणीही त्यांनी केली. नाव न घेता बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडे यांना उत्तर देताना,"जो कोणी खून व्यवहारातून केला म्हणत आहे ते खरं आहे पण खंडणीच्या व्यवहारातून," असंही म्हटलं. तसेच,"टॉर्चर करून संतोषला मारलं. त्यानं कुठला गुन्हा केला?" असा सवाल सोनावणे यांनी उपस्थित केला.सोनावणे यांनी, 6 तारखेचा फोन कॉलचा सिडीआर काढा, अशी मागणीही केली."बनसोड पाटील महाजन हे पोलीस अधिकारी कोणाच्या संपर्कात त्यांचे सिडीआर काढा," असं सोनावणे म्हणाले."इलेक्शनच्या काळात आमचे सिडीआर काढले जायचे. आमचे सिडीआर काढले आता आरोपीचे सोडीआर काढा," असंही सोनावणे म्हणाले."चौथा आरोपी अटक की सरेंडर झालं हे स्पष्ट व्हावं. मारेकाऱ्याला फाशी झाली पाहिजे. पाचव्या आरोपीला केव्हा अटक होणार? तीन आरोपी अजून ही फरार आहेत त्यांना केव्हा अटक होणार?" असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला आहे."15 दिवसानंतर ही तीन आरोपी अटक होत नाहीत ही चुकी कोणाची?" असा सवालही स्थानिक खासदाराने उपस्थित केला आहे."तिन्ही केस सीआयडीकडे गेल्या आहेत. तिन्ही केस क्लब केल्या आहेत. जे खंडणीत आहेत तेच मर्डरमध्ये आहेत. आरोपींच्या नावे किती प्रॉपर्टी आहेत याची चौकशी झाली पाहिजे. गोवर्धन सानप कुठल्या जातीचे? त्यांच्या मृत्यूचा तपास केला पाहिजे. त्यांचा मृत्यू ही संशयास्पदरित्या झाला आहे," असंही सोनावणे म्हणाले.तसेच पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं असंही सोनावणे यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्र

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Santosh Deshmukh Santosh Deshmukh Murder Case Beed Mp Bajrang Sonawane Questions Answers Dhananjay Munde

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता.
Read more »

'जेव्हा शाहरुख खान गर्दीत...', अल्लू अर्जूनच्या वकिलाने कोर्टात केला युक्तिवाद; न्यायमूर्ती म्हणाले 'फक्त तो एक...''जेव्हा शाहरुख खान गर्दीत...', अल्लू अर्जूनच्या वकिलाने कोर्टात केला युक्तिवाद; न्यायमूर्ती म्हणाले 'फक्त तो एक...'Allu Arjun Bail: हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. दरम्यान हायकोर्टाने अल्लू अर्जूनला जामीन दिला आहे. अल्लू अर्जूनच्या वकिलांनी कोर्टात शाहरुख खानसंबंधी एका केसचा दाखला दिला.
Read more »

विराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...'विराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...'ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विराटच्या बॅटमधून समाधानकारक धावा निघाल्या नाहीत. अशातच आता विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
Read more »

आर अश्विन निवृत्ती नंतर, कोणाचे फोन आले याबद्दल शेअर केला स्मार्ट फोनची कॉल लॉगआर अश्विन निवृत्ती नंतर, कोणाचे फोन आले याबद्दल शेअर केला स्मार्ट फोनची कॉल लॉगभारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी अश्विन भारतात परतला आणि त्याने सोशल मीडियावर त्याला निवृत्तीनंतर कोणकोणत्या व्यक्तींचे फोन आले याची कॉल लॉग शेअर केली.
Read more »

Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रमSarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रमTimeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
Read more »

नागपूरमध्ये पुष्पा 2 पाहताना आरोपीला अटकनागपूरमध्ये पुष्पा 2 पाहताना आरोपीला अटकहा प्रश्न नागपूर शहरात कुख्यात आरोपीला प्रसिद्ध चित्रपट 'पुष्पा 2' पाहताना पोलिसांनी अटक करण्याबद्दल आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:17:54