Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?

Pune Porsche Accident News

Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?
Pune Porsche AccidentPune Porsche CaseHOD Of Forensic Department
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 91 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. हे प्रकरण राज्यात तापले आहे.

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. हे प्रकरण राज्यात तापले आहे.: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत असताना पोर्शे कारने दोघांना चिरडले यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर अजय तावरे याला रक्ताचा नमुना बदलण्यास पुण्यातील एका आमदाराचा फोन आल्याचे समोर आले आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांनी त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने कचऱ्याच्या पेटीत टाकले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हलनोर यांनी हे रक्ताचे नमुने बदलले. पहिल्या सॅम्पलमध्ये अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेत औंधमधील सरकारी रुग्णालयात दिले होते. औंध रुग्णालयात वडील आणि मुलगा दोघांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन मुलाचे सॅम्पल मॅच झाले. पण ससूनमधील रक्ताचा अहवाल मॅच झाला नाही. त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉ. श्रीहरी आणि अजय तावरेला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्ताचा नमुना बदलण्यास डॉक्टर अजय तावरे याला पुण्यातील एका आमदाराचा फोन आला होता. या प्रकरणी आता पोलिस खोलात जाऊन तपास करणार आहेत. हे आमदार कोण आहेत व कोणी दबाव टाकला हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. पुण्यातील एक बडा नेता या प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तसंच, या प्रकरणी हस्तक्षेप करत आहे, असे आरोप यापूर्वीदेखील करण्यात आले होते. वेगवेगळ्या पक्षांकडूनही असे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी एका आमदारानेच फोन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक खोलात जाऊन तपास करणार आहेत.महाराष्ट्रमनोरंजन

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Porsche Accident Pune Porsche Case HOD Of Forensic Department Assistant Dean Of Sassoon Hospital Pune Police Maharashtra Police Blood Sample Pune Porsche Accident Blood Sample Scandal

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..''मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Read more »

Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रमPune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रमPune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुलगा आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहणार आहे. तेथील त्याचं वेळापत्रक कसं असेल तो दिवसभर काय करणार याची माहिती समोर आली आहे.
Read more »

Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
Read more »

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
Read more »

Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमPune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
Read more »

Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..Pune Porsche Car Accident: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ अपघाताच्या आधीचा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या कारने कल्याणी नगर परिसरामध्ये दोघांचा जीव घेतला तीच कार दिसत आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 12:31:33