Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून.' Pune Porsche Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..' Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधार गृहात केली आहे. पुणे अपघात प्रकरणात पोलिस प्रशासनावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहे. अल्पवयीन मुलाला पिझ्झा, बर्गर देण्यात आला होता का? तसंच, पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली आहेत. पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा खुलासा अमितेश कुमार यांनी केला आहे. अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता तर चालक गाडी चालवत होता, अशा पद्धतीने केसची दिशा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा एक प्रकारचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असून. त्यामुळं या प्रकरणी 201 अंतर्गंत कारवाई करण्यात येईल. सर्व दिशेने तपासदेखील करण्यात येत आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हूणन तसे कलम वाढवण्यात येणार आहे, असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सुरुवातीला ड्रायव्हरने पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं होतं की गाडी मी चालवत होतो. ते तो कोणाच्या दबावामुळं करत होता याची चौकशी सुरू आहे. या काळात घटनाक्रम बदलण्याची गोष्ट समोर आली आहे. मात्र, आमच्या तपासात हे स्पष्ट झालं आहे की, अल्पवयीन मुलगाच गाडी चालवत होता. अल्पवयीन मुलगा घरातून गाडी निघाल्यापासून ते अपघात व पोलिस ठाण्यात त्याला आणण्यापर्यंतचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसंच, मुलगा जेव्हा त्याच्या घरातून बाहेर निघाला तेव्हा त्याच्या सुरक्षारक्षकाच्या रजिस्टरमध्ये तो गाडी घेऊन निघाल्याची नोंद आहे. ज्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.अल्पवयीन मुलाला पिझ्झा बर्गर देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरही पोलीस आयुक्तांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पिझ्झा, बर्गर पार्टी झाली असं अद्याप आमच्या चौकशीत काही समोर आलेले नाहीये. पण तरीही आम्ही घरातून एक एक व्यक्ती बाहेर पडला ते त्यानंतर अपघात आणि त्याच्यानंतर पोलिस ठाण्यात घेऊन जाईपर्यंतचे सीसीटिव्ही जप्त करण्यात आले आहेत.अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर त्यावेळी पहिले ब्लड सकाळी 8वा घेतले होते. त्यानंतर पून्हा त्यानंतर पून्हा संध्याकाळी ब्लड घेतलं होते. कारण त्याच मुलाचे ब्लड आहे का हे कन्फर्म करण्यासाठी दोन वेळा घेतले होते.महाराष्ट्र
Pune Porsche Accident Case Pune Porsche Accident News Pune Porsche Accident Latest Update Maharashtra Vishal Agrawal Shivajinagar Court Pune Police Pune Porsche Accident Updates Vedant Agrawal Pune Hit And Run Case Pune Latest News पोर्श कार अपघात पुणे पोर्श कार अपघात अपडेट पुण्यातील पोर्शे कार अपघात मराठी न्यूज पोर्शे कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लेटेस्ट मराठी न्यूज पुणे ब्रेकिंग न्यूज पुणे अपघात पोर्श कार
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतीलIrrfan Khan Death Anniversary : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारा ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या आठवणीत मुलगा बाबिल खान भावूक होऊन त्यांने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलंय.
Read more »
Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
Read more »
'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
Read more »
यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास...Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे खडसे आमदारकीची व खासदारकीची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Read more »
कोणालाही धाराबावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य
Read more »
पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यूमुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिली आहे. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more »
