Pune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुलगा आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहणार आहे. तेथील त्याचं वेळापत्रक कसं असेल तो दिवसभर काय करणार याची माहिती समोर आली आहे.
Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी.; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रम Pune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रम Pune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुलगा आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहणार आहे. तेथील त्याचं वेळापत्रक कसं असेल तो दिवसभर काय करणार याची माहिती समोर आली आहे.कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कारच्या भीषण अपघातानंतर अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करुन त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं आहे. या मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहामध्ये ठेवलं जाणार आहे. या मुलाला बालसुधारगृहामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. बालसुधारगृहामध्ये या तरुणाचं वेळापत्रक कसं असेल याची माहिती समोर आली आहे."चाइल्ड इन कॉन्फिक्ट विथ लॉ ला तातडीने येरवाड्यातील नेहरु उद्योग केंद्रातील बालसुधारगृहात देखरेखीखाली ठेवण्यात यावं. तिथे तो इतर बालकांबरोबरच राहील," असं बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बुधवारी पुण्यातील बालन्यायालय मंडळाने अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात हलवण्यात आलं. सत्र न्यायालयाने या मुलाच्या वडिलांना म्हणजेच बिल्डर विशाल अग्रवालला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेल्या या अल्पवयीन मुलाचं वेळापत्रक हे येथील इतर मुलासारखं असेल. हे वेळापत्रक कसं असतं पाहूयात...>या अल्पवयीन मुलाला ज्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे तिथे 30 अल्पवयीन मुलं आहेत.>या बालसुधारगृहातील दिवस सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होतं असं न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सकाळी 8 वाजता या मुलांना अंडी, दूध, पोहे, उपमा असा नाश्ता दिला जातो. >त्यानंतर सकाळी 11 वाजता सार्वजनिकरित्या एकत्र येऊन प्रार्थना केली जाते. नंतर हा अल्पवयीन मुला भाषा शिकवणीला हजेरी लावले. >समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारचं जेवण झाल्यानंतर या अल्पवयीन मुलांना दुपारी चार वाजेपर्यंत त्यांच्या डॉमेट्रीमध्ये विश्रांती घेण्याची परवानगी दिली जाते.>सायंकाळी 4 वाजता पुन्हा हलका नाश्ता दिला जातो. त्यानंतर एक तास टीव्ही पाहण्याची मूभा असते. नंतर पुढील दोन तास मैदानी खेळांसाठी दिले जातात. या बालसुधारगृहामध्ये व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळायला देतात, असं एनडीटीव्हीने म्हटलं आहे. >त्यानंतर सात वाजता या मुलांना रात्रीचं जेवण दिलं जातं. रात्रीच्या जेवणामध्ये भात, चपाती, भाज्या दिल्या जातात. रात्री आठ वाजता या मुलांना झोपण्यासाठी त्यांच्या डॉमेट्रीमध्ये पाठवलं जातं. >वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालसुधारगृहामध्ये या अल्पवयीन मुलांच्या मानसिक चाचण्याही घेतल्या जातात.वकील प्रशांत पाटील यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ठरलेल्या काळावधीसाठी नियोजित वेळापत्रकानुसार अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवलं जातं."बोर्डाने मानसिक तज्ज्ञ, समोपदेशकने सीसीएलला मानसिक आरोग्यासाठी हवा तो पाठिंबा देणं आणि मदत करणं आवश्यक असतं. यामुळे अशा मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होते."महाराष्ट्र
Pune Porsche Accident Case Pune Porsche Accident News Pune Porsche Accident Latest Update Maharashtra Vishal Agrawal Shivajinagar Court Pune Police Pune Porsche Accident Updates Vedant Agrawal Pune Hit And Run Case Pune Latest News पोर्श कार अपघात पुणे पोर्श कार अपघात अपडेट पुण्यातील पोर्शे कार अपघात मराठी न्यूज पोर्शे कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लेटेस्ट मराठी न्यूज पुणे ब्रेकिंग न्यूज पुणे अपघात पोर्श कार
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कोस्टल रोडच्या वेळेत बदल, आता 16 तास खुला राहणार, वाचा Time TableMumbai Coastal Road: कोस्टल रोड हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा आहे. आता कोस्टल रोड 16 तास खुला राहणार आहे.
Read more »
महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वररायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.
Read more »
Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
Read more »
पुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, आता...Pune Porshce Accident : पुणे अपघात प्रकरणात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे.
Read more »
Saheb Bhattacharya| Sonika Chauhan Accident: পুণেতে মদ্যপ নাবালকের গাড়ি কাড়ল ২ প্রাণ, সোনিকার স্মৃতিতে রক্তাক্ত সাহেব...Saheb Bhattacharya remembering Sonika Chauhan accident case as similar to Pune Porsche Accident
Read more »
Pune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
Read more »
