Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
Weather Update s: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतेय. राज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. यामुळे उष्णतेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येतंय. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील अवकाळीचं सावट पुढील काही दिवस कायम असण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने फटका बसल्याचं दिसून आलंय. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. याचसोबत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. याचसोबत शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पासून पुढचे पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. तर 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.RCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अन...आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर; शिंदे विरुद्ध ठा...
Vidarbha Vidarbha Weather Update IMD Farmer Heat Wave Maharashtra Weather Crop Loss Rain Nagpur Weather Update IMD Weather Forecast Maharashtra Maharashtra News Marathi News Latest Marathi News News Marathic
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
Read more »
Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Read more »
नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
Read more »
Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थितीहवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे.
Read more »
Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
Read more »
Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
Read more »
