IPL 2025: मोठी बातमी! रोहित नाही हार्दिक पंड्याच्या जागी 'हा' खेळाडू असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार

Marathi News News

IPL 2025: मोठी बातमी! रोहित नाही हार्दिक पंड्याच्या जागी 'हा' खेळाडू असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार
Cricket NewsIPL 2025Hardik Pandya
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 127 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

IPL 2025 : आयपीएलमधील मोठी रायव्हलरी असणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील आयपीएल 2025 चा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चिन्नस्वामी स्टेडियमवर होईल. मात्र यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

IPL 2025 : आयपीएलमधील मोठी रायव्हलरी असणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील आयपीएल 2025 चा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चिन्नस्वामी स्टेडियमवर होईल. मात्र यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. पहिला सामना हा 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. तर आयपीएलमधील मोठी रायव्हलरी असणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील आयपीएल 2025 चा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चिन्नस्वामी स्टेडियमवर होईल. मात्र यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात 23 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्याने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतः याची घोषणा केली आहे.आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला करत हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करू शकली नाही आणि स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये ते सर्वात शेवटच्या स्थानी राहिली. आयपीएल 2024 मध्ये मुंबईने स्पर्धेतील शेवटचा सामना हा लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध त्यांचं होम ग्राउंड असणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला होता. या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंवर मॅच फी कपातची कारवाई करण्यात आली आणि एका सीजनमध्ये तिसऱ्यांदा ही चूक झाल्याने कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याला एका सामन्यासाठी बॅन करण्यात आलं. मुंबई प्लेऑफसाठी क्वालिफाय करू शकली नाही त्यामुळे लखनऊ विरुद्ध सामना हा त्यांच्यासाठी शेवटचा ठरला. IPL 2025 साठी बीसीसीआयचे 10 विचित्र नियम, ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, नियम न पाळल्यास होणार कारवाईहार्दिक पंड्यावर लागलेला बॅन हा आयपीएल 2025 मध्ये एक्सटेन्ड करण्यात आला ज्यामुळे यंदाच्या सीजनमधील पहिल्या सामन्यात हार्दिक खेळू शकणार नाही. आयपीएल 2025 मधील पहिला सामना मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत कोणता खेळाडू चेन्नई विरुद्ध मुंबईचं नेतृत्व करेल अशी चर्चा रंगली होती. एका सामन्यासाठी रोहित शर्माला मुंबई इंडियन्स कर्णधारपदाची जबाबदारी देईल अशी शक्यता होती. परंतु बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्या आणि महेला जयवर्धने यांनी चेन्नई विरुद्ध पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल अशी घोषणा केली. तर उर्वरित सर्व सामन्यांसाठी हार्दिक पंड्या हाच मुंबईचा कर्णधार असेल.रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यावर आता सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाच्या टी 20 संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत सर्व टी 20 सीरिज जिंकल्या असून कर्णधार म्हणून सूर्या यशस्वी ठरलाय. सूर्यकुमार यादवने आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सुद्धा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. यासह सूर्या मागील अनेक वर्षांपासून मुंबई संघाचा स्टार फलंदाज आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Cricket News IPL 2025 Hardik Pandya Mumbai Indians Rohit Sharma Suryakumar Yadav

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IND vs PAK: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारीIND vs PAK: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारीIndia vs Pakistan, Champion Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीला अवघे काही तास उरले आहेत. याआधीच टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती की, एका स्टार खेळाडूची तब्येत अचानक बिघडली, तर दुसऱ्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे.
Read more »

WPL 2025: महिला प्रीमियर लीगमध्ये लफडा... हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्लेस्टोनमध्ये झाली बाचाबाची, Video ViralWPL 2025: महिला प्रीमियर लीगमध्ये लफडा... हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्लेस्टोनमध्ये झाली बाचाबाची, Video ViralWPL 2025, Harmanpreet Kaur And Sophie Ecclestone: महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यूपी वॉरियर्सची सोफी एक्लेस्टोन यांच्यात बाचाबाची झाली.
Read more »

Horoscope : कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना होईल आर्थि लाभ; कसा असेल आजचा दिवसHoroscope : कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना होईल आर्थि लाभ; कसा असेल आजचा दिवस08 मार्च 2025, शनिवार हा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे.
Read more »

रोहित निवृत्ती घेणार का? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर हिटमॅनने स्वतःच केले स्पष्ट म्हणाला, 'मी अजून क्रिकेटमधून...रोहित निवृत्ती घेणार का? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर हिटमॅनने स्वतःच केले स्पष्ट म्हणाला, 'मी अजून क्रिकेटमधून...ICC Champions Trophy 2025: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. आता याबद्दल स्वतः रोहीतनेच उत्तर दिले आहे.
Read more »

IPL पूर्वी या खेळाडूवर लागला दोन वर्षांचा बॅन, BCCI ने केली कठोर कारवाईIPL पूर्वी या खेळाडूवर लागला दोन वर्षांचा बॅन, BCCI ने केली कठोर कारवाईIPL 2025 : ​ 22 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) एका खेळाडूवर आयपीएल खेळण्यापासून 2 वर्षांचा बॅन लावला आहे. त्यामुळे आता हा खेळाडू 2025 आणि 2026 च्या आयपीएलचा भाग असणार नाही.
Read more »

इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असणार की नाही? मोठी अपडेट आली समोरइंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असणार की नाही? मोठी अपडेट आली समोरIND VS ENG Test : टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तेथे दोन्ही संघांमध्ये टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. तेव्हा या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार यावर मोठी अपडेट समोर आली आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 14:54:52