'जत्रा' आणि 'यात्रा'मधील नेमका फरक माहितीये? 99% लोकांना कल्पनाच नाही

Yatra And Jatra Difference News

'जत्रा' आणि 'यात्रा'मधील नेमका फरक माहितीये? 99% लोकांना कल्पनाच नाही
YatraJatraInteresting
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 130 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

Yatra And Jatra Difference: तुम्ही सुद्धा अनेकदा अनेकदा जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द वापरले असती. मात्र या दोन शब्दांमधील फरक तुम्हाला माहितीये का?

Yatra And Jatra Difference : तुम्ही सुद्धा अनेकदा अनेकदा जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द वापरले असती. मात्र या दोन शब्दांमधील फरक तुम्हाला माहितीये का?उन्हाळा आणि ग्रामीण भागातील जत्रांचा सीझन हे समिकरण जणू काही ठरलेलं असतं.

महाराष्ट्रातील अनेक गावांच्या जत्रा या उन्हाळ्याच्या आसपासच होतात. उन्हाळ्यामध्ये फारशी शेतीची कामं नसतात त्यामुळेच या कालावधीमध्ये जत्रांचं आयोजन केलं जातं. मात्र अनेकदा गावाकडील जत्रांबद्दल बोलताना जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द वापरेल जातात. हे दोन्ही शब्द एकमेकांना पुरक म्हणून वापरले जात असले तरी त्यांचा अर्थ मात्र वेगळा आहे. आपल्यापैकी 99 टक्क्यांहून अधिक लोक जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द वाटेल तसे वापरतात. मात्र या शब्दांचा नेमका अर्थ काय हे जाणून घेऊयात...सामान्यपणे दोन्ही शब्दा एकाच अर्थाने वापरले जात असले तरी काहीवेळा वापरात फरक दिसून येतो. अनेकदा हे शब्द वापरण्याचे संदर्भही बदलू शकतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यात्रा ही प्रवास करण्याची क्रिया असते तर जत्रा हा एखाद्या ठराविक ठिकाणी उत्सवासाठी जमणारी गर्दी. म्हणजेच यात्रा हे नेहमी पर्यटन असते तर जत्रा म्हणजे मेळावा असतो. यात्रा करणारे नेहमीच लांबून येतात तर जत्रा ही स्थानिक असू शकते. जत्रा हा नेहमीच उत्सव किंवा गर्दीचा भाग असतो. वैयक्तिक यात्रा ही उत्सवाशिवाय केव्हाही करता येते. यात्रा ही धार्मिक कारणासाठी अथवा विधीसाठी असते. तर जत्रा ही मेळावा, आनंदासाठी, व्यापारासाठी, देवस्थानाभोवती असते.यात्रा हा स्रीलिंगी शब्द असून त्याचा अर्थ देवतादर्शन, तीर्थस्थान इत्यादीकरता निरनिराळ्या पुण्यक्षेत्री जाऊन तेथे तीर्थस्नान, देवदर्शन, क्षौर, ब्राह्मणभोजन इत्यादी विधि करणे असा होता. यात्रेकरूंचा समुदाय-समूह असतो. उदाहरण : आज त्या देवाची यात्रा आहे म्हणून सर्व दुकाने तिकडे गेली. तसेच फुकट पडलेला हेलपाटा किंवा निष्कारण प्रवास झाला तरी त्याला यात्रा असं म्हणतात. उदाहरण : ज्या कामाच्या उद्देशाने मुंबईस गेलो ते झाले नाही, उगीच यात्रा घडली. देशांतरास गमन; संचार; पर्यटणालाही यात्रा असं म्हणतात. यात्रकरू, यात्रस्थ, यात्रेकरी-रू, यात्रिक असे शब्दही वापरले जातात. यात्रा करणारा, तीर्थक्षेत्रास जाणारा, वारकरी असे शब्दही यात्रा करणाऱ्यांसाठी वापरले जातात असं 'दाते शब्दकोशात म्हटलं आहे. जत्रा हा सुद्धा स्रीलिंगी शब्द आहे. याचा अर्थ देवासाठी उत्सवाच्या काळात जमलेला मेळा असा होतो. यात्रेकरुंचा मेळा अशीही जत्रेची ओळखता सांगता येईल.विशिष्ट उद्देशाने एखादी व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याला यात्रा म्हणतात. आधुनिक काळात हा शब्द राजकीय, पर्यावरणवादी किंवा सामाजिक कारणांसाठी मोर्चे किंवा निदर्शने दर्शवण्यासाठी वापरला जाऊ लागला आहे. संस्कृत भाषेत यात्राचा अर्थ मिरवणूक किंवा प्रवास असा होतो. उदाहरण : पंढरपूरची यात्राजत्राची साधारण व्याख्या करायची झाल्यास, विशिष्ट ठिकाणी काही विशेष कारणांसाठी वर्षातील विशेष कालावधीसाठी लागणारा अस्थायी बाजार व करमणूक असं म्हणता येईल. एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने गावांमध्ये जानेवारी ते मे महिन्यांमध्ये जत्रांचं आयोजन केलं जातं. उदाहरण : अंगणेवाडीची जत्रा

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Yatra Jatra Interesting Interesting Facts Tourism Maharashtra Tourism Facts About Maharashtra

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

बॉम्बे HC लेफ्टिनेंट करनला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पाच वर्षाची जेल शिक्षा रद्द केली नाहीबॉम्बे HC लेफ्टिनेंट करनला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पाच वर्षाची जेल शिक्षा रद्द केली नाहीमुंबईच्या बॉम्बे उच्च न्यायालयाने एका बर्खास्त लेफ्टिनेंट करनला एका 11 वर्षाच्या मुलीचा लैंगिक शोषण आणि दुर्व्यवहार करण्यास पाच वर्षाची जेल शिक्षा रद्द केली नाही.
Read more »

'त्याने विद्यार्थी बनून मैत्री केली अन्...', जेव्हा धनश्रीने युझवेंद्र चहलचं सत्य केलं उघड; म्हणाली 'मी कधीच..''त्याने विद्यार्थी बनून मैत्री केली अन्...', जेव्हा धनश्रीने युझवेंद्र चहलचं सत्य केलं उघड; म्हणाली 'मी कधीच..'तो फलंदाजीही करत नाही आणि थेट षटकार मारला असं धनश्री वर्माने म्हटलं होतं.
Read more »

गजर असेल तरच बाहेर पडा! मुंबई, कोकणात राहणाऱ्यांना इशारा; रविवार, सोमवार अन् मंगळवारी...गजर असेल तरच बाहेर पडा! मुंबई, कोकणात राहणाऱ्यांना इशारा; रविवार, सोमवार अन् मंगळवारी...Weather Updates: मागील काही दिवसांपासूनचा ट्रेण्ड पहिल्यास पुढील आठवडा मुंबई आणि कोकणवासियांची चिंता वाढवणारा असेल यात शंका नाही.
Read more »

विधानभवनात जेव्हा समोरा समोर आले ठाकरे, शिंदे, फडणवीस... एकाचा नमस्कार, दुसऱ्याने पाहिलं पण नाहीविधानभवनात जेव्हा समोरा समोर आले ठाकरे, शिंदे, फडणवीस... एकाचा नमस्कार, दुसऱ्याने पाहिलं पण नाहीउद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने सामने आले. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले देखील नाही.
Read more »

'धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला...', पाकिस्तानच्या हिंदू क्रिकेटरने व्यक्त केल्या भावना'धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला...', पाकिस्तानच्या हिंदू क्रिकेटरने व्यक्त केल्या भावनाएका पाकिस्तनी क्रिकेटरच्या म्हणण्यानुसार, त्याला पाकिस्तानमध्ये कधीही योग्य आदर आणि मान्यता मिळाली नाही, ज्यामुळे अखेरीस तो अमेरिकेत गेला.
Read more »

'... काही फरक नाही पडत' Vadodara Hit And Run Case प्रकरणातील आरोपीवर भडकली बॉलिवूड अभिनेत्री'... काही फरक नाही पडत' Vadodara Hit And Run Case प्रकरणातील आरोपीवर भडकली बॉलिवूड अभिनेत्रीवडोदरा येथील कार अपघाताने लोकांना हादरवून सोडलं आहे. 20 वर्षीय आरोपीने दारू पिऊन गाडी वेगाने चालवत पाच जणांना धडक दिली, त्यापैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. आता बॉलिवूड अभिनेत्रीने या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 12:12:20