IPL 2025 : 22 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) एका खेळाडूवर आयपीएल खेळण्यापासून 2 वर्षांचा बॅन लावला आहे. त्यामुळे आता हा खेळाडू 2025 आणि 2026 च्या आयपीएलचा भाग असणार नाही.
IPL 2025 : 22 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून यापूर्वी बीसीसीआयने एका खेळाडूवर आयपीएल खेळण्यापासून 2 वर्षांचा बॅन लावला आहे. त्यामुळे आता हा खेळाडू 2025 आणि 2026 च्या आयपीएलचा भाग असणार नाही.
इंडियन प्रीमियर लीग या जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक असणाऱ्या स्पर्धेचा 18 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. 22 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून यापूर्वी बीसीसीआयने एका खेळाडूवर आयपीएल खेळण्यापासून 2 वर्षांचा बॅन लावला आहे. त्यामुळे आता हा खेळाडू 2025 आणि 2026 च्या आयपीएलचा भाग असणार नाही. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक याने शेवटच्या क्षणी आयपीएल 2025 मधून माघार घेतल्याने त्याच्यावर दोन वर्षांचा बॅन लावण्यात आला आहे. बीसीसीआयच्या एका नियमानुसार जो विदेश खेळाडू आयपीएल ऑक्शनमध्ये सिलेक्ट झाल्यावर दुखापतीच्या कारणाशिवाय स्पर्धेतून माघारी घेतो, अशा खेळाडूवर दोन सीजनसाठी प्रतिबंध लावण्यात येईल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार आता हा नियम हॅरी ब्रुकसाठी लावण्यात आलेला आहे. मागील वर्षीच फ्रेंचायझींसोबत BCCI ने काही नवीन नियम शेअर केले होते.हॅरी ब्रुकने आयपीएल 2025 मधून आपलं नाव परत घेतलं आहे. आपल्या इंग्लड संघातील करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हॅरीने असं केलंय. आयपीएल 2024 मध्ये सुद्धा हॅरीने त्याच्या आजीचं निधन झाल्यामुळे आयपीएलमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यावर्षी सुद्धा टूर्नामेंटला एक आठवडा असताना त्याने आयपीएलमध्ये भाग न घेण्याचा निर्णय सोशल मीडियावरून जाहीर केला. त्याने लिहिले की मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या सपोर्टरची माफी मागतो. पण इंग्लड क्रिकेटसाठी ही एक महत्वपूर्ण वेळ आहे. हॅरी ने पुढे लिहिले की, मला आगामी मालिकेच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. मला माहित आहे की प्रत्येकाला हे समजेलच असे नाही. मला तशी आशाही नाही, पण मला जे योग्य वाटतं तेच करावं लागेल. माझ्यासाठी, माझ्या देशासाठी खेळणे हे नेहमीच माझे प्राधान्य आणि केंद्रस्थान असेल.इंग्लड जूनमध्ये भारत विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ इंग्लडचा दौरा करेल. तर नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात बहुप्रतीक्षित एशेज सीरीज होईल. मात्र हॅरी ब्रुकच्या या निर्णयाने त्याच्या आयपीएल करिअरला मोठा धक्का बसला आहे. आता आयपीएल 2027 मध्ये तरी हॅरी पुनरागमन करू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
Marathi News Cricket News Harry Brook Delhi Capitals
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Metro 5: ...म्हणून ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामात 3 वर्षांची दिरंगाई झाली; माहिती अधिकारात धक्कादायक कारण उघडठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामाला 3 वर्षांचा विलंब झाला आहे. माहिता अधिकारात या विलंबामागे धक्कादायक कारण उघड झाले आहे.
Read more »
'2 मर्सिडीज दिल्यावर शिवसेनेत..', गोऱ्हेंच्या विधानावरुन राऊतांची थेट पवारांवर टीका; म्हणाले, 'तुम्ही गप्प..'Neelam Gorhe Controversial Comment: संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली असून थेट शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
Read more »
मुंबईकरांचे आज आणि उद्या 'मेगाहाल'; तब्बल 227 लोकल रद्द, वाचा लोकलचे वेळापत्रक!Mumbai Local Megablock Update: मुंबईकरांचे दोन दिवस मेगाहाल होण्याची शक्यता आहे. दोन दिवस रेल्वेकडून मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
Read more »
राहुल गांधींना कोर्टाने ठोठावला 200 रुपयांचा दंड! नक्की प्रकरण काय?लखनऊ कोर्टाने राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते असं म्हटलं आहे.
Read more »
वाढदिवसाच्या एक दिवस आधी 'या' खेळाडूवर झाली धडक कारवाई, BCCI ऐकवली 'ही' मोठी शिक्षावुमन्स प्रीमियर लीग (WPL) सामन्यादरम्यान केलेल्या एका कृतीमुळे बीसीसीआयने भारताच्या या स्टार खेळाडूवर धडक कारवाई केली आहे.
Read more »
डोंबिवली: RSS शाखेवर दगडफेक प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गमावली नोकरी; कारण...Dombivli RSS Sakha Attack: मागील दोन दिवसांपासून या प्रकरणाची डोंबिवलीमध्ये चर्चा असतानाच आता एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Read more »
