CM Eknath Shinde : बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. त्यावरून उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नेमका काय आहे हा वाद.
CM Eknath Shinde : बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. त्यावरून उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमका काय आहे हा वाद.बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याच्याराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या घटनेवर लोकांचा उद्रेक पाहायला मिळतोय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणाविरुद्ध महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर विरोधकांकडून जाणूनबुजून राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. बदलापूर प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एका खटल्याचा संदर्भ देत आरोपीला घटनेच्या दोन-तीन महिन्यात फाशीची शिक्षा सुनावल्याचं सांगितलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फाशीसंदर्भात केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत. फाशीच्या घटनेसंदर्भात SIT स्थापन करून चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. बलात्काराच्या आरोपीला अवघ्या दोन महिन्यात फासावर लटकावल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रत्नागिरीच्या भर सभेत केला. यावर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत. कोणत्या आरोपीला फासावर लटकावलं, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी, अशी मागणी संजय राऊतांनी केलीय. महाराष्ट्रापासून काय लपवताय का? असा सवालही त्यांनी केलाय.फाशीवरून विरोधकांनी हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनीही पलटवार केला. मावळमधील बलात्काराच्या घटनेत तेजस दळवी नावाच्या आरोपीला फाशी झाल्याचा दाखलाच त्यांनी कोल्हापूरच्या सभेत दिला.दोन वर्षपूर्वी मावळमधील पवनानगरच्या कोथूर्ण इथं सात वर्षीय मुलीची अपहरण करून अत्याचार आणि हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा, तर आरोपीच्या आईला सात वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात सात वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर आरोपीच्या आईला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. या संतापजनक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक केली. तेजस दळवी याच्या आईचा देखील या गुन्ह्यात सहभाग आढळला होता. खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा तिने प्रयत्न केला होता. त्याबाबत तिला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मावळमध्ये ही घटना घडल्यानंतर मावळ बंदची हाक देण्यात आली होती, तर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा एकत्र आला होता.स्पोर्ट्सलाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं,...
Badlapur Case CM Eknath Shinde Maval Case Accjsed Tejas Dalvid Crime Rape
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाजारांचीच, सरकारचा दावा...प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळलाMaharashtra Politics : शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीय. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे.
Read more »
मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.
Read more »
देशात केवळ 4 ठिकाणी तयार होतो खादीचा झेंडा, महाराष्ट्रातील 'ती' 2 ठिकाणं कोणती?Independence Day 2024:देशभरातील शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये, सोसायटीमध्ये ध्वजारोहण केले जाते. महाराष्ट्रातही स्वातंत्र्य दिनाची लगबग सुरु झाली आहे. राज्यात केवळ दोनच ठिकाणी खादीचे तिरंगा ध्वज तयार केले जातात. वर्षभर येथे ध्वज निर्मिती केली जाते. याबद्दल जाणून घेऊया.
Read more »
'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
Read more »
'...तर लाडक्या बहिणींना 1500 नाही, 3000 देऊ!', खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली ऑफरCM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना एक खास ऑफर दिली आहे. पुण्यात नेमकं काय म्हणाले? पाहा
Read more »
''वर्षा'वर फाशी दिली की राजभवानावर?' संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल; 'बलात्कारी तर...'Badlapur School Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून माहविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाचा सविस्तर तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विरोधकांचं म्हणणं काय आहे पाहूयात...
Read more »
