'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाजारांचीच, सरकारचा दावा...प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळला

Maharashtra News

'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाजारांचीच, सरकारचा दावा...प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळला
SataraWagnakhaMahayuti Government Claims
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 103 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीय. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे.

Maharashtra Politics : शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीय. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज ांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे.

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लंडनच्या म्युझियममधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं साताऱ्यात आणली. गेल्या 19 जुलैला समारंभपूर्वक वाघनखं प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साताऱ्यात पार पडलं. वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. अफजलखानाच्या वधासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनखं वापरली होती, असा दावा मंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांचा उपयोग करत स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध केला होता, तो चित्त थरारक प्रसंग पिढ्यांपिढ्या आपण सगळे ऐकत आलो. त्याच प्रसंगांमधील जे प्रमुख शस्त्र होतं ती वाघनखं अनेक वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये होती. ती आपल्या भारतात या ठिकाणी आली आणि खऱ्या अर्थाने आमची राजधानी असलेल्या साताऱ्यात वस्तू संग्रहालयात आपल्या सर्व भारतीयांना आणि शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध झाली, यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.मात्र वाघनखं प्रदर्शनात लावण्यात आलेल्या माहिती फलकावर तसा स्पष्ट उल्लेख नाही. 'इ. स. 1659 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरचा सरदार अफजल खानास ठार केल्याचा उल्लेख वाघनखाच्या डबीवर केलेला दिसून येतो. ग्रँट डफ हे ब्रिटनला परतल्यानंतरही राजघराण्यातील संग्रहात इतर वाघनखे असल्याची नोंद दिसते. त्यामुळं ही वाघनखे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारण्याकरिता वापरलेली आहेत किंवा कसे? याबाबत पडताळणी करता येणे शक्य होत नाही', असा उल्लेख फलकावर आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमशी पत्रव्यवहार केला होता. ही वाखनखं शिवाजी महाराजांची आहेत किंवा त्यांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही, असा दावा सावंतांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं ठेवण्यासाठी कोल्हापुरात 7 कोटी रुपये खर्च करून स्ट्राँग रूम बांधली जातेय. शिवशस्त्र शौर्यगाथा उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतंय. मात्र या वाघनखांच्या इतिहासावरून सुरू झालेला वाद थांबता थांबत नाहीय. जर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरलेली नसतील तर इतका पैसा खर्च करण्याचं कारण काय, हा सवाल कायम आहे.स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Satara Wagnakha Mahayuti Government Claims Different Mention On Exhibition Chatrapati Shivaji Maharaj Satara Waghnakh Pradarshan सातारा वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज महायुती

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासालंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासाLondon tiger cub:महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे.
Read more »

लंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासालंडनहून आणलेली वाघनखं महाराजांची नाहीत? म्युझियमनेच केला मोठा खुलासाLondon tiger cub:महाराष्ट्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघ नखे आणत असल्याचा दावा केला आहे.
Read more »

लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?लंडनहून येणारी 'ती' वाघनखं महाराजांची नाहीत? 'या' ठिकाणी आहेत खरी वाघनखं?राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. मात्र खरंच ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली होती का या वर अनिश्चितता असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय.
Read more »

वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'कोणीही महाराजांनी ही वाघनखं....'वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'कोणीही महाराजांनी ही वाघनखं....'राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखं आणणार आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या (Afzal Khan) वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलं आहे.
Read more »

'वाघनखं अफजल खान वधावेळीची', जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, 'कोणीच दावा केला...''वाघनखं अफजल खान वधावेळीची', जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, 'कोणीच दावा केला...'वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीत तफावत आढळून आली आहे. जीआरमध्ये वाघनखं अफजल खान वधावेळीची असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
Read more »

Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
Read more »



Render Time: 2026-04-02 13:09:26