Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असण्यामागील कारण आहे खाली दिसणारा फोटो. नेमकं हे प्रकरण काय पाहूयात...
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असण्यामागील कारण आहे खाली दिसणारा फोटो. नेमकं हे प्रकरण काय पाहूयात.या फोटोवर पक्षाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रियाही नोंदवली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी केलेल्या पोस्टवरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात असतानाच स्वत: राऊत यांनी यावरुन भाष्य केलं आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असण्यामागील कारण आहे खाली दिसणारा फोटो. नेमकं हे प्रकरण काय पाहूयात...या फोटोवर पक्षाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रियाही नोंदवली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी केलेल्या पोस्टवरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात असतानाच स्वत: राऊत यांनी यावरुन भाष्य केलं आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देताना राऊत यांना त्यांच्या या सूचक पोस्टबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी, '2 ते 3 दिवस थांबा तुम्हाला ट्वीटचा अर्थ कळेल,' असं म्हटलं आहे. त्यामुळे राऊतांनी पोस्ट केलेला हा फोटो खरोखरच महाराष्ट्रातील एखाद्या राजकीय भूकंपाची चाहूल तर नाही ना अशी चर्चाही दबक्या आवाजात होऊ लागली आहे.संजय राऊतांनी शुक्रवारी सायंकाळी केलेल्या पोस्टमध्ये एक बकरा लाकडावर उभा असल्याचं दिसत आहे. राऊत यांनी या पोस्टमध्ये बकऱ्याचा फोटो अटॅच करुन,"खबर पता चली क्या?" अशी चार शब्दांची कॅप्शन दिली आहे. तसेच त्यांनी या पोस्टच्या खाली,"ए. सं. शी. गट…" असं लिहिलेलं आहे. संजय राऊत हे सामान्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचा शिंदेंच्या नावाच्या अद्याक्षरांवरुन 'ए. सं. शी. गट' असा उल्लेख करतात. त्यावरुनच त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो एकनाथ शिंदेंना डिवचण्यासंदर्भात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राऊत यांच्या या पोस्टवरुन तर्क-वितर्क लढवले जात असतानाच त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर जवळपास 12 तासांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोस्टबद्दल सूचक विधान केलं आहे.तुम्ही ट्विटरवर केलेल्या पोस्टचा अर्थ काय? असं राऊत यांनी विचारलं असता त्यांनी,"महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. त्या बकऱ्याला उभा केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की, फार शहाणपणा केला तर मारू. गप्प उभं राहायचं आणि बे बे करत जायचं. आता बास झालं तुमचं खूप ऐकलं, असं दिल्लीत या बकऱ्याच्या कानात कोणीतरी सांगितलं आहे," असं उत्तर दिलं.पुढे पत्रकाराने तुम्ही या पोस्टखाली 'ए. सं. शी. गट' असा उल्लेख केला आहे. त्यावरुन राऊतांनी पत्रकाराला,"तुम्हाला यु. बी. टी. माहित आहे तर एस एन शीं गट माहित असायला हवा, अभ्यास करा थोडा" असा खोचक सल्ला दिला.आता राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये खरोखरच काही घडतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यावरुन बकऱ्याचा हा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपही आणू शकतो अशी जोरदार चर्चा आहे. पण नेमकं होणार काय याची नेमकी कल्पना ना राऊतांनी दिली आहे ना यावर कोणी प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसातील राजकीय घडामोडींचा संदर्भ राऊतांच्या या ट्वीटशी जोडला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे.महाराष्ट्र बातम्या
Maharashtra Politics UBT MP Sanjay Raut Goat Creepy Caption
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
11 मजल्यांचं रेल्वे स्टेशन... महाराष्ट्रातला 'हा' मेगा प्रोजेक्ट मुंबईपासून हाकेच्या अंतरावर; सुविधांची यादी पाहाच11 Story Railway Station: या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या सुविधांची यादी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
Read more »
Horoscope : डोळे झाकून विश्वास करणं बंद करा; आजचा दिवस खूप महत्त्वाचा16 मार्च 2025, रविवार आहे आणि तुम्हाला तुमचे दैनिक राशिभविष्य जाणून घ्यायचे आहे, तुमच्या राशीनुसार तुमचा दिवस कसा जाणार आहे. तर काळजी करू नका.
Read more »
Weather News : राज्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट, कुठे उष्णतेची लाट तर कुठे पावसाच्या सरीMaharashtra Weather Update : पुढील काही दिवस उष्णतेची लाट पसरणार आहे. तर कुठे पावसाच्या सरी देखील बरसणार आहे. पुढचे 3 दिवस महाराष्ट्रातील तापमानात बदल होताना दिसेल.
Read more »
'जत्रा' आणि 'यात्रा'मधील नेमका फरक माहितीये? 99% लोकांना कल्पनाच नाहीYatra And Jatra Difference: तुम्ही सुद्धा अनेकदा अनेकदा जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द वापरले असती. मात्र या दोन शब्दांमधील फरक तुम्हाला माहितीये का?
Read more »
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यातील घडामोडींचाआढावा एकाच क्लिकवर जाणून घ्याMaharashtra Breaking News Live Updates : राज्यातील राजकीय घटना ते सामान्य नागरिकांसाठीच्या प्रत्येक घडामोडींचाआढावा एकाच क्लिकवर जाणून घ्या.
Read more »
शरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या, काका-पुतण्यामध्ये चाललंय काय?राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं
Read more »
