11 Story Railway Station: या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या सुविधांची यादी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
11 मजल्यांचं रेल्वे स्टेशन. महाराष्ट्रातला 'हा' मेगा प्रोजेक्ट मुंबईपासून हाकेच्या अंतरावर; सुविधांची यादी पाहाच 11 Story Railway Station: या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या सुविधांची यादी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
11 मजल्यांचं रेल्वे स्टेशन... महाराष्ट्रातला 'हा' मेगा प्रोजेक्ट मुंबईपासून हाकेच्या अंतरावर; सुविधांची यादी पाहाच 11 Story Railway Station: या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या सुविधांची यादी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.11 Story Railway Station: मुंबईच्या उपनगरांपैकी एक महत्त्वाचं शहर असलेल्या ठाण्यामध्ये चक्क 11 मजल्यांचं रेल्वे स्थानक उभारलं जाणार आहे. या रेल्वे स्थानकामध्ये केवळ रेल्वे गाड्या येणार-जाणार नाहीत तर इथे अनेक सुविधा उपलब्ध असतील. या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनाचीही विशेष सोय केली जाणार आहे. या बहुमजली स्थानकामध्येच मॉल, कार्यालयीन व्यवस्था आणि रिटेलची दुकानं असतील. हा प्रोजेक्ट रेल्वे कनेक्टीव्हिटीबरोबरच सरकारला महसूल मिळवून देण्यात फायद्याचे ठरतील.ठाणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 10 ए जवळ 9000 वर्ग मीटरवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. याचबरोबर 24,280 वर्गमीटरची जागा लीजवर देण्यासाठी उपलब्ध असेल. या जागा 60 वर्षांच्या लीजवर दिल्या जातील असं सांगितलं जात आहे. हा प्रकल्प 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. हे स्थानक बस आणि मेट्रो मार्गाने जोडलं जाणार आहे.या रेल्वे स्थानकाच्या बेसमेंटमध्ये पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच या ठिकाणी इतरही सोयी सुविधा पुरवल्य जाणार आहे. याच स्थानकामधील एक डेक बस गाड्यांसाठी असणार आहे. येथून स्थानिक म्हणजेच शहराअंतर्गत जाणाऱ्या बस मिळतील. तळाच्या दोन मजल्यांवर या सर्व सुविधा पुरवल्या जातील. वरच्या मजल्यांवर कमर्शिअल दुकानं आणि इतर सुविधा पुरवल्या जातील. या मजल्यांवर शॉपिंग आणि रिटेल दुकानं तयार केली जातील.या रेल्वे स्थानकामुळे केवळ कनेक्टीव्हिटी वाढणार नाही तर लोकांना अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. याच इमारतीमध्ये फूड कोर्ट, रेस्तराँही असतील. या ठिकाणी लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी गेमिंग झोनही असेल. कार्यालयीन कामांसाठी येथे जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हॉटेल आणि इतर सेवांबरोबरच या ठिकाणी कोचिंग इन्स्टीट्यूसही उभारले जाणार आहेत.या स्थानकाला ट्रेनबरोबरच इतर सार्वजनिक वाहतुक सेवांशीही जोडलं जाणार आहे. यामध्ये 2.24 किलोमीटरचा एलिव्हेटेड मार्ग तयार केला जणार आहे. हा मार्ग थेट इस्टर्न एक्सप्रेस-वेशी कनेक्ट केला जाणार आहे. त्यामुळे थेट रेल्वे स्थानकावरुन ये-जा करता येईल. प्लॅटफॉर्म 10 जवळ बससाठी विशेष डेक तयार केला जाणार आहे. म्हणजे ट्रेनने आलेल्यांना थेट बस पकडता येईल. हा प्रकल्प रेल्वे विकास प्राधिकरण आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त उपक्रमातून साकारला जात आहे.
Thane Station Central Line 11 Story Building Retail Shop Gaming Zone Mall Bus Stop Parking
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट में 50,000 से अधिक घरों के सर्वे का रिकॉर्ड हासिलDharavi Redevelopment Project: पिछले वर्ष दिसंबर में धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड (DRPP) ने नाम बदलकर नवभारत मेगा डेवलपर्स प्राइवेट लिमिटेड (NMDPL) रख लिया था.
Read more »
अयोध्या में वेलनेस सिटी, सुविधाएं होंगी खास, योगी सरकार का मेगा प्रोजेक्टअयोध्या में बनने जा रही वेलनेस सिटी, सुविधाएं होंगी खास, योगी सरकार का मेगा प्रोजेक्ट
Read more »
Video : 'तुम भी कविता पढोगे... मराठी में?' आशाताईंच्या प्रश्नाचं विकी कौशलनं खास शैलीत दिलं उत्तर...Video : छावा (Chhaava) या चित्रपटाच्या निमित्तानं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता विकी कौशल यानं पुन्हा जिंकलं अख्ख्या महाराष्ट्राचं मन.... हा व्हिडीओ पाहाच
Read more »
226 गांवों को मिलाकर बनेगी 'ओलंपिक सिटी', जानें इस मेगा प्रोजेक्ट की खास बातें226 गांवों को मिलाकर विकसित होगी 'ओलंपिक सिटी', जानें इस मेगा प्रोजेक्ट की खास बातें
Read more »
Weather News : पुढील 24 तासांत उन्हाचा मारा आणखी तीव्र; मुंबईपासून विदर्भापर्यंत नुसती होरपळ, कधी कमी होणार हा दाह?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून उकाड्याला प्रचंड सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »
इथून पुढं रेल्वेच्या जेवणात... केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय बदलणार?Indian Railway : रेल्वेचं तिकीट काढताना काही गोष्टी ज्याप्रमाणं लक्षपूर्वक वाचण्यात येतात, अगदी त्याचप्रमाणं रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसंदर्भात रेल्वे मंत्र्यांचा मोठा निर्णय
Read more »
