अपघातानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफच्या चेहऱ्याला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती.
'मी मेलो असतो तर बरं.', युवराजला भिडलेल्या इंग्लंडच्या खेळाडूचा भीषण कार अपघात; ओळखणंही झालं होतं कठीणUpdated: Apr 24, 2025, 06:40 PM IST बीबीसीच्या टॉप गियरसाठी चित्रीकरण करताना इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ'चा 2022 मध्ये एक भयानक कार अपघात झाला.
'मी मेलो असतो तर बरं...', युवराजला भिडलेल्या इंग्लंडच्या खेळाडूचा भीषण कार अपघात; ओळखणंही झालं होतं कठीणUpdated: Apr 24, 2025, 06:40 PM IST बीबीसीच्या टॉप गियरसाठी चित्रीकरण करताना इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ'चा 2022 मध्ये एक भयानक कार अपघात झाला. तो चालवत असलेली तीन चाकी गाडी उलटल्याने त्याच्या चेहऱ्याला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर, फ्लिंटॉफवर शस्त्रक्रिया करावी लागली. या अपघातानंतर, बीबीसीने मालिकेची निर्मिती थांबवली. तसंच इंग्लंडच्या माजी खेळाडूला 9 दशलक्ष पौंडची भरपाई देण्यात आली. आता, डिस्ने प्लसच्या नवीन डॉक्युमेंट्रीत बोलतान फ्लिंटॉफने हा अनुभव अत्यंत क्लेशकारक होता असं सांगितलं आहे. "मला वाटलं होतं की माझा मृत्यू झाला आहे. कारण मी शुद्धीत होतो पण काही दिसत नव्हतं," अशी आठवण त्याने सांगितली. पुढे तो म्हणाला,"मी विचार करत होतो की, हीच ती वेळ आहे का? मला काय सांगायचं आहे हे तुम्हाला समजत आहे ना? पुढील काही क्षण मी अंधारात होतो. माझी टोपी डोळ्यांवर आली होती. मी ती वर केली आणि विचार केला नाही मी मेलेलो नाही, जिवंत आहे. मी टॉप गेअरच्या ट्रॅकवर आहे, हा स्वर्ग नाही" फ्लिंटॉफ'ला आपला सगळा चेहराच फुटला आहे असं वाटत होतं. तो म्हणाला,"मला वाटलं माझा चेहरा फुटला आहे. मी मृत्यूला घाबरलो होतो". ही घटना 13 डिसेंबर 2022 रोजी सरे येथील डन्सफोल्ड पार्क एअरोड्रोम येथे घडली. बीबीसीमधील वृत्तानुसार, फ्लिंटॉफ उघड्या टॉपवर असलेली मॉर्गन सुपर 3 चालवत असताना गाडी उलटली आणि घसरली."जसंजसं ते जाऊ लागलं, मी जमिनीकडे पाहिलं आणि मला माहित होते की जर मला इथे बाजूला मार लागला तर माझी मान मोडेल, किंवा जर मला डोक्यावर मार लागला तर मी मरेन. सर्वात चांगली संधी म्हणजे तोंड खाली करणे. आणि मग मला आठवतंय की आदळलो आणि माझ्या डोक्याला मार लागला," असं तो पुढे म्हणाला. "पण नंतर मला बाहेर खेचण्यात आले. गाडी उलटली, आणि मी गाडीच्या मागच्या बाजूने वरती गेलो. सुमारे 50 मीटरपर्यंत धावपट्टीवर तोंड फरफटत गेलं आणि मग मी गवतावर आदळलो आणि नंतर पुन्हा पलटी झाली," असं तो म्हणाला. फ्लिंटॉफवर उपचार करणारे सर्जन जहराद हक यांनी डॉक्युमेंट्रीत सांगितलं की, त्याला झालेल्या दुखापती खूप गुंतागुंतीच्या होत्या. त्यांने त्याच्या ओठाचा वरच्या एक महत्त्वाचा भाग - त्वचा आणि काही अंतर्गत स्नायू - आणि खालचा ओठ देखील गमावला," असल्याची माहिती त्यांनी दिली. "हे ऐकायला फार विचित्र वाटत आहे. पण माझ्यातील एका भागाला आपला मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं असं वाटत होतं," अशी कबुलीही त्याने दिली."मला स्वत:ची हत्या करायची नाही. दोन गोष्टींची गफलत होऊ नये. मी तशी इच्छा व्यक्त करत नव्हतो तर विचार करत होतो की हे फार सोपं झालं असतं. पण आता मी सर्वतोपरी विचार करतो तेव्हा लक्षात येतं की, उद्या पुन्हा सुर्योदय होणार आहे. मझी मुलं आजही मला मिठी मारत आहे. कदाचित मी आता चांगल्या जागी आहे," असं तो म्हणाला.
England Andrew Flintoff Cricket Zee Sports
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
...तर अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांचं लग्न झालं असतं; रणधीर कपूर यांनी मागणीही घातली होती, आज अविवाहित राहण्याची वेळछावा चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अक्षय खन्नाने आपल्या लग्न आणि मुलांमध्ये काही रस नसून आयुष्यभर अविवाहित राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण एक काळ असा होता जेव्हा त्याचं आणि करिश्माचं लग्न जवळपास ठरलं होतं.
Read more »
वीज पडून 13 जण दगावले! CM ने जाहीर केली मदत; उन्हाळ्यात भरदुपारी विजांचा तांडव कारण...Lightning Strikes 13 Killed: पृथ्वीवर या पडणाऱ्या विजेचा व्होल्ट कोटींमध्ये असतो तर आपल्या घरात येणाऱ्या विजेचे व्होल्टेज 240 आहे.
Read more »
बोकडाचा बळी देण्यासाठी चालेली Scorpio कोरड्या नदीपात्रात कोसळली; चौघांचा मृत्यू, बोकड मात्र वाचलाFour Dead Sacrificial Goat Survives: स्कॉर्पिओ कारने जात असताना ही कार कोरड्या नदीच्या पात्रातमध्ये पडली आणि भीषण अपघात झाला.
Read more »
तमिलनाडु के तिरुवन्नामलाई में भीषण सड़क हादसा, कार-बस की टक्कर में चार लोगों की मौततमिलनाडु के तिरुवन्नामलाई में भीषण सड़क हादसा, कार-बस की टक्कर में चार लोगों की मौत
Read more »
तुम्ही एकमेकांना कधी डेट का केलं नाही? जेव्हा शाहरुख-काजोलने केला खुलासा, म्हणाले 'बाजीगरच्या वेळी 6 महिने...'शाहरुख खान आणि काजोल यांनी एका मुलाखतीत जर आपण सिंगल असतो तर एकमेकांना डेट केलं असतं का? यावर भाष्य केलं होतं.
Read more »
Maharahstra Breaking News LIVE: जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात बापलेकीचा जागीच मृत्यूMaharahstra Breaking News LIVE: राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा ठळक आढावा घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Read more »
