Uddhav Thackeray Shivsena: गेला महिनाभर सरकारच्या आर्थिक मदतीची वाट बघत असलेल्या बळीराजाची आठवण राज्यकर्त्यांना झाली, असा उल्लेख करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray Shivsena : राज्यातील सत्ताधारी स्वतःला वेगवान, गतिमान वगैरे म्हणत असतात. मात्र त्यांची ही गतिमानता फक्त निवडणुकीच्या तोंडावरच दिसते. आताही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि राज्यकर्त्यांना ‘वेगवान’ कारभाराची उचकी लागली.
या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अवघ्या काही तासांत सरकारचे 220 पेक्षा अधिक जीआर म्हणजे शासन निर्णय निघाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही 21 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बदल्या-बढत्या मार्गी लावून सत्तापक्षांतील मंडळींना खूश करण्यात आले. निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असल्याने महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींवर कोट्यवधी रुपयांच्या निधीची खैरात करण्यात आली. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशिष्ट नागरी सुविधा पुरविण्यासाठीही निधी देण्यात आला आहे. वेगवेगळ्या समाजांच्या विकासासाठी स्थापन केलेल्या महामंडळांनाही विविध योजना राबविण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली. गेला महिनाभर सरकारच्या आर्थिक मदतीची वाट बघत असलेल्या बळीराजाची आठवण राज्यकर्त्यांना झाली आणि कृषीसंबंधित योजनांसाठी काही हजार कोटी रुपये देण्यात आले. राज्यातील ‘एक फुल दोन हाफ सरकार’चा कारभार हा असा जनतेसाठी नव्हे, तर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सुरू आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.निवडणुकीचा मुहूर्त का पाहिला?स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांचे घोडे तब्बल तीन-साडेतीन वर्षांनंतर न्हाले आहे. त्यामुळे या घोड्यांना ‘खरारा’ करणारे निर्णय एका फटक्यात राज्यकर्ते घेतील हे अपेक्षितच होते. प्रश्न इतकाच आहे की, राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नसता तर शेतकऱ्यांपासून विविध समाजघटकांचीही आठवण एवढ्या तातडीने सत्ताधाऱ्यांना आली असती का? पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी सरकारच्या मदतीची गरज आहे याची जाणीव या मंडळींना झाली असती का? मात्र प्रश्न 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका व त्यातील वर्चस्वाचा आहे. त्यामुळे सत्ताधारी खडबडून जागे झाले. शेतकऱ्यांपासून सरकारी कंत्राटदारांपर्यंत सर्वांची आठवण त्यांना झाली. मुख्यमंत्र्यांनी तर म्हणे, दोन दिवसांपूर्वी कामे वेळेत पूर्ण करण्यावरून कंत्राटदार-ठेकेदारांना दम भरला. सरकारची कामे वेळेत पूर्ण व्हायलाच हवीत, परंतु हा दम भरायला मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त का पाहिला? ही फुकाची दमबाजी करण्यापेक्षा कामे वेळीच पूर्ण का होत नाहीत? त्यासाठी जबाबदार कोण आहेत? कंत्राटदारांचे कोट्यवधीचे देणे का थकले आहे आणि त्यातून अनेक कंत्राटदारांना आत्महत्या का कराव्या लागल्या? या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी शोधली पाहिजेत, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत...एरवी संथ आणि मंदगतीने कारभार करणारे राज्यातील सत्ताधारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार म्हणून ‘गतिमान’ झाले. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत 21 निर्णय आणि दिवसभरात 220 शासन निर्णय तसेच बढत्या-बदल्यांचा ‘धडाका सेल’ त्यांनी लावला. अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या 68 लाख शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई मिळावी आणि त्यांचीही दिवाळी प्रकाशमान व्हावी यासाठी हे सरकार गतिमान झाले नाही. 33 जिल्ह्यांपैकी काहीच जिह्यांत अंतिम पंचनामे पूर्ण झाले ही यांची गतिमानता! सर्व विरोधी पक्षांनी सदोष मतदार याद्यांचे जाहीर पोस्टमॉर्टम एकमुखाने करूनही त्यातील सुधारणांबाबत ही मंडळी ढिम्म आहेत. उलट विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जनतेवर लादण्याचा ‘वेगवान’ निर्णय त्यांनी घेतला. तुमची ही गतिमानता एरवी कुठे शेण खाते? ‘बोलबच्चनगिरी जोरात आणि अंमलबजावणी कोमात’ असाच या सरकारचा कारभार सुरू आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
Uddhav Thackeray Shivsena Local Bodies Election Farmer Issue Government Decisions
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
शिवाजी पार्कवरील भाषणाचा ट्रेलर? 'तुम्ही जनतेच्या बाजूने आहात की...'; ठाकरेंच्या सेनेकडून सरकारवर हल्लाबोलUddhav Thackeray Shivsena Dasara Melava At Shiv tirth: मुंबईच्या शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या राजधानीतून हिंदुहृदयसम्राटांनी वर्षानुवर्षे हा विचारांचा वन्ही चेतवून देशाला जाग आणली.
Read more »
धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजपाने साधला निशाणा
Read more »
'मोदी, शाह, राजनाथ हे तिघेही...', ठाकरे सेनेचा मोहन भागवतांना टोला; '11 वर्षांपासून देशाची...'Uddhav Thackeray Shivsena RSS Chief Mohan Bhagwat: भागवत यांनी पुन्हा एकदा अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं विषयाला हात घातलाय.
Read more »
Uddhav Thackeray : '50 खोके घेतले त्यांच्याकडे...तुम्ही तो चाबूक दिला', हंबरडा मोर्चातून महायुतीवर उद्धव ठाकरेंनी ओढला आसूडUddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Read more »
ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारेbmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : कसा पुढे गेला ठाकरे बंधूंच्या भेटीला सिलसिला? जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या कारणानं झाली भेट?
Read more »
'राज-उद्धव एकत्र आल्याने...', राऊतांचा टोला! 'शिंदे फडणवीसांना संपवायला...', 'पुरुषांत बाळंत व्हायची...'Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: भाऊबंदकीचा खणखणाट राज्यात रोज सुरू आहे. त्यांच्यात मनोमीलन होणे शक्य नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
Read more »
