Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: भाऊबंदकीचा खणखणाट राज्यात रोज सुरू आहे. त्यांच्यात मनोमीलन होणे शक्य नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: शिंदे यांच्या पोटात भीतीचा गोळा आला व सारखे पोटात दुखतेय ते उद्धव व राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे, असं राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे यांची अवस्था बिकट झाली.
ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात मराठी एकजूट भक्कम झाली. त्यामुळे भाजपास प्रिय असलेले दुहीचे नाट्य महाराष्ट्रात तरी संपले. फोडा, झोडा, राज्य करा या ब्रिटिश नीतीचा अवलंब भाजपने सतत केला. ठाकरे एक झाल्यामुळे या नीतीला तडे गेले, असा दावा राऊतांनी केला आहे. 300 कोटी रुपयांची लाच ऑफरभाजपमध्ये एकेकाळी धर्मराज होते, आज दुर्योधन वाढले, असे जुनेजाणते हिंदुत्ववादी बोलताना दिसतात. त्यात शिंदेंसारख्या भाजपच्या उपवस्त्रांनी संघाच्या नेतृत्वालाही भ्रष्ट केले, हे उघडपणे बोलले जाते. त्यामुळे महाराष्ट्रावर सुरू असलेले भ्रष्टाचाराचे राज्य नागपूरपासून मुंबईपर्यंत उघड्या डोळ्यांनी सहन केले जात आहे, असं राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदराच्या लेखात म्हटलं आहे. सत्यपाल मलिक आता नाहीत. ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असताना एका ऊर्जा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी संघाचे राम माधव यांनी राज्यपाल मलिकांवर दबाव आणला व संघाच्या नेत्यांनी या कामासाठी मलिक यांना 300 कोटी रुपयांची लाच ऑफर केली. महाराष्ट्रात व इतर राज्यांत अशी मोठी कामे करून घेण्यासाठी आता संघाचे प्रमुख लोक मध्यस्थांची भूमिका बजावतात व शिंदे यांच्यासारखे लोक संघाला त्यांच्या भ्रष्टाचारात सामील करून घेतात. या कामी शिंदे यांची फडणवीसांशी भाऊबंदकी व संघाशी मनोमीलन झालेच आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.पुरुषांत बाळंत व्हायची व्यवस्था असती तर...एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी भावासारखे सांभाळले व राजकारणात मोठे केले. त्या शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा स्वार्थासाठी घात केला. ही भाऊबंदकीच आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी वेगळे राहणे हे महाराष्ट्राला परवडणार नाही. दोन बंधूंनी एकत्र यावे यासाठी मातोश्रीची परवानगी न घेता एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक व राजन विचारे हे 10-12 वर्षांपूर्वी श्री. राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यातील शिंदे, सरनाईक आता अमित शहांच्या तंबूत सामील झाले व विचारे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहेत. त्याआधी शिंदे व सरनाईक यांच्याबरोबरच्या वैयक्तिक भेटीत मला अनेकदा सांगितले की, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील, असे काहीतरी करा. महाराष्ट्रावर भगवा फडकवण्यासाठी हे आवश्यक आहे. भाजपला रोखायचे असेल तर दोन भावांनी एकत्र यावे. त्यांचे म्हणणे तेव्हा खरेच होते, पण आता दोन बंधू एकत्र आले तर शिंदे यांच्या पोटात कळा सुरू झाल्या. पुरुषांत बाळंत व्हायची व्यवस्था असती तर त्यांच्या पोटातून भाऊबंदकीचा गोळाच निघाला असता, असा टोला राऊतांनी लगावला आहे.नक्की वाचा >>शिंदे हे नव्या राजकारणातले राघोबा, राऊतांचा टोला; अति महत्त्वाकांक्षी, लोभी, लाचार ही सर्व...भाऊबंदकीचा खणखणाट राज्यात रोज सुरूसध्या भाजप आणि शिंदे हे भाऊ भाऊ असल्याचे चित्र उभे केले जाते ते झूठ आहे. शिंदे हे फडणवीस यांना संपवायला निघाले आहेत आणि फडणवीस यांना शिंदे व त्यांचे लोक आसपास नको आहेत. या नव्या भाऊबंदकीच्या ठिणग्या महाराष्ट्रात रोज पडत आहेत. एक उदाहरण देतो व हा भाऊबंदकीचा अंक संपवतो. ठाण्यात एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक यांच्यात भाऊबंदकीच्या मारामाऱ्या रोज सुरू आहेत. ठाण्याच्या पोखरण येथे एका ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन भाजप आमदार केळकर यांनी उपमुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री शिंदे येण्याआधीच उरकून टाकले व निघून गेले. हा भाऊबंदकीचा खणखणाट राज्यात रोज सुरू आहे. त्यांच्यात मनोमीलन होणे शक्य नाही. तेव्हा शिंदे हे भाऊबंदकी नाट्यात स्वत:च अडकून पडले आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray ALLIANCE MP Sanjay Raut Slams Dcm Eknath Shinde
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
राज-उद्धव यांच्या पुढच्या भेटीत युतीवर शिक्कामोर्तब? नेमकं काय घडतंय?Thackeray Brother Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेटीगाठींचं सत्र सुरू आहे.
Read more »
धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजपाने साधला निशाणा
Read more »
Uddhav Thackeray : '50 खोके घेतले त्यांच्याकडे...तुम्ही तो चाबूक दिला', हंबरडा मोर्चातून महायुतीवर उद्धव ठाकरेंनी ओढला आसूडUddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची मोठी बातमी; राज ठाकरे मातोश्रीवर दाखल; दोघांमध्ये काय चर्चा?Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहचले आहेत.
Read more »
ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारेbmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : कसा पुढे गेला ठाकरे बंधूंच्या भेटीला सिलसिला? जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या कारणानं झाली भेट?
Read more »
'आम्हाला राज काय, उद्धव ठाकरेही नको', काँग्रेसच्या भाई जगताप यांनी विधानावर दिलं स्पष्टीकरण, 'आयुष्यभर पक्षासाठी...'Bhai Jagtap Clarification on Raj-Uddhav Thackeray Statement: राज ठाकरे सोडा आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केल्यानंतर आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Read more »
