Raj thackeray to make Big Revelations : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींचे वारे...
Raj thackeray to make Big Revelations : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर या अतिशय महत्त्वाच्या अशा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत, तोच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या भेटीगाठी आणि कुटुंबाची जवळीक पाहता मनसे- उद्धव ठाकरेंची सेना यांच्यामध्ये युतीची अधिकृत घोषणाच बाकी आहे याचीच चर्चा सामान्य नागरिक/ मतदारांमध्ये आहे.
नेतेमंडळींनीही याबाबतच्या चर्चा नकाराल्या नसल्यानं आणि युतीचे संकेत मिळत असल्यानं आता ही अधिकृत घोषणा कधी होते याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना येत्या काळात घडतील यास कारण ठरतील त्या म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मतदार, मतदान, निवडणूक या साऱ्या धामधुमीत कैक राजकीय समीकरणं बदलत असून काही समीकरणं नव्यानं आकार घेत असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत. कुठे आणि कधी करणार मोठा दावा? गुरुवारी मुंबईच्या वांद्रे इथं असणाऱ्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्याच आलेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे मतदार यादीतील भोंगळ कारभार, बोगस मतदारांची नावं, मतचोरीसह ईव्हीएममधील फेरफार या मुद्द्यांवर बहुतांश गोष्टी जाहीरपणे उपस्थितांपुढे मांडणापर आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मागील काही दिवसांपासून मनसेतील बड्या नेत्यांची उपस्थिती पाहता या बैठकांमध्ये सदर दाव्यांसंदर्भातील चर्चा आणि माहितीवर दृष्टीक्षेप टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. राज ठाकरेंच्या स्पष्ट सूचना... 1 नोव्हेंबरला सत्याचा मोर्चामध्ये मनसेचं वेगळं अस्तित्वं दाखवून देत निवडणूक आयोगाविरोधात या मोर्चाची हाक देण्यात आली आहे. यासाठी मनसैनिकांनी वेळेत पोहोचावं अशा स्पष्ट सूचना करत यासाठी रेल्वेनं प्रवास करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी बैठकीदरम्यान दिल्याचं म्हटलं जात आहे. हेसुद्धा वाचा : Bank News : SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; पैशांची देवाणघेवाण अन् हे व्यवहार बदलणार... विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर घेतलेला आक्षेप पाहता त्यावर आयोग उत्तर देणं अपेक्षित असतानाच ही उत्तरं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेते नेते का देतात, त्यांना आमचे प्रश्न कळत नाहीयेत का? असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला असून, या मोर्चामध्ये सत्ताधाऱ्यांनीही सहभागी व्हावं असं अगत्याचं निमंत्रणही त्यांनी दिलं आहे. तेव्हा आता राज ठाकरे मेळाव्यात नेमके कोणते गौप्यस्फोट करतात आणि सत्याचा मोर्चा पाहून सत्ताधाऱ्यांची त्यावर काय प्रतिक्रिया असते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. FAQराज ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट कशाबाबत आहे आणि तो का महत्त्वाचा आहे?राज ठाकरे यांचा हा गौप्यस्फोट मुंबई महापालिका निवडणुकीशी संबंधित आहे. ते मतदार यादीतील भोंगळ कारभार, बोगस मतदारांची नावे, मतचोरी आणि ईव्हीएममधील फेरफार यांसारख्या मुद्द्यांवर जाहीरपणे बोलणार आहेत. हा मेळावा कधी आणि कुठे होणार आहे?गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मागील काही दिवसांत मनसेतील बड्या नेत्यांच्या बैठका झाल्या असून, यात या दाव्यांबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.मेळाव्यात राज ठाकरे यानुसार कोणत्या मुद्द्यांवर बोलणार?मतदार यादीतील अनियमितता, बोगस मतदारांची नावे, मतचोरी आणि ईव्हीएममधील संभाव्य फेरफार हे मुख्य मुद्दे आहेत. हे मुद्दे उपस्थितांपुढे मांडून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जातील.
Mns Raj Thackeray Big Revelations Voter List Fraud Mumbai News Bmc Elections Marathi News News Latest News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारेbmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : कसा पुढे गेला ठाकरे बंधूंच्या भेटीला सिलसिला? जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या कारणानं झाली भेट?
Read more »
..मग कोणी कोणाला काढले? राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्याने अधिकारी थक्क; 'मतदार याद्या..'Raj Thackeray Aggressive Questions: विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटायला गेले असता त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले.
Read more »
'आम्हाला राज काय, उद्धव ठाकरेही नको', काँग्रेसच्या भाई जगताप यांनी विधानावर दिलं स्पष्टीकरण, 'आयुष्यभर पक्षासाठी...'Bhai Jagtap Clarification on Raj-Uddhav Thackeray Statement: राज ठाकरे सोडा आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केल्यानंतर आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Read more »
राजकारणातील कढीपत्ता आणि चकली कोण? निलम गोऱ्हेंनी काय उत्तरं दिली पाहा, राऊतांना म्हणाल्या 'ही नागगोळी...'Neelam Gorhe on Raj Thackeray: निलम गोऱ्हे यांना झी 24 तास ने फराळासंदर्भात प्रश्न विचारत त्यांची नेत्यांशी तुलना करण्यास सांगितलं असता त्यांनी काय उत्तरं दिली पाहा.
Read more »
...म्हणून महेश कोठारे भाजपाचे, मोदींचे भक्त झाले असतील! राज ठाकरेंच्या पक्षाचा खोचक टोला; 'कदाचित एखादा Video...'Maharashtra Politics Raj Thackeray MNS On Mahesh Kothare: महेश कोठारेंनी केलेल्या विधानावरुन विरोधकांकडून टीकास्र सोडलं जात असतानाच राज ठाकरेंच्या मनसेनं या वादात उडी घेतलीये.
Read more »
'राज-उद्धव एकत्र आल्याने...', राऊतांचा टोला! 'शिंदे फडणवीसांना संपवायला...', 'पुरुषांत बाळंत व्हायची...'Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: भाऊबंदकीचा खणखणाट राज्यात रोज सुरू आहे. त्यांच्यात मनोमीलन होणे शक्य नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
Read more »
