Neelam Gorhe on Raj Thackeray: निलम गोऱ्हे यांना झी 24 तास ने फराळासंदर्भात प्रश्न विचारत त्यांची नेत्यांशी तुलना करण्यास सांगितलं असता त्यांनी काय उत्तरं दिली पाहा.
Neelam Gorhe on Raj Thackeray : राज्यात सध्या दिवाळी साजरी केली जात असताना, नेतेमंडळीही आपल्या कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घेत आहेत. एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असताना राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फोडले जात आहेत.
राज्यात सर्वाधिक लक्ष लागलं असेल तर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अधिकृतपणे कधी जाहीर करणार याकडे आहे. दरम्यान निलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंना जपून पावलं टाकण्याचा सल्ला दिला आहे. सध्या दिवाळीतल्या फटाक्यांसोबतच राजकीय फटकेबाजीही जोरात रंगली आहे. दिवाळीच्या फराळासारखाच तिखट गोड चवीचा हा राजकीय फराळ आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. निलम गोऱ्हे यांना झी 24 तासने फराळासंदर्भात प्रश्न विचारत त्यांची नेत्यांशी तुलना करण्यास सांगितलं असता त्यांनी काय उत्तरं दिली पाहा.अनेक पक्ष एकत्रीकरणाचा फराळ करु पाहत आहेत असं विचारलं असता निलम गोऱ्हेंनी म्हटलं की, कढीपत्त्यामुळे चव येते, त्यामुळे तो चिवड्यात आहे. पण तो चव येईपर्यंत असतो, नंतर काढून टाकलं जातं.एकनाथ शिंदे चकली आणि फटाक्यांची माळफराळ चकलीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात झणझणीतपणा असतो. लाडू खाल्ल्यानंतर आपण चकली उचलतो. चकली म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण राजकारणाला चव आली आहे, असंही त्यांनी म्हटलं. तसंच मी त्यांना अजून एक उपमा देईन ती म्हणजे 10 हजार फटाक्यांची माळ जशी असते. काही फटाक्यानंतर थोडं अंतर येतं आणि लोकांना वाटतं आता काय होणार, त्याच्या पुढे राजकारणात त्यांचा धमाका असतो. त्यामुळे डोळे दीपून जावे आणि लोकांना पुढे काय होणार याची वाट पाहावी तशा प्रकारचं एकनाथ शिंदेचं राजकारणातील वैशिष्ट्य आहे. चकलीशिवाय फराळ पूर्ण होत नाही आणि एकनाथ शिंदेंशिवाय राजकारण पूर्ण होत नाही असंही कौतुक त्यांनी केलं. अजित पवार अनारसासारखे आहेतअनारस हा एक असा पदार्थ आहे जो आंबवला जातो, नंतर तो गोड आणि छान होतो. तर मी अजित पवारांना याची उपमा देईन. त्यावर मधेमधे विनोदाची खसखस ते टाकत असतात. त्यामुळे ते काय बोलत आहेत, यावर सर्वांची नजर असते.बिघडलेली करंजी म्हणजे मविआफुसके बार पण असतात आणि दुर्गंध सोडणारे सापही असतात असेही लोक त्यात आहेत. सकाळी 9 वाजता तो साप बोलत, डोलत असतो. टीआरपी चालतो म्हणून तात्पुरत्या स्वरुपाचे असतात, पण त्यालपीकडे दुसरं काही नसतं असं सांगत निलम गोऱ्हेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे भिजलेले फटाके आहेत, जे वाजत नाहीत. शिळा झालेला फरार असल्याने त्या दुकानांकडे कोणी जात नाहीत. बिघडलेली करंजी म्हणजे मविआ आहे अशी टीकाही त्यांनी केली.राज ठाकरे फार मोठे नेते आहेत. मी शुभेच्छा देण्यापेक्षा जपून पाऊल टाका असा सल्ला देईन. त्यांना अनेक वेळा ठेच लागली आहे. आमच्या त्यांच्याबद्दल सद्भावना आहेत. राजकारणातील अपरिहायर्ता म्हणून आज शिवसेनेने युती केली आहे. मातोश्रीवरुन निघाले तेव्हा त्यांच्या जवळचे बडवे नको म्हणाले होते. पण आज बडवे तिथेच बरोबर आहेत. पण भावनिक असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण लोक तात्पुरत्या गोष्टींना भूलणार नाहीत. मुळात या सगळ्यामधील अजेंडा काय आहे हे महत्त्वाचा आहे. विकासाचा अजेंडा आहे की फक्त अडवणूक करायची आणि गैरसमज पसरवायचे हे लोकांना आवडत नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
Neelam Gorhe Mns Raj Thackeray मनसे राज ठाकरे शिवसेना नीलम गोऱ्हे
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
ठाकरेंची जागावाटपावर चर्चा? अचानक राज यांच्या घरी पोहोचले उद्धव; सोबत आदित्य नाही तर...Uddhav Thackeray Visit Raj Thackeray Home: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच ही भेट होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
Read more »
'त्यावेळी राज ठाकरेंनी आपली पेन्सिल...'; शाह पिता-पुत्राच्या व्यंगचित्रावरुन भाजपाचा थेट सवालBJP On MNS Chief Raj Thackeray Caricature Of Amit Shah Jay Shah: अमित शाह आणि जय शाह यांना भारत पाकिस्तान सामन्यावरुन डिवचणाऱ्या राज ठाकरेंना भाजपाचं उत्तर
Read more »
‘पतपेढीच्या विजयाने अर्ध्या...’, ‘तुम्ही ब्रँड नाही’वरुन फडणवीसांना मनसे इशारा; 'खानाची भीती दाखवून...'Raj Thackeray MNS Slams CM Devendra Fadnavis: मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा असून यावरुन भाजपाने केलेल्या टीकेवर राज ठाकरेंच्या मनसेनं उत्तर दिलंय.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची मोठी बातमी; राज ठाकरे मातोश्रीवर दाखल; दोघांमध्ये काय चर्चा?Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहचले आहेत.
Read more »
ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारेbmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : कसा पुढे गेला ठाकरे बंधूंच्या भेटीला सिलसिला? जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या कारणानं झाली भेट?
Read more »
महाराष्ट्राच्या मतदारयादीसंदर्भात राज ठाकरेंचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक आरोप; मुंबई, ठाण्याचाही केला उल्लेखRaj Thackeray MNS Melava: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदार यादींमधील गोंधळांवरुन निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
Read more »
