महाराष्ट्राच्या मतदारयादीसंदर्भात राज ठाकरेंचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक आरोप; मुंबई, ठाण्याचाही केला उल्लेख

Mns News

महाराष्ट्राच्या मतदारयादीसंदर्भात राज ठाकरेंचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक आरोप; मुंबई, ठाण्याचाही केला उल्लेख
Raj Thackerayमनसेराज ठाकरे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 122 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

Raj Thackeray MNS Melava: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदार यादींमधील गोंधळांवरुन निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray MNS Melava: महाराष्ट्राच्या मतदारयादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे ंनी केला आहे. मुंबई, पुणे, नाशिक येथे 8 ते 8.5 लाख मतदार भरले आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे.

अशाच निवडणुका होणार असतील तर मग कशासाठी प्रचार करायचा, पैसे खर्च करायचे. उमेदवार द्यायचे? असे संतप्त प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. हा महाराष्ट्रा आणि मतदाराचा अपमान आहे असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही सुनावलं आहे. स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मनसेच्या वतीने आज गोरेगाव येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरेंनी त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मतदार यादींवरुन सुरु असलेल्या गोंधळाचा मुद्दा मांडला. हा जरा तातडीचा मेळावा सर्वांना बोलावून घेण्याचं कारण म्हणजे, यावेळची जेव्हा लागेल तेव्हा आणि आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल. मतदार याद्यांमध्ये ज्या प्रकारचा गोंधळ सुरु आहे, तो आताच नाही, तर गेल्या काही वर्षांचा आहे. 2016-17 ला मी याच्याच मतदार मशीन आमि मतदार याद्या विरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी आपली पत्रकार परिषदही झाली होती. सगळ्या पक्षाचे लोक तिथे आले होते. अनेकांना मी काय बोलत आहे याचं गांभीर्यचं समजलं नाही. प्रत्येकाच्या दरवाजावर टकटक होऊ लागली तेव्हा निवडणुकीचे काय प्रकार सुरु आहेत हे सर्वांना समजलं. 232 आमदार निवडून आले तरीही महाराष्ट्रात सगळीकडे भयाण शांतता होती. इतकं प्रचंड यश मिळूनही सन्नाटा होता. कुठे मिरवणूक, जल्लोष नाही. मतदारांसह निवडून आलेलेही अवाक झाले होते. त्यांनाही आपण निवडून कसे आलो आहोत समजलं नाही. सगळ्यांना निवडणुका कशा झाल्या आणि विजय कसा मिळत आहे हे समजलं, अशी टीकाही त्यांनी केली. अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतांमध्ये येत नाही. असं केल तर मतांमध्ये कसं येईल. स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं, अशा मतदारयाद्या तयार करायच्या. त्यात माणसं घुसवायची. आता होणाऱ्या निवडणुकांची यादी 1 जुलैला बंद करुन टाकली आहे. विधानसभेत तर होतेच, पण आताही 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबई, टाण्यात 8 साडे आठ लाख, पुणे, नाशिक, प्रत्येक गावात भरले आहेत. अशाच निवडणुका होणार असतील तर मग कशासाठी प्रचार करायचा, पैसे खर्च करायचे, उमेदवार द्यायचे? हा महाराष्ट्रा आणि मतदाराचा अपमान आहे, असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, तुम्ही तुमचं मत द्या नाहीतर नका देऊ, मॅच फिक्सिंग झालं आहे. हे कोणाचं षडयंत्र, लोकशाही आहे. मग कसा आमचा उमेदवार निवडून येईल. जर गणितच सेट करुन ठेवणार असाल तर मतदान करा किंवा नको, निकाल ठरला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगत असताना सत्ताधारी का चिडत आहेत. कुठेतरी लागतंय ना, आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उततर देतात. तुम्हाला कोणी विचारलं आहे? तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलं आहे. गल्लीगल्लीत सर्वांना ही सत्ता कशी आली माहिती आहे. हे कशा प्रकारचं राजकारण सुरु आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray मनसे राज ठाकरे Election List Mumbai Nashik Thane

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Uddhav Thackeray: 100 वर्षांनंतर लागलेली विषारी फळ पाहून समाधानी आहात का? उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल!Uddhav Thackeray: 100 वर्षांनंतर लागलेली विषारी फळ पाहून समाधानी आहात का? उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल!Uddhav Thackeray Dasara Melava 2025: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा सामना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय.
Read more »

Uddhav Thackeray Dasara Melava: खड्यात घाला तुमच्या संज्ञा, शेतकऱ्यांना मदत करा -उद्धव ठाकरेUddhav Thackeray Dasara Melava: खड्यात घाला तुमच्या संज्ञा, शेतकऱ्यांना मदत करा -उद्धव ठाकरेदसऱ्याच्या शुभेच्छा देत शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे.
Read more »

लाडकी बहिण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा आरोप, सांगितलं यामागील षडयंत्रलाडकी बहिण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा आरोप, सांगितलं यामागील षडयंत्रUddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून लाडकी बहीण योजनेमागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.
Read more »

धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजपाने साधला निशाणा
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची मोठी बातमी; राज ठाकरे मातोश्रीवर दाखल; दोघांमध्ये काय चर्चा?महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची मोठी बातमी; राज ठाकरे मातोश्रीवर दाखल; दोघांमध्ये काय चर्चा?Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहचले आहेत.
Read more »

ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारेठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारेbmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : कसा पुढे गेला ठाकरे बंधूंच्या भेटीला सिलसिला? जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या कारणानं झाली भेट?
Read more »



Render Time: 2026-04-02 12:58:22