Raj Thackeray Aggressive Questions: विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटायला गेले असता त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले.
Raj Thackeray Aggressive Questions : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.
निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची मागणी राज ठाकरेंनी केली. यावेळेस राज ठाकरेंनी मतदार याद्यांबरोबरच अनेक विषयांना हात घालताना थेट निवडणूक आयुक्तांना त्यांच्या तोंड्यावर अनेक गोष्टी सुनावल्या. ही लपवाछपवी कुणासाठी सुरू आहे?निवडणुका लढवतात राजकीय पक्ष मग राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही? असा सवाल राज ठाकरेंनी बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित केला. या निवडणुका राजकीय पक्ष लढवतो. निवडणूक आयोग मतदार नोंदणी करता मग ती यादी राजकीय पक्षांना का दाखवली जात नाही? एकच नाव चारपाच ठिकाणी. ते सुधारण्याचे काम तुमचे व आमचे आहे. ही लपवाछपवी कुणासाठी सुरू आहे? असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? असा प्रश्नही राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला. आम्ही, आम्ही करू नका. काल त्यांनी तुमच्यावर ढकलले आहे, आता तसं नका करू, असा सल्लाही राज यांनी दिला....तोपर्यंत निवडणूक घेऊ नकाआठ दिवसांची फक्त मुदत देता. निवडणुका कशा लढवायच्या सांगा क्लिष्ट प्रश्न नाहीत. आमचा मतदारांशी संबंध येतो, तुमचा नाही. ते आम्हाला मतदान करतात. ही पारदर्शकता आहे का? 2022 ला बेसावध राहिलो. सगळं व्यवस्थित केल्याशिवाय निवडणुका घेता नाही येणार. इतकी वर्षे झाली आता नाही होणार, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी घेतली. सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.नक्की वाचा >>...तर मुंबईत ठाकरेच? फडणवीस, शिंदे, अजित पवारांना घाम फोडणारी आकडेवारी एकदा पाहाचकोणी कोणाला काढले?सत्तेतल्या तीन पक्षांसाठी तुम्ही काम नाही करत, सर्व पक्षांसाठी काम करता, असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी, तुम्ही हुकूमशाही व आम्ही लोकशाही पाळणार का? असा सवाल केला. आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. मुलीचे वय 134 व वडिलांचे 40... मग कोणी कोणाला काढले? असं राज यांनी चिडून विचारलं. तुम्हीच सगळं ठरवणार. निवडणूक आम्ही लढवतो व तुम्ही निवडणूक कंडक्ट करता, अशी आठवण राज यांनी करुन दिली. मतदार याद्या आम्हाला द्या, आम्ही...राजकीय पक्षांचे प्रश्न स्पष्ट झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. निवडणूक कार्यक्रम रद्द करा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. बाळासाहेब थोरात 8 टर्म 80 ते 90 हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. तसेच, निवडणूक पुढे ढकला, असंही राज म्हणाले. त्यानंतर, सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. नक्की वाचा >>4 बस, 500 मुलं, 8 तासात 3 KM प्रवास.. राज ठाकरेंचा 1 फोन आला अन्.. त्या रात्री नेमकं घडलं काय?निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे?उद्धव ठाकरेंनी व्हीव्हीपॅटचा विषय उपस्थित केला असता, बॅलेट पेपरवर वेळ लागतो असं निवडणूक आयोगाने म्हटलं. बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला. अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका. तुम्ही राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतंय, असं राज ठाकरे म्हणाले.
Maharashtra Election Commissioner MNS Chief Raj Thackeray Aggressive Questions
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
ठाकरेंची जागावाटपावर चर्चा? अचानक राज यांच्या घरी पोहोचले उद्धव; सोबत आदित्य नाही तर...Uddhav Thackeray Visit Raj Thackeray Home: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच ही भेट होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
Read more »
राज ठाकरेंनी 'दशावतार' सिनेमावर दिली पहिली प्रतिक्रिया, सिनेमाचं कौतुक करत म्हणाले...Raj Thackeray on Dashavatar : दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असलेला दशावतार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. राज ठाकरे यांनी सिनेमाबद्दल आपलं मत व्यक्त केलंय.
Read more »
'त्यावेळी राज ठाकरेंनी आपली पेन्सिल...'; शाह पिता-पुत्राच्या व्यंगचित्रावरुन भाजपाचा थेट सवालBJP On MNS Chief Raj Thackeray Caricature Of Amit Shah Jay Shah: अमित शाह आणि जय शाह यांना भारत पाकिस्तान सामन्यावरुन डिवचणाऱ्या राज ठाकरेंना भाजपाचं उत्तर
Read more »
‘पतपेढीच्या विजयाने अर्ध्या...’, ‘तुम्ही ब्रँड नाही’वरुन फडणवीसांना मनसे इशारा; 'खानाची भीती दाखवून...'Raj Thackeray MNS Slams CM Devendra Fadnavis: मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा असून यावरुन भाजपाने केलेल्या टीकेवर राज ठाकरेंच्या मनसेनं उत्तर दिलंय.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची मोठी बातमी; राज ठाकरे मातोश्रीवर दाखल; दोघांमध्ये काय चर्चा?Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहचले आहेत.
Read more »
ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारेbmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : कसा पुढे गेला ठाकरे बंधूंच्या भेटीला सिलसिला? जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या कारणानं झाली भेट?
Read more »
