Mumbai Metro Ticket Price Hike: मुंबईमधील अनेक मार्गांवर मेट्रो सुरु झाली असून तिला चांगली पसंती मिळत असतानाच अचानक आता मेट्रोच्या तिकीटांचे दर वाढवण्याचा विचार सुरु असून त्यासंदर्भातील हलचाली सुरु झाल्या आहेत.
Mumbai Metro Ticket Price Hike: राज्य सरकारने अंधेरी ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेवरील भाडेदरात पुढील काही महिन्यांत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सॉल्ट पॅन विभागाकडे पाठविला प्रस्तावमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे ऑगस्टमध्ये पाठविला होता. राज्य सरकारने गेल्या महिन्यात त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने समिती गठित करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव गेल्या महिन्यातच केंद्र सरकारच्या सॉल्ट पॅन विभागाकडे पाठविला. त्यामुळे एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या काळात अधिक भाडे भरावे लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे.कोणत्या मेट्रोचे भाडे वाढणार?अंधेरी ते दहिसर मेट्रो 2 अ - 18.6 किमी लांबीगुंदवली ते दहिसर मेट्रो 7 - 16.5 किमी लांबीअन्य मेट्रोंच्या तुलनेत एमएमआरडीए मेट्रोचे भाडे किती?मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर सर्वाधिक भाडे आकारले जात आहे. मेट्रो 3 वर 8-12 किमी अंतरासाठी 40 रुपये भाडे आकारले जाते. त्याचवेळी एमएमआरडीएच्या मेट्रो 2 अ आणि 7 मार्गिकेवर प्रती 3-12 किमीसाठी 20 रुपये भाडे आकारले जाते. मेट्रो 1 वर 8 ते 11.4 किमी अंतरासाठी 40 रुपये आकारले जाते. भाड्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे त्याची शिफारस करेल. त्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच भाडेवाढ लागू होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.नक्की पाहा >>गर्दीच गर्दी... मेट्रो-3 ने मोडला रेकॉर्ड! पहिल्या दिवसाची प्रवासी संख्या पाहून बसेल धक्काभाडेवाढीची शक्यता का?एमएमआरडीएच्या अखत्यारितील महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून 35.1 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे संचलन केले जाते. एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांवरून सद्यस्थितीत दरदिवशी 3 लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रवास केला जातो. या प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षी त्यांच्यावरून 9 लाख प्रवासी प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र अपेक्षित प्रवासी संख्येपासून या मेट्रो अजून दूर आहेत. परिणामी मेट्रोला उत्पन्नही मर्यादित मिळत नसून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच मुंबई महानगरातील अन्य मेट्रो मार्गिकांचे भाडे एमएमआरडीएच्या मेट्रोपेक्षा अधिक आहे.
Hike Ticket Price Mumbai Metro Price Details Mumbai Metro Ticket Mumbai Metro Ticket Price
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
वर्ल्ड अपडेट्स: चीन ने अमेरिका पर 24% एक्स्ट्रा टैरिफ हटाया, सोयाबीन पर 13% टैरिफ अभी भी जारीInternational Breaking News Headlines [5/11/2025] Update; Dainik Bhaskar Breaking News Headlines Today, and World Latest Pictures Videos, Pictures, and More From Dainik Bhaskar.
Read more »
Breaking News LIVE Update: বিহারে আজ ১২১ আসন ভোটগ্রহণ, লড়াইয়ে তেজস্বী-তেজপ্রতাপ-সহ বিজেপির ১ ডজন মন্ত্রীBreaking News LIVE Update: বিহারে আজ ১২১ আসন ভোটগ্রহণ
Read more »
स्पेस में AI डेटा सेंटर बनाएगी गूगल: स्टारलिंक की सैटेलाइट इंटरनेट सर्विस महाराष्ट्र से शुरू होगी, ब्याज दर...business news update share market gold silver, Google to build AI data center in space, Starlink
Read more »
Bihar Chunav: 10 तस्वीरों में छिपी लोकतंत्र की खूबसूरती, हिंदू हों या मुसलमान... सब खूब कर रहे मतदान- Bihar News:bihar chunav first phase voting underway best photo from polling booth
Read more »
SIR in Bengal: নিউটাউনের পর দমদমের সাঁপুই পাড়া! SIR আতঙ্কে রাতারাতি উধাও সব...SIR in Bengal: West Bengal Assembly Election 2026 SIR controversy Dumdum Slum vacant news
Read more »
बेंगलूरु से नोएडा शिफ्टिंग में डाइनिंग टेबल-कुर्सियां टूटीं... पैकर्स कंपनी देगी हर्जाना, उपभोक्ता आयोग का आदेशUP News: ग्रेटर नोएडा जिला उपभोक्ता आयोग ने लीओ डोमेस्टिक मूवर्स को बड़ा झटका दिया है।
Read more »
