Maharashtra Rain: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावेळी मान्सून वेळेआधीच दाखल झाला असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान मान्सून वेळेआधी दाखल होण्यामागे एमजेओ प्रभाव कारणीभूत ठरल्याचं समजत आहे.
महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधीच का दाखल झाला? हवामान विभागाने सांगितलं खरं कारण; काय आहे एमजेओ इफेक्ट? Maharashtra Rain: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावेळी मान्सून वेळेआधीच दाखल झाला असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.
दरम्यान मान्सून वेळेआधी दाखल होण्यामागे एमजेओ प्रभाव कारणीभूत ठरल्याचं समजत आहे.Maharashtra Rain: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावेळी मान्सून वेळेआधीच दाखल झाला असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झालं असून, अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तयारी करण्याचीही संधी दिली नाही. मान्सून वेळेआधी दाखल झाल्याने अनेकांना यामागे नेमकं काय कारण आहे असा प्रश्न पडला आहे. यामागे एमजेओ प्रभाव कारणीभूत आहे. हवामानाच्या एमजेओ प्रभावामुळेच यंदा राज्यात तब्बल 12 दिवस आधी मान्सूनचं आगमन झाल्याचे निरिक्षण पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. एस डी सानप यांनी नोंदवलं आहे. हवामान शास्ञातील ही संकल्पना मँडन & ज्युलिएन शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली असल्याने त्यांच्याच नावाने हा इफेक्ट ओळखला जातो. एमजेओ म्हणजे हा एक ढगांचा पट्टा असून तो पूर्वेकडून पश्चिमकडे मार्गक्रमण करत असताना मौसमी वाऱ्यांच्या संपर्कात आल्यास वेळेआधीच मान्सून बरसतो. यंदाही काहीसं तसंच झाल्याचं निरिक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. राज्यात यंदा तब्बल 35 वर्षांनंतर तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालं आहे. यापूर्वी 1990 साली राज्यात तब्बल 20 मे रोजीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. महाराष्ट्रातील मान्सून एन्ट्रीची तारीख ही सरासरी 5 जून असते, यंदा माञ, तो 25 मे रोजीच राज्यात दाखल झाला आहे.पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. एस डी सानप यांनी सांगितलं आहे की,"मान्सून लवकर येण्याची वेगवेगळी कारणं असतात. एमजेओ नावाचा एक पॅटर्न आहे. तो जर सक्रीय असेल तर चांगला पाऊस होतो. यावर्षी तो सक्रीय नव्हता, पण भारतीय समुद्रातून त्याचा प्रवास असल्याने हे कारण असू शकतं. एमजेओ म्हणजे हा एक ढगांचा पट्टा असून तो पूर्वेकडून पश्चिमकडे समुद्रातून मार्गक्रमण करत असताना मौसमी वाऱ्यांच्या संपर्कात आल्यास वेळेआधीच मान्सून बरसतो. त्याचा प्रभाव कमी जास्त असतो". दरम्यान राज्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस येण्याची वाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी लगेच आज उद्या पेरणीची घाई करू नये, राज्यात साधारण 3 जून नंतर मान्सूनचा पहिला टप्पा किंवा स्पेल संपेल त्यांनंतरच म्हणजे साधारण जून च्या पहिल्या आठवडच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरूवात करावी, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्न डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.Full Scorecard →संविधान बदललं आणि रातोरात गेली 26 हजार मुस्लिम महिलांची नाग...
Mumbai Weather Mumbai Rain Updates Mumbai Rain News Waterlogging News In Mumbai IMD Weather Alert Mumbai Monsoon In Mumbai Mumbai News Today Mumbai Rain Alert Heavy Rain In Mumbai Maharashtra Weather Mumbai Local Train Mumbai Traffic Updates पाऊस मान्सून रेन अपडेटस् मुंबई पाऊस महाराष्ट्रात पाऊस पावसाची अपडेट हवामान अपडेट MJO MJO Effect
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्रावर अवकाळी संकट! 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली...Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काय आहे हवामान विभागाचा अंदाज
Read more »
मान्सूनआधी वादळी पाऊस- गारपिटीचा मारा; पुढचे 48 तास मुंबईसह राज्यातील 'या' भागांना सावधगिरीचा इशाराMaharashtra Weather News: अद्याप खुद्द मान्सून राज्यात दाखल झालेला नसतानाही वादळी पावसानं कोकणापासून ते थेट विदर्भापर्यंत थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »
आनंद'घना'! 8 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल; वादळवाऱ्यांना चकवा देत नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूचMonsoon 2025 : केरळमध्ये मान्सून आठ दिवस आधीच पोहोचल्यानं आता महाराष्ट्रातही त्याच्या आगमनाची तारीख बदलली आहे. पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी...
Read more »
'कदाचित त्याला...', विराटच्या निवृत्तीचं खरं कारण आगरकरनेच सांगितलं; सर्वांसमोर मोठा खुलासाAjit Agarkar On Virat Kohli Retirement: इंग्लंडच्या दौऱ्याआधी विराटने अचानक निवृत्ती जाहीर केल्याची चर्चा असली तरी यामागील खरं कारण आगरकरने सांगितलं आहे.
Read more »
RCB ला BCCI चा दणका! प्रत्येक खेळाडूला 6 लाखांचा दंड; कॅप्टनला 24 लाखांचा फटका कारण...BCCI Action Against Rajat Patidar RCB: बीसीसीआयने या निर्णयासंदर्भातील एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी या कारवाईमागील कारण सांगितलं आहे.
Read more »
निलेश चव्हाण कोणत्या बिळात लपलाय? वैष्णवीच्या कुटुंबाला धमकी देणाऱ्याला अद्याप अटक नाहीनिलेश चव्हाणवर गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. बावधन पोलिसांत निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
Read more »
