Anjali Damania To the Point Interview : त्या कंपन्या आणि अजित पवारांचं कनेक्शन काय? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी झी 24 तास च्या To The points या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता.
Anjali Damania on Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी झी 24 तासने पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण खुलासा केल्यामुळे या वृत्तवाहिनीचं कौतुक केलं. यानंतर अंजली दमानिया यांनी झी 24 तासच्या To The Points नावाच्या स्पेशल शोमध्ये अजित पवार यांच्या 2016 मध्ये 69 कंपन्या होत्या.
सिंचन घोटाळा, शिखर बँकेचा घोटाळा, जरांडेश्वर घोटाळा माफ झाला, ईडीने जप्त केलेल्या गोष्टी परत मिळाल्या. अजित पवारांच्या या घोटाळ्यांची यादी पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जातेय. उद्विघ्न होऊन प्रतिक्रिया निघते. अंजली दमानिया यांनी To The Points या मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, अजित पवार यांच्या कंपन्यामध्ये फक्त आणि फक्त जमिनीचे व्यवहार झाले आहेत. ज्यामध्ये तळेगाव, मुळशी, बारामती अशी यादीच तयार आहेत. या सगळ्या जमिनी कशा घेतल्या? काय घेतल्या? या सगळ्याची मी एक यादी तयार करुन याचिका करेन किंवा सरकारला सांगेन पण सरकारला सांगूनही काही फायदा नाही. कॉन कन्वेश्नल पीआयएल करायचं आहे. कारण आम्ही जिवाची पर्वा न करता स्वतःचा पैसा खर्च करुन आम्ही लढतो. पण त्यामधून काय घडतंय. कारण चौकशी रद्द करण्याचा आदेश कुणी दिला. Sujay Agro, Sutara Agro, Sap यासारख्या कंपन्या आहेत ज्या अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर आहेत. तसेच RAJ नावाच्या असंख्य कंपन्या आहेत. त्यामध्ये अजित पवारांसह दोन नावांच्या व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलं आहे. 2009 साली एका धरणाला लागून जमिन होती ज्याची प्रायव्हेट फार्म हाऊस आणि धरण अशी त्याकाळी त्याची चर्चा होती. पण या धरणांबाबत किंवा तेथील जमिनींबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानियांची टू द पॉईंट मागणीझी २४ तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाची जिल्हाधिका-यांना पूर्ण कल्पना होती असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. पुण्याच्या जिल्हाधिका-यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमेडिया कंपनीनं जमीन व्यवहार मे महिन्यात केल्यानंतर जून महिन्यानंतर बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियावर जमीन रिकामी करण्यासाठी दबाव आणला होता. या संदर्भात बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियानं एक पत्रही जिल्हाधिका-यांना लिहिलं होतं. त्यावर जिल्हाधिका-यांनी संबंधित प्रांत आणि तहसीलदारांना याबाबत सूचना दिल्याचा दावाही दमानियांनी केलाय. जिल्हाधिका-यांनी जाणिवपूर्वक या प्रकरणाकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप दमानियांनी केलाय. पुण्याच्या जिल्हाधिका-यांना निलंबित करण्यात यावं किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीय.
Anjali Damania Parth Pawar Pune Land Deal Pune Parth Pawar Land Deal Pune Koregaon Park Land Deal
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'तुम्हाला मोदी-शाहदेखील वाचवू शकणार नाहीत', अंजली दमानियांचा अजित पवारांना इशाराAnjali Damania On Ajit Pawar: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यातील पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Read more »
पार्थ यांना हा व्यवहार रद्द करता येणार नाही! अंजली दमानियांनी सांगितलं कारण; अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणीAnjali Damania On Koregaon Park Land Deal: अंजली दमानिया यांनी काल महसुल मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज या व्यवहारासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा व्यवहार दोन्ही पक्षांनी ठरवून रद्द करता येणार नसल्याचं म्हटलं.
Read more »
UPSC Interview Questions: वह कौन सी चीज है, जो पूरे महीने में एक बार आती है और 24 घंटे पूरे होने पर चली जाती है?UPSC Interview Questions: वह कौन सी चीज है, जो पूरे महीने में एक बार आती है और 24 घंटे पूरे होने पर चली जाती है? यूपीएससी में पूछे गए इस सवाल का जवाब आज आपको बताते हैं.
Read more »
अजित पवारांनी बिल्डरच्या पैशातून खरेदी केला जरंडेश्वर कारखाना; अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, 'खात्यातून 44 कोटी...'Anjali Damania Allegation on Ajit Pawar: जरंडेश्वर प्रकरणात अंजली दमानियांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. कारखाना खरेदीसाठी बिल्डरचा पैसा आला असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. ओंकार बिल्डरच्या खात्यातून 44 कोटी आले असं त्यांनी सांगितलं आहे.
Read more »
'जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना असतानाही...'. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानियांचा खळबळजनक आरोपAnjali Damania To The Point Interview: झी 24 तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाची जिल्हाधिका-यांना पूर्ण कल्पना होती असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय
Read more »
अंजली दमानियांना घोटाळयांचे कागदपत्रं कोण देतं? दमानियांनी स्पष्टचं सांगितलंAnjali Damania To The Point Interview: अंजली दमानिया यांनी झी 24 तासच्या कार्यक्रमात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.
Read more »
