पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर येतोय ज्यात डकआउटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आणि हेड कोच माईक हेसन यांच्यात शाब्दिक जुंपली. यावेळी रागात सलमानने बॉटल सुद्धा फेकली.
T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान विरुद्ध नामिबिया यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी खेळवला गेला होता. पाकिस्तानने ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात नामिबियाला तब्बल 102 धावांनी पराभूत करून पाकिस्तानचा संघ सुपर 8 च्या फेरीत पोहोचलाय.
पाकिस्तानने नामिबियाला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात नामिबिया अयशस्वी ठरली आणि ते 17.3 ओव्हरमध्ये ऑलआउट झाले. मात्र या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर येतोय ज्यात डकआउटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आणि हेड कोच माईक हेसन यांच्यात शाब्दिक जुंपली. यावेळी रागात सलमानने बॉटल सुद्धा फेकली. पाकिस्तान संघात तणाव : नामिबिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तान संघात तणाव असल्याचं समोर आलं. सामना सुरु असताना कर्णधार सलमान अली आगाने २३ बॉलमध्ये 38 धावा केल्या. पण तो बाद झाल्यावर जे घडलं ते पाहून क्रीडा प्रेमी हैराण झाले. कर्णधार सलमान बाद होऊन जसा डगआउटमध्ये परतला तसेच पाकिस्तानचा मुख्य कोच माइक हेसन सोबत कोणत्या तरी कारणाने शाब्दिक चकमक झाली. पाहा व्हिडीओ : What happened there pic.twitter.com/rlvgNgEgPx Huzaifa khan February 18, 2026बॉटल जमिनीवर फेकली : पाकिस्तानच्या डगआउटमधील वादाने तेव्हा मोठं रूप घेतलं जेव्हा रागात कर्णधार सलमान अलीने हातातील पाण्याची बॉटल जमिनीवर फेकली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवर क्रिकेट फॅन्स विविध प्रतिक्रिया देतायत. टीम इंडिया विरुद्ध झाला पराभव : नामिबिया विरुद्ध सामना खेळण्यापूर्वी पाकिस्तानचा टीम इंडियाकडून मोठा पराभव झाला होता. टीम इंडियाकडून 61 धावांनी झालेला लाजिरवाणा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला होता. या सामन्यानंतर टीम इंडिया सुपर 8 साठी क्वालिफाय झाली, तर पाकिस्तानला ग्रुप स्टेजमधील अजून एक सामन्यात विजय मिळवून सुपर 8 मध्ये एंट्री मिळवावी लागली.
Salman Ali Agha Mike Hesson Cricket Marathi News Pakistan Team
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जिम्बाब्वे के पास सुपर-8 में पहुंचने का मौका: ऑस्ट्रेलिया को हराने के बाद आयरलैंड से मुकाबला; पल्लेकेले में...; Ireland vs Zimbabwe ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow ZIM Vs IRE Playing 11, Kandy Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
जिम्बाब्वे के पास सुपर-8 में पहुंचने का मौका: ऑस्ट्रेलिया को हराने के बाद आयरलैंड से मुकाबला; पल्लेकेले में...; Ireland vs Zimbabwe ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow ZIM Vs IRE Playing 11, Kandy Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
उन्हें ड्रॉप करो.. शाहिद अफरीदी ने दामाद को भी नहीं छोड़ा, डंके की चोट पर 3 खिलाड़ियों को बाहर करने की मांगT20 World Cup 2026: पाकिस्तान की भारत से हार को 2 दिन बीते हैं और हमेशा की तरह पाकिस्तान क्रिकेट में उथल पुथल की खबरें तेज हो चुकी हैं.
Read more »
இந்தியா vs ஆஸ்திரேலியா போட்டி இல்லை? சென்னையில் இந்த அணியுடன்தான் மோதல்..!T20 world cup 2026: சூப்பர் 8 சுற்றில் சென்னையில் நடக்கும் போட்டியில் இந்திய அணியுடன் மோதப்போவது யார்?
Read more »
पाकिस्तान सुपर-8 में पहुंचने वाली आखिरी टीम बनी, उस्मान तारिक के स्पिन में उलझा नामीबिया- pakistan qualified for super 8 beat netherlands in last league match t20 world cup 2026
Read more »
अफगानिस्तान की इस टी-20 वर्ल्डकप में पहली जीत: UAE को 5 विकेट से हराया; जादरान का अर्धशतक, उमरजई ने 4 विकेट...Afghanistan Vs United Arab Emirates ICC Men's T20 World Cup 2026 Live Updates; Follow AFG Vs UAE Playing 11, Delhi Stadium Pitch Report, Latest News Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
