Mumbai Metro Line 3 : पहिल्याच पावसात मुंबईतील भुयारी मेट्रोची पोलखोल झालीये. पावसामुळे भुयारी मेट्रो स्थानकाला गळती लागली. मेट्रो स्थानकात अक्षरश:धबधबे वाहत असल्याचं चित्र दिसत होते.
Mumbai Metro Line 3 : पहिल्याच मुसळधार पावसात वरळी भुयारी मेट्रोचे तीनतेरा, चिखल अन् पाणीच पाणी; पाहा आधी कसं होतं आणि आताची स्थिती Mumbai Metro Line 3 : पहिल्याच पावसात मुंबईतील भुयारी मेट्रोची पोलखोल झालीये.
पावसामुळे भुयारी मेट्रो स्थानकाला गळती लागली. मेट्रो स्थानकात अक्षरश:धबधबे वाहत असल्याचं चित्र दिसत होते. राज्यासह मुंबईतही मान्सून वेळीआधी दाखल झाल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. त्यात मुंबईत मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहिलं मिळालं. मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडून काढला आहे. वरळी भुयारी मेट्रो-3 प्रकल्पाला पावसाचा फटका बसला आहे. कोट्यावधीचा पैसा पाण्यात गेलायच पाहिला मिळत आहे. राज्य सरकारकडून अवघ्या काही दिवसांपूर्वीच वरळी ते मरोळ या मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले होते. पण मुंबईच्या पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोचे कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. संपूर्ण मेट्रो स्थानकात पाणी शिरलं आणि चिखलाचं साम्राज्य पसरलं. मेट्रो स्थानकातील सरकते जिने, तिकीट विंडो बंद पडल्या. इतकच नाही तर मेट्रो स्थानकातील वीजपुरवठा खंडित झाल्यानं सर्वत्र अंधार पसरला. मोठा गाजावाजा करत मुंबईत भुयारी मेट्रो सुरु करण्यात आली. पण पहिल्याच पावसात यामेट्रोची अशी अवस्था झाली. यावर कहर म्हणजे मेट्रोच्या कामाची पोलखोल करणाऱ्या झी 24तासच्या प्रतिनिधींची पोलिसांनी अडवणूक केली. पोलिसांनी अक्षरश: आमच्या प्रतिनिधीला हाताला धरुन बाहेर काढलं. दर वर्षी पावसाळ्यात मुंबईत रेल्वे, रस्ते सेवा कोलमडते. झी 24 तास मुंबईकरांना क्षणाक्षणाची माहिती पुरवतात. मात्र प्रथमच झी 24तासला वृत्तांकन करण्यापासून अडवण्यात आल्याचं पहायला मिळालं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून मेट्रो मार्गाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये मदत केली आहे. आरे जेव्हीएलआर ते बीकेसी असा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 ला सुरू झाला होता. हा 12.99 किमी लांबीचा असून यात 10 स्थानकं आहेत.'अॅक्वा लाइन' म्हणून ओळखली जाणारी ही भुयारी मेट्रो एकूण 33 किमी लांबीची असून यातील धारावी ते आचार्य अत्रे चौक हा 9.69 किमी चा टप्पा काही दिवसांपूर्वीच सुरू मुंबईकरांसाठी सुरु करण्यात आला होता. मेट्रो-3 चे कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ते म्हणाले की, 'मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भींत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता.'मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस आकाश पूर्ण वेळ ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील आठवड्यात कोकणात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज आहे.ब्लॉकब्लस्टर चित्रपट देऊनही ठरले फ्लॉप; 'या' कलाकारांनी अल्पावधीतचं बॉलिवूडला ठोकला रामराम
Mumbai Rains Metro Worli MUMBAI Mumbai Aqua Line Metro Metro Metro 3 MUMBAI Water Logging
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्रातील सध्याच्या समिकरणांची मुहूर्तमेढ 'त्या' 72 तासांच्या काळात रोवली, फडणवीसांनी सर्वच सांगितलंCM Devendra Fadanvis: वरळी येथील जांभोरी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या कार्यक्रमात विद्यमान आणि सर्वच माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.
Read more »
मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार, 'पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा...'Indian Pakistan War Update: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »
चक्रीवादळसदृश्य वारे तुमच्यापासून किती दूर? कोकणात मुसळधार तर, मुंबईत ढगाळ वातावरण; पाहा सविस्तर हवामान वृत्तMaharashtra Weather News : पुढचे चार ते पाच दिवस तरी हवामानाची ही स्थिती तुमची पाठ सोडणार नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि पर्जन्यमान...
Read more »
EXCLUSIVE: महाराष्ट्र सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचा उडाला फज्जा, पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला गळती!Metro Station: पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना उडाली आहे. वरळी भुयारी मेट्रो स्टेशनला गळती लागलेली पाहायला मिळाली. वरळी मेट्रो स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. झी 24 तासने याची एक्स्क्लूझिव्ह दृश्य प्रेक्षकांना दाखवली.
Read more »
Mumbai Monsoon : तळ कोकणातून मान्सून एका दिवसात मुंबईत; समुद्राचं पाणी रस्त्यांवर येणार....शहरात ऑरेंज अलर्ट जारीMumbai Monsoon Update : यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्राला कोणकोणत्या दिवशी उधाण येणार? पाहा हाय टाईडचं वेळापत्रक आणि मान्सूनची अपडेट.
Read more »
पहिल्याच पावसात मुंबई महापालिका ठरली सपशेल फेलमुंबईत मान्सून दाखल झाला आहे आणि अगदी पहिल्याच दिवशी पावसाने धुवादार बॅटिंग केली आहे. मुंबई महानगरपालिका पहिल्याच दिवशी सपशेल फेल झाली आहे. मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे मुंबईकरांचे खूप हाल झाले आहेत. पाहूया फोटोच्या माध्यमातून.
Read more »
