IPL 2026 : आयपीएलचे सामने प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता महाराष्ट्रातील तीन स्टेडियम हे आयपीएलमधील तीन संघांचे यंदासाठी होमग्राउंड असल्याने आयपीएलचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची मोठी संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धा येत्या काही महिन्यात सुरु होणार आहे. यंदा या स्पर्धेचा 19 वा सीजन असून यासाठी डिसेंबर महिन्यातच मिनी ऑक्शन पार पडलं. यंदाच्या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत, आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह असतो.
अशातच आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा उत्साह वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आयपीएलचे सामने प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याच्या संधी वाढणार आहेत. याच कारण म्हणजे आधी केवळ मुंबई इंडियन्सचं होमग्राउंड हे मुंबई असल्याने वानखेडे स्टेडियमवर सामने खेळवले जायचे, मात्र आता आयपीएलच्या आणखीन दोन संघाचं होमग्राउंड होण्याची संधी महाराष्ट्रातील दोन शहरांना मिळाली आहे. चिन्नस्वामीमध्ये होणार नाहीत सामने : मंगळवारी आरसीबीच्या होमग्राउंड संदर्भातील मीडिया रिपोर्ट्स समोर आले होते. यानुसार आरसीबीने आयपीएल 2026 चे आपले होमग्राउंडवरचे सामने नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियम आणि रायपुरचे शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आरसीबीचे पाच होमग्राउंडवर होणारे सामने हे नवी मुंबईत तर दोन सामने रायपुर स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये लीग सुरू झाल्यापासून चिन्नास्वामी स्टेडियमला आपले होमग्राउंड म्हणणाऱ्या या फ्रँचायझीसाठी हा एक मोठा बदल आहे.चेंगराचेंगरीनंतर काढून घेण्यात आले अधिकार : 4 जून रोजीआरसीबीने आयपीएल 2025 चं विजेतेपद जिंकल्यावर चिन्नस्वामी स्टेडियमच्या विजयोत्सवादरम्यान बाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. तेव्हापासून, हे मैदान उच्च-स्तरीय क्रिकेटमधून जवळजवळ वगळण्यात आले आहे. आयसीसीने 2025 च्या महिला वबडे वर्ल्ड कपमधून सुद्धा ते काढून टाकण्यात आले. 2026 च्या पुरुष टी20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने त्याला अपात्र ठरवले. तसेच केएससीए महाराजा टी20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी सारख्या देशांतर्गत स्पर्धा देखील इतरत्र हलवण्यात आल्या.हेही वाचा : विराट कोहली बनला जगातील नंबर 1 चा फलंदाज, रोहितची खुर्ची खेचली, ICC ची ताजी रँकिंग पासून व्हाल हैराण राजस्थान रॉयल्स सुद्धा पुण्यात खेळणार : आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशन यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर आरसीएमधील एका अधिकाऱ्याने राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप सुद्धा केला. राजस्थान रॉयल्सने या सर्व प्रकारची तक्रार बीसीसीआयकडे केली आणि यानंतर आता राजस्थान रॉयल्स त्यांचे सामने हे पुणे आणि गुवाहाटी या शहरातील स्टेडीयममध्ये खेळणार होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आयपीएल 2026 चे काही सामने खेळेल. महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये होणार सामने : महाराष्ट्रातील तीन शहरांमध्ये आयपीएल 2026 चे सामने खेळवण्यात येणार आहेत. यात मुंबईतील वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील डिवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम यामैदानांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन आयपीएल सामने पाहण्याची संधी मिळेल.
Cricket News Marathi News RCB Navi Mumbai Rajasthan Royals
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IPL 2026: चिन्नास्वामी में नहीं, इन 2 स्टेडियम में RCB खेलेगी अपने सभी होम मैच, बड़ी अपडेट आई सामनेIPL 2026: आईपीएल 2026 को शुरू होने में अभी वक्त है. इस बीच रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के होम ग्राउंड्स से जुड़ी एक बड़ी अपडेट सामने आ रही है. खेल समाचार | IPL
Read more »
विराट कोहली से छिन गया बैंगलुरु, 2008 के बाद RCB पहली बार बनाएगा अपना 2 नया होम ग्राउंड, IPL 2026 का बड़ा ब...ipl 2026 rcb wont play at chinnaswamy एक रिपोर्ट के अनुसार, आरसीबी ने आईपीएल 2026 के अपने घरेलू मैचों को नवी मुंबई के डीवाई पाटिल स्टेडियम और रायपुर के शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम के बीच बांटने की योजना को अंतिम रूप दे दिया है. 2008 में लीग की शुरुआत से ही चिन्नास्वामी स्टेडियम को अपना घर मानती आई है.
Read more »
RCB चिन्नास्वामी में नहीं, इन दो वेन्यू पर खेलेगी अपने घरेलू मैच, IPL 2026 से पहले बदलेगा होम ग्राउंडआईपीएल 2026 से पहले रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु RCB अपने घरेलू मैच नवी मुंबई और रायपुर में खेल सकती है, एम.
Read more »
आरसीबी के फैंस के लिए बुरी खबर, एम चिन्नास्वामी स्टेडियम में नहीं खेले जाएंगे मुकाबले, IPL 2026 के लिए दो वेन्यू फाइनलआईपीएल 2026 से पहले एक बड़ी खबर सामने आई है। अगले सीजन आरसीबी की टीम अपने घरेलू मैच एम चिन्नास्वामी स्टेडियम में नहीं खेल पाएगी।
Read more »
IPL 2026- चिन्नास्वामी स्टेडियम में नहीं होंगे RCB के मैच: नवी मुंबई और रायपुर में होने की संभावना; विक्ट्र...IPL 2026 RCB RR Match Venue Update; IPL 2026 में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB) अपने घरेलू मैच नवी मुंबई के डीवाई पाटिल स्टेडियम और रायपुर के शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम में खेल सकती है।
Read more »
राज्य के सीएम ने कर दिया बड़ा ऐलान, IPL 2026 में RCB का ये होगा होम ग्राउंड, जानें कितने मैच खेले जाएंगे?RCB Home Ground in IPL 2026: छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री विष्णु देव साई ने मंगलवार (13 जनवरी) को पुष्टि की कि रायपुर के शहीद वीर नारायण सिंह अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम में 2026 में दो आईपीएल मैच खेले जाएंगे.
Read more »
