IPL 2025 Qualifier 1 : पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन केलं असून 14 लीग स्टेज सामन्यांपैकी 9 सामने जिंकून प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये फिनिश केलं आहे
IPL 2025 Qualifier 1 : पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन केलं असून 14 लीग स्टेज सामन्यांपैकी 9 सामने जिंकून प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये फिनिश केलं आहेआयपीएल 2025 चा क्वालिफायर 1 सामना गुरुवार 29 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.
महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना पार पडणार असून या सामन्यानंतर आयपीएल 2025 ला त्यांचा पहिला फायनलिस्ट संघ मिळेल. तर पराभूत झालेला संघ फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी रविवारी एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्या सोबत क्वालिफायर 2 सामना खेळेल. पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन केलं असून 14 लीग स्टेज सामन्यांपैकी 9 सामने जिंकून प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये फिनिश केलं आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सध्या मजबूत स्थितीत असून त्यांनी या सीजनमध्ये 9 सामने जिंकले आहेत. मात्र त्यांची गोलंदाजी थोडी कमजोर आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्स हा संघ सुद्धा मजबूत आहे. परंतु त्यांचं प्रदर्शन सुद्धा काही सामन्यांमध्ये चांगलं नव्हतं. परंतु आता दोन्ही संघांची अपेक्षा असेल की क्वालिफायर 1 सामन्यात संघांच्या सर्व विभागाकडून चांगलं प्रदर्शन व्हावं. संपूर्ण स्पर्धेत बेंगळुरू संघाने चांगल्या लयीत आहे. मात्र त्यांची गोलंदाजी थोडी चिंतेची बाब आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजांनी खूप जास्त धावा दिल्या आहेत. प्लेऑफमध्ये त्यांना याकडे लक्ष द्यावे लागेल.पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये 35 सामने झाले असून यापैकी 18 सामने पंजाब किंग्सने तर 17 सामने आरसीबीने जिंकले आहेत. यात आरसीबीची सर्वोच्च धावसंख्या 241 धावा आहे. तर पंजाबची सर्वोत्तम धावसंख्या 232 धावा इतकी आहे. तर आयपीएल 2025 मध्ये पंजाब विरुद्ध आरसीबीमध्ये 2 लीग स्टेज सामने झाले असून यात 20 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने7 विकेटने विजय मिळवला होता. तर 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने 5 विकेटने विजय मिळवला होता.प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर , नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह ओमरजई, हरप्रीत बरार, काइल जैमीसन, विजयकुमार वैशाक/युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंहविराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार , मयंक अग्रवाल, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा/जोश हेजलवुड, सुयश शर्मा
IPL 2025 Cricket News Marathi News RCB PBKS
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अक्षय्य तृतीयेला दागिने घ्याच, सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली की वाढ जाणून घ्या आजचा दर काय आहे.
Read more »
1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहासMaharashtra Din 2025 : या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला ठाऊक असायलाच हवं. जाणून घ्या 1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन?
Read more »
राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, आजपासून मुसळधार पावसाचा इशारा, 'या' 4 जिल्ह्यांना अलर्टMaharashtra Weather Today: महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट तर चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कसं असेल आजचं हवामान जाणून घ्या.
Read more »
IPL 2025 Playoffs: पावसामुळे आज MI v DC मॅच रद्द झाली तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर?IPL 2025 Playoffs Scenario MI vs DC Match: आजच्या मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता असून सामना झालाच नाही तर कोणाला आणि कसा फायदा होणार आहे समजून घ्या...
Read more »
वैभव सूर्यवंशी आणि कर्नल सोफिया कुरैशीचा Photo Viral, जाणून घ्या नेमकं काय आहे सत्यVaibhav Suryavanshi met Sofiya Qureshi: कमी वयात IPL 2025 मध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कर्नल सोफिया कुरेशीसोबत दिसत आहे.
Read more »
आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा आजचा 10 ग्रॅमचा भावGold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली आणि काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Read more »
