India-Pak War: दोन मिनिटांच्या आत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत

Jammu Kashmir News

India-Pak War: दोन मिनिटांच्या आत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत
PahalgamJammu Kashmir AttackPahalgam Terrorist Attack
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 116 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 109%
  • Publisher: 63%

India-Pak War: भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढली असून, आता त्याचदरम्यान केंद्र शासनानं वायुदलाला कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत.

India-Pak War: दोन मिनिटांच्या आत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश, काहीतरी मोठं घडण्याचे संकेत India-Pak War: भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढली असून, आता त्याचदरम्यान केंद्र शासनानं वायुदलाला कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत.

after Pahalgam terror attack issue indian airforce on alert in rapid action moment indian pakistan war latest updateभारतात घुसखोरी घडवून आणण्याचा पाकचा कटजम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या तणावपूर्ण नात्यात आणखी दुरावा आल्याचं पाहायला मिळालं. भारताच्या नंदनवनात घडवून आणलेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारनं धोरणात्मक आणि आता लष्करी पद्धतीनं शेजारी राष्ट्राच्या कुरघोड्यांना उत्तर देण्याची भूमिका स्वीकारली आहे. एकिकडून धोरणात्मक तत्त्वांनी पाकची कोंडी करत असतानाच दुसरीकडे देशाच्या सीमानाभागात वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघनही भारतानं परतवून लागवल्याचं पाहायला मिळत आहे. पीओकेमध्ये 42हून अधिक दहशतवादी तळ सक्रीय असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर आता कारवाईबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. उच्चस्तरीय पातळीवर याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचं समजतंय. पंतप्रधान मोदींनीही दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार असल्याचं सांगत कठोर कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळे या भागात लवकरच लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.सीमेपलिकडून अर्थात पाकिस्तानच्या दिशेनं सीमाभागात लष्करी कारवायांमध्ये वाढ होत असताना आणि शेजारी राष्ट्रानं मोठ्या प्रमाणात नियंत्रण रेषेनजीक फौजफाटा आणलेला असतानाच भारतीय सैन्यातील तिन्ही तुकड्यांनासुद्धा सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्यानं वायुदलाला केंद्राकडून कोणत्याही परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना करत आदेश येताच पुढच्या दोन मिनिटांत सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत. भारत- पाक युद्धाचे संभाव्य ढग घोंगावत असतानाच सावधगिरी म्हणून भारत सरकारनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांच भारतीय लष्कराकडून पाकसोबतच्या या तणावात काहीतरी मोठं घडण्याचे संकेत मिळत आहेत.इथं भारताकडूनही कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज केल्या जात असतानाच तिथं पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पाक सैन्यानंही सीमा भागात अधिक फौजफाटा आणि तोफा तैनात केल्या आहेत. तर, सीमाभागात एअरस्ट्राईकचा धोका असल्यामुळं पाकनं काही ठिकाणी असणारे लाँच पॅडही रिकामे केल्याचं म्हटलं जात आहे.भारताच्या पुंछ आणि काश्मीरच्या इतर भागांमध्ये पाकिस्तानकडून अधूनमधून गोळीबार सुरूच असून पाकच्या बाजूनं सीमाभागांत असणाकी गावं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून, डोंगराळ वनक्षेत्रातून भारतात पुन्हा एकदा दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तान कटकारस्थानं रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pahalgam Jammu Kashmir Attack Pahalgam Terrorist Attack Marathi News जम्मू काश्मीर पहलगाम जम्मू काश्मीर हल्ला पहलगाम दहशतवादी हल्ला मराठी बातम्या PM Modi Amit Shah Ajit Doval Indian Airforce भारतीय लष्कर भारतीय सैन्य भारतीय वायूदल Indian Pakistan War

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत...', चिठ्ठी लिहून आजोबांची आत्महत्या; 2 घटना अन् 4 मृत्यू'पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत...', चिठ्ठी लिहून आजोबांची आत्महत्या; 2 घटना अन् 4 मृत्यूCrime News Husband Killed Wife: बार्शी आणि नाशिक अशा दोन शहरांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पतीनेच पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत.
Read more »

मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी लवकरच नवा रेल्वे मार्ग; नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणारमुंबईहून पुण्याला जाण्यासाठी लवकरच नवा रेल्वे मार्ग; नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणारKarjat Lonavala Pune Railway: कर्जत ते लोणावळादरम्यान दोन नवीन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दोन सविस्तर प्रकल्पाची आखणी करण्यात येणार आहे.
Read more »

शरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या, काका-पुतण्यामध्ये चाललंय काय?शरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या, काका-पुतण्यामध्ये चाललंय काय?राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं
Read more »

'या' फोटोमुळे महाराष्ट्र हादरणार? पुढील राजकीय भूकंपांची चाहूल? '2 ते 3 दिवस थांबा तुम्हाला...''या' फोटोमुळे महाराष्ट्र हादरणार? पुढील राजकीय भूकंपांची चाहूल? '2 ते 3 दिवस थांबा तुम्हाला...'Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असण्यामागील कारण आहे खाली दिसणारा फोटो. नेमकं हे प्रकरण काय पाहूयात...
Read more »

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षाMPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता 'या' तारखांना होणार मुख्य परीक्षाराज्य लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुण्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांचं हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे
Read more »

India-Pak War Situation: ভারত-পাক সংঘর্ষ? দুই পরমাণুশক্তিধর দেশ যদি পরস্পরের সঙ্গে যুদ্ধে লিপ্ত হয়, কী হবে বাকি বিশ্বের? আশঙ্কা...India-Pak War Situation: ভারত-পাক সংঘর্ষ? দুই পরমাণুশক্তিধর দেশ যদি পরস্পরের সঙ্গে যুদ্ধে লিপ্ত হয়, কী হবে বাকি বিশ্বের? আশঙ্কা...India Pak War Situation India Pak Conflict Kashmir attack sparks fear of fresh conflict between India Pakistan after Pahalgam terror attack
Read more »



Render Time: 2026-04-02 04:29:12