India Budget 2026 Nirmala Sitharaman Union Budget Announcement: अर्थमंत्र्यांनी मुंबई आणि पुण्याचा उल्लेख करत एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून याचा फायदा राज्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या शहरांना होणार आहे.
India Budget 2026 Nirmala Sitharaman Union Budget Announcement: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्रासाठी एक मोठी गुड न्यूज दिली आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी एक खास प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे.
हा हायस्पीड रेल्वे कॉरीडोअरचा प्रकल्प असून या माध्यमातून मुंबई आणि पुणे ही दोन अत्यंत महत्त्वाची शहरं जोडली जाणार आहे. म्हणजेच या दोन्ही शहरांमधील रेल्वे वाहतूक अधिक वेगाने करण्यासाठी हा विशेष प्रकल्प राबवला जाणार आहे.अर्थसंकल्पात मुंबई-पुण्यासहीत एकूण सात कॉरिडॉरमध्ये हाय-स्पीड रेल्वेची घोषणा करण्यात आली. वाराणसी आणि पटना येथे जहाज दुरुस्ती सुविधा उभारण्यात येणार आहेत. दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी येथेही हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जाणार आहेत. पाच वर्षांत पाच औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्बन कॅप्चर करण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की 2026-27 साठी भांडवली खर्च 12.2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने सातत्याने काम केले आहे. 12 वर्षांपूर्वी सरकार स्थापन झाल्यापासून देशाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने सातत्याने काम केले आहे. आत्मनिर्भरतेच्या मंत्रानुसार देशांतर्गत उत्पादनावर भर देण्यात आला असून राजकोषीय तुटीवर लक्ष ठेवण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प युवा-शक्तीवर आधारित आहे. गरिबांवर सरकारचा मोठा भर राहील. अर्थसंकल्पात उत्पादकता वाढवण्यावर विशेष जोर दिला जाईल, असं निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. सुधारणा व उद्योगांबद्दल बोलताना अर्थमंत्र्यांनी चार महत्त्वाचे मुद्दे मांडले. हे मुद्दे खालीलप्रमाणे:>सरकारने आतापर्यंत 350 हून अधिक सुधारणा लागू केल्या आहेत.>डी-रेग्युलेशनसाठी राज्य सरकारांसोबत समन्वयाने काम सुरू आहे.>पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि उद्योगांना चालना.>बायो-फार्मा क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची योजना.इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी 22 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. यंदा ही तरतूद जवळपास दुप्पट करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. बायो-फार्मा मॅन्युफॅक्चरिंग हबसाठी काम सुरूच राहणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पुढील 5 वर्षांसाठी बायो-फार्मा क्षेत्रासाठी सुमारे 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आळी आहे.
Budget 2026 Union Budget Nirmala Sitharaman Railway Budget News Budget 2026 News Income Tax अर्थसंकल्प अर्थसंकल्प 2026 केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन रेल्वे अर्थसंकल्प बातम्या अर्थसर्थ कं ल्प 2026 बातम्या Mumbai Pune High Speed Railway
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
राजस्थान में जर्जर स्कूल भवन गिराए जाएंगे,थर्ड पार्टी ऑडिट होगा: नेता प्रतिपक्ष बोले- SIR में फर्जी फॉर्म क...Rajasthan Vidhan Sabha Budget Session 2026 Live. Follow Rajasthan Assembly Budget Session Latest News And Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
UP News Live: लखनऊ के स्कूल में छात्र की आंख फोड़ी, मथुरा में 300 घरों पर चलेगा बुलडोजर, पढ़ें यूपी की बड़ी...- Uttar Pradesh News:up latest and breaking news today live updates crime politics budget 2026 aaj ke taza samachar
Read more »
UP News Live: लखनऊ के स्कूल में छात्र की आंख फोड़ी, मथुरा में 300 घरों पर चलेगा बुलडोजर, पढ़ें यूपी की बड़ी...- Uttar Pradesh News:up latest and breaking news today live updates crime politics budget 2026 aaj ke taza samachar
Read more »
Union Budget 2026: আশা-প্রত্যাশার মধ্যে কেন্দ্রীয় বাজেট! ভোটমুখী বাংলার জন্য থাকবে বড় ঘোষণা?union budget 2026 live updates fm nirmala sitharaman speech defence railway agriculture budget latest news in bengali
Read more »
Budget 2026: आजादी के कितने दिन बाद पेश हुआ था पहला बजट, कौन था भारत का पहला वित्त मंत्री?history of budget, Budget 2026 Updates, Budget History: आज 1 फरवरी 2026 को वित्त मंत्री निर्मला सीतारमण संसद में यूनियन बजट 2026-27 पेश कर रही हैं.
Read more »
Gold Price Fall: বাজেটেই সুখবর? সোনার দামে অস্বাভাবিক পতন! কত শতাংশ কমছে শুল্ক? প্রতি ১০ গ্রামে সোনা-রুপোর দাম কমবে...Union Budget 2026: Gold, Silver price fall 9 percent After Global Overnight Sell-Off Ahead Of Union Budget 2026
Read more »
