BMC Election 2026 : महाराष्ट्रात सध्या निवणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतील निवडणुकांमध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली असून Election Commission पर्यंत पोहोचली खबरबात...
BMC Election 2026 : निवडणूक अधिकाऱ्याची कृती अयोग्यच होती, असं म्हणत कुलाब्यातील उमेदवारी अर्जांच्या गोंधळावरून अहवाल सादर केला आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करून न घेणे अयोग्य असल्याचं अहवालामध्ये म्हटलं गेल्यानं आता आयोग या प्रकरणावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
निवडणूक अधिकाऱ्यांची कृती कायदेशीर असली तरी अव्यवहरिक आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य, म्हणत टोकन क्रमांक मिळूनही अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याने उमेदवारांकडून निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा उमेदवारांचा आरोप. सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज फेटाळले गेल्याचा इतर उमेदवारांचा दावा आहे. त्यामुळं कुलाब्यातील हे प्रकरण सध्या मुंबई मनपा निवडणुकाच्या दृष्टीनं अनेकांच्याच नजरा वळवत आहे. कुलाबा मतदारसंघात अर्ज दाखल करतेवेळी नेमकं काय घडलं होतं?महापालिका निवडणुकांचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, जे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी कुलाब्यात गेले होते, त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून वेळ संपल्याचं कारण देत तुम्ही 5 वाजल्यानंतर आलात असं म्हणत अर्ज दाखल करण्यास नकार देण्यात आला. निवडणूक आयोगाच्या या सर्व कृतीविरोधात उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. ज्यानंतर याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला असून, अधिकाऱ्यांची कृती कायदेशीररित्या योग्य मात्र तांत्रिकदृष्ट्या अयोग्य होती असं म्हटलं गेलं आहे. सदर घटनेतील आणखी एक बाब म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर हेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या दबावामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी ही कृती केल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला होता, त्याबाबतचे काही व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले होते. या सर्व अनुषंगानं आता हा अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यावर आता निवडणूक आयोग त्यावर कोणती कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. निवडणूक आयोगावरील आरोपावरुन जेडीएसचा यूटर्न... दरम्यान, नार्वेकरांचं नाव असणारी आणखी एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जिथं, निवडणूक आयोगावरील आरोपावरुन जेडीएसचा यूटर्न. राज्य निवडणूक आयुक्तांना जेडीएसचं पत्र. गैरसमज दूर, आयुक्त दिनेश वाघमारेंना पत्र. कुठलीही तक्रार नसल्याचं जेडीएसचं स्पष्टीकरण येताच राजकीय वर्तुळात अनेकांनी भुवया उंचावल्या. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात तक्रार केली. प्रत्यक्षात हरिभाऊ राठोडांकडून नार्वेकरांविरोधात तक्रार राठोड यांचा मुलगा जेडीएसकडून अर्ज भरणार होता. मात्र अवघ्या दोनच दिवसात जेडीएसचा यूटर्न पाहायला मिळत आहे.
Rahul Narwekar Reacts On Threatening Allegations Opposition Candidates In Bmc Election 2026 Rahul Narvekar Sanjay Raut Rahul Narvekar Bmc Election Rahul Narvekar Harshita Narvekar राहुल नार्वेकर मराठी बातम्या राहुल नार्वेकर महानगरपालिका राहुल नार्वेकर हर्षिता नार्वेकर उमेदवारी राहुल नार्वेकर मुंबई महानगर पालिका निवडणूक 2026 Bmc Election Bmc बीएमसी निवडणूक Mumbai Municipal Corporation बृहन्मुंबई महानगरपालिका Municipal Corporation Election Maharashtra Municipal Election Local Body Election Mahanagar Palika Election Maharashtra महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक मनपा निवडणूक
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
BMC Election 2026 : महत्त्वाचं! भाजपकडून मुंबईत सर्वाधिक गुजराती-मारवाडी उमेदवार, तर शिवसेना- मनसेनं...BMC Election 2026 : काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडून किती गुजराती-मारवाडी उमेदवार? पाहा मतदारांसाठी महत्त्वाची बातमी...
Read more »
West Bengal Assembly Election 2026: কে পারবে, না পারবে... শুভেন্দুতে সুর নরম! ব্যাকফুটে ডিফেন্স খেললেন দাবাং দিলীপ! বললেন, পার্টি...Dilip Ghosh controversy remark on Suvendu Adhikari after comeback in Bengal BJP before West Bengal Assembly Election 2026
Read more »
मैं छाती ठोककर बोलता हूं, मुंबई का मेयर मराठी-हिंदू होगा, BJP-शिवसेना की रैली में गरजे सीएम फडणवीसMumbai BMC Election 2026: महाराष्ट्र की राजधानी मुंबई में बीएमसी चुनावों के लिए शनिवार को बीजेपी-शिवसेना की संयुक्त रैली हुई। इस रैली में फडणवीस ने ठाकरे ब्रदर्स को निशाने पर लिया। फडणवीस ने कहा कि मुंबई का मेयर मराठी और हिंदू होगा। उन्होंने यह भी कहा कि 16 जनवरी को महायुति की महाजीत...
Read more »
उद्धव बोले- बीजेपी वोट चुराने के बाद उम्मीदवार चुरा रही: लोकतंत्र पर अब भीड़तंत्र का कब्जा; 20 साल बाद शिवस...Maharashtra Municipal Corporation Election 2026 Politics Update; Follow MNS Shiv Sena UBT Manifesto, BJP, Uddhav Thackeray, Raj Thackeray Devendra Fadnavis Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
बांग्लादेश में हिंदू नेता के चुनाव लड़ने पर रोक: शेख हसीना की सीट से गोविंद का नामांकन खारिज, RSS से जुड़े; ...Bangladesh Hindu Leader Election 2026 Controversy; बांग्लादेश में अल्पसंख्यकों पर बढ़ रहे अत्याचारों के बीच, एक हिंदू नेता को चुनाव लड़ने से रोक दिया गया है। निर्दलीय प्रत्याशी गोबिंद चंद्र प्रमाणिक
Read more »
West Bengal Assembly Election 2026: ভোটটা দিতে হবে পদ্মফুলে, লক্ষ্মীর ভাণ্ডার পাওয়া মহিলাদের ঘরবন্দি করার নিদান!BJP leader Kalipada Sengupta comment on the women who takes Lokkher Bhander
Read more »
