Nashik Kumbh Mela 2026 Funds Of 21 crore: कुंभमेळा म्हणजे विकास नाही, कुंभमेळा म्हणजे नाशिकबाबत भाजपने केलेली वचनपूर्ती नाही हे नाशिककरांनी समजून घेतले पाहिजे.
Nashik Kumbh Mela 2026 Funds Of 21 crore: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी गिरीश महाजन खिशात घेऊन बसले, पण हे सर्व पैसे शेवटी गुजरातच्याच ठेकेदारांकडे जातील, असं खळबळजनक विधान राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
सामनामधील रोखठोक या सदरातील लेखातून राऊतांनी ही टीका केली आहे.बहुतेक सर्व ठेके गुजरातच्याच लोकांनानाशिकच्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने 25 हजार कोटींचे बजेट मंजूर केले आहे. प्रयागराज कुंभमेळ्याचे बजेट 20 हजार कोटी होते. रस्ते, स्वच्छता, नदीतल्या बोटी, सुरक्षा, साधूंची व्यवस्था, श्रद्धाळूंची व्यवस्था यावर हा खर्च होतो. प्रयागराजमधील या सर्व कामांचे ठेके गुजरातच्या लोकांना मिळाले. हे ठेके गुजरातच्याच लोकांना मिळावेत यासाठी उत्तर प्रदेश प्रशासनावर दबाव होता. आता नाशिकच्या कुंभमेळ्याचे सूत्रधार मंत्री गिरीश महाजन आहेत. 25 हजार कोटी कुंभमेळ्याचे म्हणून त्यांच्या खिशात आहेत. नाशकातदेखील सध्या गुजरातच्या ठेकेदारांचा वावर वाढला आहे. म्हणजे नाशिक कुंभमेळ्याचे बहुतेक सर्व ठेके गुजरातच्याच लोकांना दिले जातील, असं राऊत यांनी म्हटलं आहे.कुंभमेळ्याचे अर्थशास्त्र हे कमिशनबाजी, भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेमहाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन व त्यांचे लोक या ठेक्यातून फार तर मोठी टक्केवारी वसूल करतील. कुंभमेळा नाशकात, बजेट महाराष्ट्र सरकारचे, पण हा सर्व पैसा शेवटी गुजरातचे ठेकेदार घेऊन जाणार आहेत. श्रीरामाच्या पावन भूमीत मराठी माणसाच्या हाती काहीच पडणार नाही. कुंभमेळ्याचे अर्थशास्त्र हे कमिशनबाजी, भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकले आहे आणि धर्माच्या नावाखाली हे चालवून घेतले जाते, असं राऊत म्हणालेत.नक्की वाचा >>कुंभमेळा नाशिककरांवर संकट बनून कोसळला, राऊतांचा BJP वर घणाघात; सिंहस्थाच्या नशेने...9 कोटींचं काम 300 कोटींचं टेंडरकुंभमेळ्याच्या पैशांवर भाजपला राजकारण करायचे आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ठेकेदारीवर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या आहेत. कुंभमेळा म्हणजे विकास नाही, कुंभमेळा म्हणजे नाशिकबाबत भाजपने केलेली वचनपूर्ती नाही हे नाशिककरांनी समजून घेतले पाहिजे. ज्या गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याचे मंत्री केले आहे ते 25 हजार कोटी रुपये घेऊन गुजराती ठेकेदारांच्या गोतावळ्यात बसले आहेत. कुंभमेळ्यात कोणत्या पातळीवर भ्रष्टाचार सुरू झाला ते सीसीटीव्हीच्या एका टेंडरवरून समोर आले. सीसीटीव्हीचे काम नऊ कोटींचे, पण ते सरळ 300 कोटींवर नेऊन आपल्या ठेकेदारांना टेंडर दिले. प्रत्येक कामात आता हेच घडणार व याच पैशांवर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवून ‘धर्मध्वजा’ फडकवली जाणार. संपूर्ण देशात यापेक्षा वेगळे काही चाललेले दिसत नाही. राम-रावण युद्धात सत्याचा विजय झाला, पण आता भाजपने श्रीरामांचे सरळ अपहरण केले व रावणाच्या मार्गाने देशाला नेत आहे. धर्मध्वज वगैरे ढोंग आहे.
Slams BJP Nashik Kumbh Mela 2026 Religion Based Politics
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Hong Kong Fire: હોંગકોંગની ભીષણ આગમાં મૃત્યુઆંક 94 સુધી પહોંચ્યો, 300 લોકો હજુ પણ ગૂમHong Kong Residential Building Fire: હોંગકોંગના તાઈ પો વિસ્તારમાં એક રહેણાંક કોમ્પલેક્સમાં લાગેલી ભીષણ આગે અત્યાર સુધીમાં 94 લોકોના જીવ લીધા છે. જ્યારે હજુ પણ 300થી વધુ લોકો ગૂમ છે. જાણો વધુ વિગતો.
Read more »
सरकारी कर्मचारियों को 25% छूट पर मिलेगा DDA का फ्लैट, दिसंबर से होगी बुकिंगडीडीए सरकारी कर्मचारियों को किफायती दाम पर फ्लैट ला रही है, जिसकी बुकिंग जल्द ही शुरू होने वाली है. इस योजना के तहत, सरकारी कर्मचारियों को HIG, MIG, और EWS श्रेणियों के आवासों पर 25% की महत्वपूर्ण छूट मिलेगी.
Read more »
पंजाब कैबिनेट का बड़ा फैसला, सरकारी अस्पतालों में अब मिलेंगे 300 सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरPunjab News: जिन श्रेणियों में डॉक्टरों को एम्पैनल किया जाएगा, उनमें मेडिसिन, पीडियाट्रिक्स एवं टीबी, सर्जरी, गायनेकोलॉजी, शामिल हैं. राज्य। पंजाब
Read more »
पंजाब कैबिनेट ने बेहतर स्वास्थ्य के लिए उठाए महत्वपूर्ण कदम, 300 स्पेशलिस्ट डॉक्टरों को लिस्टेड कियापंजाब को-ऑपरेटिव सोसायटीज नियम, 1963 के तहत एकसमान अनुशासनात्मक एवं अपीलीय ढांचे को मंजूरी मिल गई है. कैबिनेट ने पंजाब को-ऑपरेटिव सोसायटीज नियम, 1963 के अंतर्गत नियम 28ए यानी एकसमान अनुशासनात्मक एवं अपीलीय ढांचे को भी मंजूरी दे दी है.
Read more »
सैन जोस खजाने की खोज: 300 साल बाद फिर चर्चा में डूबा जहाजकैरेबियन सागर में डूबे हुए स्पेनिश जहाज सैन जोस से कोलंबियाई पुरातत्वविदों ने पहली बार खजाने की बरामदगी की है। 1708 में डूबा यह जहाज लगभग $20 बिलियन से अधिक के सोने, चांदी और पन्नों के खजाने के लिए जाना जाता है। इस खोज ने अंतरराष्ट्रीय स्तर पर विवाद खड़ा कर दिया है, जिसमें कोलंबिया सरकार और एक अमेरिकी बचाव कंपनी, सी सर्च आर्माडा (SSA) के बीच अधिकारों को लेकर कानूनी लड़ाई शामिल है।
Read more »
इंडोनेशिया में बाढ़ का कहर, मृतकों की संख्या 300 के पारइंडोनेशिया में बाढ़ का कहर, मृतकों की संख्या 300 के पार
Read more »
