BJP Ashish Shelar Slams Thackeray Brothers MVA Over Muslim Double Voting: दुबार मतदान झाल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना भारतीय जनता पार्टीने कठोर शब्दांमध्ये सुनावलं असून थेट नाव घेत हल्लाबोल केलाय.
BJP Ashish Shelar Slams Thackeray Brothers MVA Over Muslim Double Voting: निवडणूक यंत्रणा, कर्मचारी यांवर दबाव टाकण्याचा उद्धव ठाकरे, राज ठाकरे व मविआचा प्रयत्न आहे असं म्हणत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुद्दाम विरोधकांकडून हिंदू आणि मराठी मतदारांचाच दुबार मतदार म्हणून उल्लेख केला जात असल्याचा दावा करत हा व्होट जिहाद असल्याचं म्हटलं आहे. लोकसभेत आम्हाला विजय मिळाला हे महाविकास आघाडीने मांडले. महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मते मिळाली. आम्हाला मिळाली 2 कोटी 48 लाख मते म्हणजे अंतर होते 2 लाखांचे! त्याच लोकसभा निवडणुकांमधील 31 मतदारसंघाच्या यादी पाहिली. या मोजक्या 31 विधानसभा अल्पसंख्याक मुस्लिम दुबार मतदार ही 2 लाख 25 हजार आहेत. मग तुम्ही व्होट चोरी केली? असा प्रश्न विचारायचा का? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे बोलताना शेलार यांनी, आम्ही अभ्यास करतोय, असं म्हणत भविष्यात अजून गौप्यस्फोट केले जातील असा सूचक इशारा दिला. या आमदारांचा राजीनामा मागणार का?ही दुबार नावे नसती तर तुमचा निकाल काय लागला असता?असा सवाल शेलार यांनी महाविकास आघाडीबरोबरच राज ठाकरेंना विचारला. अजून पुरावे हवे असतील तर देतो, मतदारसंघ व मतदारांची नावे राज ठाकरे तुम्ही घेतली. मी उत्तर देतो. रोहित पवार निवडून आले त्या मतदारसंघात 5 हजार मतदार हे मुस्लिम दुबार आहेत. नाना पटोले हे साकोलीतून निवडून आले 208 मतांनी. त्याच मतदारसंघात 400 हून अधिक मुस्लिम दुबार मतदार आहेत. त्यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. ...तर माझ्या भावाला निवडून आणला असता ना?संदीप क्षिरसागर यांच्या मतदारसंघात, जितेंद्र आव्हाड आमचे कसले? त्यांच्या मतदारसंघात 30 हजार दुबार मतदार आहेत. राज ठाकरे व उद्धव ठाकरे तुमच्या चष्माचा रंग आता हिरवा झाला आहे का? असा टोला शेलार यांनी लगावला. मुंबादेवीत 11 हजार दुबार मतदार आहेत. मालाड पश्चिम 6 हजार मतांनी अस्लम शेख निवडून आले, 17 हजार दुबार मते आहेत. माझा भाऊ पण होता तिथे, मतचोरी असती तर निवडून आणला असता ना, असं शेलार म्हणाले. दुबार मुस्लिम मतदारांबाबत वेगळा न्यायदुबार मतदार बडवणार हे हिंदू व दलित मतदारांची नावे घेऊन सांगणार. वांद्रे पूर्व पण आहे. यातील दुबार मुस्लिम मतदारांबाबत वेगळा न्याय का? त्यांची आरती ओवाळायची का? धुळ्यात लोकसभा निवडणुकीत 3 हजार मतांनी आमचा पराभव झाला. 67 हजार बीडमध्ये दुबार तर पंकजा मुंडेंचा पराभव 6 हजार मतांनी झाला. 16 हजार मतांनी वर्षाताई निवडून आल्या तर 39 हजार दुबार मतदार आहेत. वर्षाताई राजीनामा देणार का? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला. मुस्लिम दुबार मतांवर पांघरूणसंजय पाटील यांचा उद्धव ठाकरे राजीनामा घेणार का? राज ठाकरे भूमिका काय? ही सगळी मंडळी आहेत, यांच्या भूमिका आहे त्या मराठी मतदार हिंदू व दलित मतदार दुबार शोधण्याची आहे. मुस्लिम दुबार मतांवर पांघरूण घालण्याची आहे, असा आरोप शेलारांनी केला आहे. शेलार यांनी पुढे महाविकास आघाडीचे आमदार आणि त्यांच्या विजयी मतांची आघाडी व त्या मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतांची यादीच सादर केली. ही यादी खालीलप्रमाणे: >149 : मुंब्रा विधानसभा: जितेंद्र आव्हाड30,601 दुबार मुस्लिम मते>254 : माळशिरस विधानसभा : उत्तम जानकर4399 दुबार मुस्लिम मते>100 : घनसावंगी विधानसभा : राजेश टोपे11,751 दुबार मुस्लिम मतेकेवळ 2309 मतांनी येथे शिवसेना निवडून आली.>235 : लातूर शहर : अमित देशमुख20,613 दुबार मुस्लिम मते>178 : धारावी : ज्योती गायकवाड10,689 दुबार मुस्लिम मते>186 : मुंबादेवी : अमीन पटेल11,126 दुबार मुस्लिम मते>57 : उत्तर नागपूर : नितीन राऊत8342 दुबार मुस्लिम मते>162 : मालाड पश्चिम : अस्लम शेख17,007 दुबार मुस्लिम मतेते जिंकले 6227 मतांनी.>96 : परभणी : राहुल पाटील13,313 दुबार मुस्लिम मते>156 : विक्रोळी : सुनील राऊत3450 दुबार मुस्लिम मते.किमान सुनील राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती.>175 : कलिना : संजय पोतनीस6973 दुबार मुस्लिम मतेजिंकले 5008 मतांनी>158 : जोगेश्वरी पूर्व : अनंत नार6441 दुबार मुस्लिम मतेजिंकले 1541 मतांनी>29 : बाळापूर : नितीन देशमुख5251 दुबार मुस्लिम मते>159 : दिंडोशी : सुनील प्रभू5347 दुबार मुस्लिम मते6182 मतांनी जिंकले>242 : धाराशिव : कैलास पाटील11,242 दुबार मुस्लिम मतेभूमिका संशयास्पदमहाविकास आघाडी आणि ठाकरेंवर टीका करताना, यांची भूमिका संशयास्पद खालच्या स्तरावर निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नांची आहे. तुम्ही मविआ व मनसे यांनी एसआयआरला समर्थन द्या! दर मतदार यादी बाबत प्रामाणिक असाल तर समर्थन द्या! काँग्रेससारखी दुतोंडी भूमिका घेऊ नका. नागरिक जागरुक आहेत, असंही शेलार म्हणाले. आता भोईर, पाटील या हिंदू दलित...मुस्लिम दुबार पांघरुनाखाली ठेवायचा हा प्रयत्न आहे. आत्मपरिक्षण करा. तुमचा आलेख काय चाललाय. बिहारी मतदारांविरुद्ध तुम्ही भूमिका घेतली. मग हिंदी भाषिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. जैन व गुजरातीविरुद्ध आंदोलन केले. आता भोईर, पाटील या हिंदू दलित मतदारांविरुद्ध भूमिका मांडण्याचे पाप राज ठाकरे तुम्ही करताय. या थराला जाऊ नका. आमच्या विरोधात जा पण विचार वापसी करा, असा खोचक सल्ला शेलार यांनी राज ठाकरेंना दिला.
Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Raj Thackeray MVA Muslim Muslim Double Voting
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'राऊत काल रात्री रडत होते', BJP खवळली; 'जय शहांनी देशाचे नाव उंचावले, भांडूपमध्ये बसून...'India vs Pakistan BJP Slams Sanjay Raut: राऊत यांनी भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादववर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर भाजपाने राऊतांवर निशाणा साधलाय.
Read more »
'भारतातील हुकूमशहा घाबरले, लटपटू लागले व त्यांनी...', ठाकरे सेनेचा मोदींना टोला; 'भाजपची फजिती..'Sonam Wangchuk Arrest Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: चीनच्या घुसखोरीवर देशाला जागे करणारे, पर्यावरणाची व हिमालयात उभे असलेल्या भारतीय सैनिकांची काळजी वाहणारे वांगचुक यांना मोदी सरकार देशद्रोही ठरवते.
Read more »
Mamata Bandyopadhyay: প্রধানমন্ত্রীকে বলব, সবসময় অমিত শাহকে বিশ্বাস করবেন না, উনি একজন বড় মীরজাফর... ত্রিপুরা ইস্যুতে বিজেপিকে চাঁচাছোলা আক্রমণ মুখ্যমন্ত্রীর...Mamata Bandyopadhyay slams BJP and Amit shah on Tripura issue
Read more »
BJP ने राज्यसभा चुनाव के लिए प्रत्याशियों के नाम का एलान, एक मुस्लिम को भी बनाया उम्मीदवारBJP ने राज्यसभा चुनाव के लिए प्रत्याशियों के नाम का एलान, एक मुस्लिम को भी बनाया उम्मीदवार BJP announces candidates for Rajya Sabha elections, including a Muslim candidate
Read more »
राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? काँग्रेसच्या भूमिकेमुळे सगळी गणितं बदलणार, 'काही झालं तरी...'Congress on Thackeray Brothers: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होतील अशा चर्चा सुरु असताना काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Read more »
SIR in Bengal: হিন্দু গ্রামের ভোটার তালিকায় শুধুই মুসলিম নাম! বাংলায় SIR-এর শুরুতেই বিতর্ক...SIR in Bengal: Fake muslim names found in Hindu Village in Bankura BJP TMC Controversy
Read more »
