Congress on Thackeray Brothers: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होतील अशा चर्चा सुरु असताना काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Congress on Thackeray Brothers: राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत मविआतला अंतर्गत कलह उफळला आहे. मुंबई मनपा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हा मोठा दावा केला आहे.
आम्ही ठाकरेंसोबत जाणार नाहीत असं भाई जगताप यांनी जाहीर केलं आहे. आम्हाला उद्धव ठाकरेही नको आणि राज ठाकरेही नको असं भाई जगताप यांनी सांगून टाकलं आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसाठी मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. याआधी संजय राऊत यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्यास विरोध करत असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली होती. भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, आम्ही अजिबात यांच्यासोबत लढणार नाही. राज ठाकरे सोडा आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा छातीठोकपणे हे सांगितलं आहे. ही कार्यकर्त्याची लढाई असून, त्याला ती लढू दे. आम्ही ना शिवसेनेसोबत गेलं पाहिजे, उद्धव ठाकरेंसोबत गेलं पाहिजे. राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही. मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार आणि लढलंच पाहिजे. आम्ही समितीसमोर हा मुद्दा मांडला आहे असंही त्यांनी जाहीर केलं आहे. सतेज पाटील यांनी भाई जगतापांच्या विधानावर भाष्य करताना म्हटलं आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय आहेत. स्थानिक पातळीवर निर्णय व्हावे अशी आमची अपेक्षा आहेत. निवडणुकीला अजून खूप वेळ आहे त्यामुळे अनेक घडामोडी घडतील. अनेक ठिकाणी युती होईल, अनेक ठिकाणी स्वतंत्र लढावे लागेल. मात्र महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचं उद्दिष्ट आहे. महायुतीमध्येदेखील अनेक गट आहेत. मनसेबद्दल अजून चर्चा सुरू आहे. अधिकृतपणे कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा एकत्र लढत होतो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही वेगवेगळे लढत होतो. त्यामुळे आता देखील काही ठिकाणी आघाडी होईल, काही ठिकाणी होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे काय म्हणाले?लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत अधिकाराचा वापर करत असतो. त्यांचा तो निर्णय असेल. त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा, विधानसभा महायुतीला मिळालेल्या मताधिक्याने आम्ही जिंकलो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या भगवा डौलाने फडकेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.
Bhai Jagtap Raj Thackeray Uddhav Thackeray Mns Shivsena
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
राज-उद्धव यांच्या पुढच्या भेटीत युतीवर शिक्कामोर्तब? नेमकं काय घडतंय?Thackeray Brother Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेटीगाठींचं सत्र सुरू आहे.
Read more »
धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजपाने साधला निशाणा
Read more »
शरद पवारांनी ‘उद्धव बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ करतोय’ असं म्हटलेलं का? प्रश्न ऐकताच परब म्हणाले...Balasaheb Thackeray Death Sharad Pawar Comment: बाळासाहेबांच्या मृत्यूसंदर्भात रामदास कदमांनी केलेल्या दाव्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचं थेट उत्तर
Read more »
Uddhav Thackeray : '50 खोके घेतले त्यांच्याकडे...तुम्ही तो चाबूक दिला', हंबरडा मोर्चातून महायुतीवर उद्धव ठाकरेंनी ओढला आसूडUddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची मोठी बातमी; राज ठाकरे मातोश्रीवर दाखल; दोघांमध्ये काय चर्चा?Raj Thackeray at Matoshree: राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहचले आहेत.
Read more »
ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारेbmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : कसा पुढे गेला ठाकरे बंधूंच्या भेटीला सिलसिला? जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या कारणानं झाली भेट?
Read more »
