Devendra Fadnavis On 72 Hours CM Post: मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना फडणवीसांना झाली पहाटेच्या शपथविधीची आठवण
Devendra Fadnavis On 72 Hours CM Post: मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना फडणवीसांना झाली पहाटेच्या शपथविधीची आठवण Devendra Fadnavis On 72 Hours CM Post: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते बुधवारी ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर - अॅन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान एक रंजक किस्सा घडला आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शैलीमध्ये भाष्यही केलं. कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांची ओळख करुन देताना त्याचा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते असा करण्यात आला. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभ्या राहिलेल्या फडणवीस यांनी ही चूक लक्षात आणून देताना पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली.राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तयार केलेले तलाव व भक्तीस्थळे यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर - अॅन इटरनल फ्लेम’ हे कॉफी टेबल बुक अतिशय सुंदर झाल्याचे सांगितले. तसेच या कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रती देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सर्व कॅबिनेट मंत्र्यांना आणि मुंबई व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांना पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.भाषणाची सुरुवात करताना फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते या उल्लेखावर आक्षेप घेतला."पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी माझा उल्लेख करताना मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो असं सांगण्यात आलं पण मी आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेलो आहे. माझं 72 तासाचं मुख्यमंत्रिपद, पहाटेचं हे तुम्ही जरी विसरले असला तरी मी विसरू शकत नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना,"अतिशय सुंदर असं कॉफी टेबल बुक बनवल्याबद्दल मी संपूर्ण टीमचा अभिनंदन करतो. आपल्याकडे त्यांचे फार काही फोटो नाहीत पण यामध्ये त्यांचे अतिशय सुंदर फोटो आहेत. मी फोटोग्राफरचे देखील अभिनंदन करतो आणि अमरीश मिश्रांसारखा सिद्ध लेखक असल्यानंतर ते उत्तमच होणार होतं आणि उत्तमच झालं आहे," अशा शब्दांमध्ये पुस्तकांचं कौतुक केलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोककल्याणाचे कार्य करत असतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पहिल्यांदा महिला सेनानींची तुकडी तयार केली, विविध कारागीर यांच्यासाठी तयार केलेल्या बाजारपेठेला राष्ट्रीय दर्जा देण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले, देशभरात पेशावरपासून रामेश्वरपर्यंत आणि कराचीपासून प्रयागराजपर्यंत व महाराष्ट्रामध्येही मंदिरांचे, घाटांचे पुनर्निर्माण करण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले, कावड यात्रेची परंपरादेखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुरु केली.” ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर - अॅन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल पुस्तकाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते आज ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर - अॅन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन… पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी चिरंतन आदर्श ठरावा यासाठी राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केले असून आता त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त व्यावसायिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, कवी प्रसून जोशी, कॉफी टेबल पुस्तकाचे लेखक-संपादक अंबरीश मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र बातम्या
Ahilyabai Holkar Lokmata Ahilyabai Holkar An Eternal Flame Devendra Fadnavis 72 Hours CM Post
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पतीला चोरांनी बेदम मारहाण करत लुटलं; 96 हजारांचा मुद्देमाल लंपास; तपासात धक्कादायक सत्य उघड, पत्नीने....एका पत्नीनं स्वत:च्याच पतीला लुटण्यासाठी आणि बेदम मारण्यासाठी 1200 रूपयांची सुपारी दिली.
Read more »
महाराष्ट्रातील सध्याच्या समिकरणांची मुहूर्तमेढ 'त्या' 72 तासांच्या काळात रोवली, फडणवीसांनी सर्वच सांगितलंCM Devendra Fadanvis: वरळी येथील जांभोरी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या कार्यक्रमात विद्यमान आणि सर्वच माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.
Read more »
Today Breaking News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवलीMaharashtra Breaking News LIVE Updates: राज्यासह महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया एका क्लिककर
Read more »
Maharashtra Breaking News LIVE Updates: डंपर पुलावरुन नदीत कोसळला कल्याणमध्ये भीषण अपघातLIVE Updates Maharashtra Mumbai Breaking News: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर...
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: राज्यात महायुतीच ब्रँड राहणार! महायुतीच्या नेत्याच्या दाव्याने नवी चर्चाBreaking News Live : बातम्यांचा वेगवान आढावा, फक्त एका क्लिकवर.
Read more »
IPL 2025: शतक ठोकलेल्या ऋषभ पंतला BCCI ने ठोठावला दंड; 'त्या' एका चुकीची संपूर्ण संघाला मोजावी लागली किंमतआयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेटच्या संबंधित संघाचा हंगामातील हा तिसरा गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
Read more »
