Marathwada Flood BJP Slams Uddhav Thackeray: मराठवाड्यातील पूराच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Marathwada Flood BJP Slams Uddhav Thackeray : मराठवाड्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी गावंच्या गावं पाण्याखाली गेली आहेत.
असं असतानाच राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून यामध्ये अगदी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबरच विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागील आठवड्यात मराठवड्याचा दौरा केल्यानंतर सरकारने पूरग्रस्तांना इतर खर्च टाळून मोठी मदत केली पाहिजे अशी मागणी केली आहे. पीएम केअरमध्ये हजारो कोटी रुपये पडून असून हा पैसा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली असतानाच आता भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंना एक खोचक सल्ला दिला आहे. तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजेभाजपाचे प्रवक्त्यांनी, उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना द्यावा! अशी मागणी केली आहे. मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांच सगळं उध्वस्त झालं आहे. त्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव,आता वेळ आहे कृती करायची… मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल, असं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे....लाखोंचा खर्च कशाला करायचा?शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचांराचे सोने लुटले जायचे, आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार, नुसताच थयथयाट अन् कांगावा… त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की, असा टोला भाजपाच्या प्रवक्त्यांनी लगावला आहे.काम कोण करतंय आणि नाटक कोण करतंय शेतकऱ्यांना...माझ्याकडे काही नाही म्हणत उद्धवजी रिकाम्या हातानेच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, अश्रू पुसायचं नाटक करुन रिकाम्या हातानेच मुंबईला परतले, असा टोला उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंनी दौरा केल्याच्या दिवशी आपल्या एक्स पोस्टमधून लागवला होता. काय तो वेग अन् काय तो तोरा, एका दिवसात केला पाच जिल्ह्यांचा दौरा, असंही त्यांनी म्हटलं होत. देवाभाऊंना नावं ठेवणं सोपं आहे, प्रत्येक गोष्टी खोडा घालण्याशिवाय तुम्ही अडीच वर्षे काय केले? असा सवालही त्यांनी विचारला होता. काम कोण करतंय आणि नाटक कोण करतंय शेतकऱ्यांना कळतंय. तुमच्या नाटकाला ते फसणार नाहीत, खोट्या अश्रूंनी त्यांची मनं विरघणार नाहीत, असंही उपाध्ये म्हणाले होते.
Marathwada Flood BJP Uddhav Thackeray Cancle Dasara Melava Farmers
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
काँग्रेसला काय जाब विचारता? ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदींना सवाल; 'तुम्ही वेळीच लक्ष दिले असते तर...'Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: लोकांना धर्म-जातीची अफू पाजून धुंद केल्याने छंदी-धुंदी लोक याही स्थितीत पंतप्रधान मोदींचे भजन करतात, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Read more »
‘उपकार करता का? अजित पवारांना मस्तीची...’; पूरग्रस्तांसमोर लाडक्या बहिणींचा उल्लेख करत ठाकरे कडाडलेUddhav Thackeray Slams Ajit Pawar: पूरग्रस्त भागाची पहाणी करताना अजित पवारांनी केलेल्या एका विधानावरुन उद्धव ठाकरे चांगलेच खवळल्याचं दिसून आलं.
Read more »
'जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा', म्हणत BJP ने शेअर केला ठाकरेंचा 'तो' Video; म्हणाले, 'ओल्या..'Maharashtra Rains Marathwada Flood: उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा व्हिडीओ भाजपाने शेअर केला असून या व्हिडीओमधून त्यांनी राऊतांना लक्ष्य केलंय.
Read more »
Maharashtra Marathwada Flood Crisis: मराठवाड्यातील पूरस्थितीत महिलांपुढं भीषण संकट; केली 'ही' मागणीMaharashtra Marathwada Flood Crisis: मराठवाड्यातील पूरस्थितीमुळं शेतकरी बेजार झाला असतानात आता इथं आरोग्यविषयक संकटानं डोकं वर केलं असून महिला त्यात कैक अडचणींचा सामना करताना दिसत आहेत.
Read more »
बाबो... 373% पाऊस! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मोडले सर्व विक्रम; तर मराठवाड्यात...Marathwada Flood Live updates: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ५० टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या 50 वर्षात असा पाऊस कधीच कोसळला नाहीये.
Read more »
पुण्यातील भाजीविक्रेत्याची माणुसकी! पूरग्रस्तांसाठी स्वतःच्या रोजच्या बचतीतून 'लाख'मोलाची मदत, मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चेकMaharashtra Marathwada Flood: चार तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीत शनिवारी 63 गावांचा संपर्क तुटला आहे.
Read more »
