'जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा', म्हणत BJP ने शेअर केला ठाकरेंचा 'तो' Video; म्हणाले, 'ओल्या..'

Maharashtra Rains News

'जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा', म्हणत BJP ने शेअर केला ठाकरेंचा 'तो' Video; म्हणाले, 'ओल्या..'
Marathwada FloodBJPVideo
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 108 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Maharashtra Rains Marathwada Flood: उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा व्हिडीओ भाजपाने शेअर केला असून या व्हिडीओमधून त्यांनी राऊतांना लक्ष्य केलंय.

Maharashtra Rains Marathwada Flood : अतीवृष्टीचा आणि पूराचा फटका बसलेल्या मराठवड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुरुवारी दौरा केला. या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

यावेळेस त्यांच्यासोबत पक्षाचे खासदार संजय राऊतही होते. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान त्यांची सोबत केलेल्या संजय राऊतांचा एक व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने शेअर करत, जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा असा टोला लगावला आहे. ठाकरेंच्या दौऱ्यातील एक व्हिडीओ शेअर करत भाजपाने राऊत शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील नसल्याचा आरोप केलाय.काय आहे व्हिडीओत उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली. त्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पहाणी केली. वाटेत जिथे जिथे शेतकरी उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला हात दाखवत होते तिथे उद्धव ठाकरेंनी ताफा थांबवून शेतकऱ्यांशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी रस्त्यात ताफा थांबवून शेतकऱ्यांशी संवाद साधतानाचा आणि निवेदनं स्वीकारतानाचा व्हिडीओ भाजपाने पोस्ट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हटलंय भाजपाने जाणून घेऊयात...भाजपाने काय म्हटलंय?उद्धव ठाकरे कारबाहेर उभे राहून शेतकऱ्यांशी बोलताना राऊत कारमध्येच बसल्याचं भाजपाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे. संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे! अशा मथळ्याखाली भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंच्या धाराशीव दौऱ्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे गेले असताना जनाब संजय राऊत हे गाडीत बसून काजू बादाम खात होते, असा आरोप बन यांनी केला आहे.साधं सौजन्यही तुम्ही...शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटण्यापेक्षा मर्सिडिज कारमध्ये बसून काजू बादाम खाणं राऊतांना जास्त महत्वाचं वाटतं? असा सवाल बन यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना मदत करायची नाहीच पण गाडीतून उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं साधं सौजन्यही तुम्ही दाखवू शकत नाहीत. जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा! असा टोला बन यांनी लगावला आहे.संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे!ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे गेले असताना जनाब संजय राऊत हे गाडीत बसून काजू बादाम खात होते.शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटण्यापेक्षा मर्सिडिज कारमध्ये बसून काजू बादाम खाणं राऊतांना जास्त महत्वाचं वाटतं?शेतकऱ्यांना मदत… pic.twitter.com/5Bdv5y5z9e— Navnath Kamal Uttamrao Ban September 26, 2025कर्जमाफी घेणारचदरम्यान, उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यामध्ये कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. प्रसंगी येथील शेतकऱ्यांसोबत आम्ही रस्त्यावर उतरु असा शब्द स्थानिकांना दिला आहे. सरकारने दिलेली मदत ही पुरेशी नसून आर्थिक मदतची रक्कम वाढवून देण्याची मागणी ठाकरेंनी केली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathwada Flood BJP Video Ex Cm Uddhav Thackeray Slams Sanjay Raut

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

दावा-वोटर लिस्ट में नाम जुड़वाने-हटाने का प्रोसेस बदला: वेरिफिकेशन के लिए आधार जरूरी; राहुल बोले- जब चोरी प...दावा-वोटर लिस्ट में नाम जुड़वाने-हटाने का प्रोसेस बदला: वेरिफिकेशन के लिए आधार जरूरी; राहुल बोले- जब चोरी प...Rahul Gandhi Election Commission Case; Follow EC Aadhaar-linked Online Voter Deletion Rule, Vote Chori, BJP Congress Latest News On Dainik Bhaskar.
Read more »

LIVE: चुनाव से पहले कांग्रेस का छलका EBC प्रेम, BJP ने लगाया तुष्टीकरण का आरोपLIVE: चुनाव से पहले कांग्रेस का छलका EBC प्रेम, BJP ने लगाया तुष्टीकरण का आरोपBihar Chunav 2025 Live: चुनाव से पहले कांग्रेस का छलका EBC प्रेम, BJP ने लगाया तुष्टीकरण का आरोप
Read more »

BJP Blames Congress Leader Tsepag For Ladakh Violence, Alleges He Was Part Of MobBJP Blames Congress Leader Tsepag For Ladakh Violence, Alleges He Was Part Of MobThe BJP has blamed Congress Councillor Phuntsog Stanzin Tsepag for leading the unrest in Ladakh, claiming he was part of the mob.
Read more »

भाजपा ने 3 राज्यों के लिए चुनाव प्रभारी नियुक्त किए: धर्मेंद्र प्रधान को बिहार, भूपेंद्र यादव को बंगाल और ब...भाजपा ने 3 राज्यों के लिए चुनाव प्रभारी नियुक्त किए: धर्मेंद्र प्रधान को बिहार, भूपेंद्र यादव को बंगाल और ब...Bharatiya Janata Party (BJP) Election In Charge List Update; Follow Bihar West Bengal Tamil Nadu Chunav Latest News On Dainik Bhaskar.
Read more »

BJP अपने मुंह फुलाए नेताओं से खूब पेश आती है, भोजपुर में उपजे तनाव से समझियेBJP अपने मुंह फुलाए नेताओं से खूब पेश आती है, भोजपुर में उपजे तनाव से समझियेबिहार विधानसभा चुनाव से पहले आरके सिंह और राजीव प्रताप रूडी जैसे नेता अपनी जमीन तलाशने में जुटे हुए हैं, क्योंकि बीजेपी में ये हाशिए पर पहुंचा दिए गए हैं - असल में, बागी हो रहे नेताओं से बीजेपी ऐसे ही पेश आती है.
Read more »

મંત્રીમંડળનું વિસ્તરણ ક્યારે થશે? પૂછવા પર હસતા હસતા દાદા-ભાઉએ વાત ટાળી દીધી, અને ઉભા થઈને જતા રહ્યાંમંત્રીમંડળનું વિસ્તરણ ક્યારે થશે? પૂછવા પર હસતા હસતા દાદા-ભાઉએ વાત ટાળી દીધી, અને ઉભા થઈને જતા રહ્યાંBJP Gujarat Press Conference : રાજ્યમાં આત્મનિર્ભર ભારત સંકલ્પ અભિયાનનો પ્રારંભ...મુખ્યમંત્રી ભૂપેન્દ્ર પટેલ અને CR પાટીલે સ્વદેશી માટે આપ્યો સંદેશ..કહ્યું, વોકલ ફોર લોકલથી દેશ બનશે આત્મનિર્ભર...
Read more »



Render Time: 2026-04-02 09:38:54