Marathwada Flood Live updates: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ५० टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या 50 वर्षात असा पाऊस कधीच कोसळला नाहीये.
Marathwada Flood Live updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यावर आस्मानी संकट कोसळलं आहे. मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस कोसळलाय त्यामुळं अनेक जिल्ह्यांना पुराने वेढलं आहे. मराठवाड्यात पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यात पुराने अक्षरशाः धुमाकुळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रात कित्येत वर्षात असं घडलं नव्हतं जे गेल्या आठवड्यात घडलं आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दुप्पट पाऊस कोसळला आहे. मराठवाड्यात 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 42.6 मिमी पाऊस अपेक्षित असतो मात्र येथे या कालावधीत तब्बल 107.9 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच 153 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात झाला असून, आठवड्याभरात तेथे 373 टक्के इतका पाऊस झाला आहे.मध्य महाराष्ट्रात 41.7 मिमी पाऊस अपेक्षित असतो. तेथे 70.3 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच 69 टक्के अधिक पाऊस पडला आहे. विदर्भात मात्र या कालावधीत कमी पाऊस पडला आहे. तेथे 30.4 मिमी पाऊस अपेक्षित असला तरी 22 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच 28 टक्के पावसाची तूट आहे. संपूर्ण राज्यात 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 42.8 मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, 67.7 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच संपूर्ण राज्यात 58 टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.मराठवाड्यातील पावसाची आकडेवारीमराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. तेथे 376 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात 187 टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. सोलापूर येथे 165 टक्के, अहिल्यानगर 161टक्के, छत्रपती संभाजीनगर 125 टक्के, जळगाव 108 टक्के, हिंगोली 143 टक्के, लातूर 139 टक्के, नांदेड 82 टक्के, परभणी 72 टक्के, नाशिक 89 टक्के तर धुळे येथे 50 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. धुळे वगळता इतर सर्व जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट कायममराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट कायम असून हवामान विभागाने शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी विभागातील आठही जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. 27 तारखेला सकाळी आठ वाजेपासूनच पावसाला सुरुवात होणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला पावसाने झोडपले असून मनुष्यहानीसह, पशुधनहानी आणि पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे.
Maharashtra Flood Live Updates Marathwada News Today Maharashtra Rain Updates Maharashtra Rain Update Rain Update Live मराठवाडा पूर मराठवाडा पूर परिस्थिती
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Jammu Kashmir Flood LIVE: जम्मू-कश्मीर के सभी जिलों में भयंकर बारिश का ऑरेंज अलर्टJammu Kashmir Flood Live Updates: जम्मू-कश्मीर में भारी बारिश से जम्मू-पठानकोट राष्ट्रीय राजमार्ग बंद, पुल क्षतिग्रस्त, ट्रैफिक डायवर्ट, 100 साल का बारिश रिकॉर्ड टूटा, स्थानीय लोग और पर्यटक परेशान.
Read more »
राहुल गांधी पंजाब पहुंचे: अमृतसर एयरपोर्ट से अजनाला रवाना, बाढ़ पीड़ितों से मिलेंगे; गुरदासपुर-पठानकोट भी जाए...Congress Leader Rahul Gandhi Punjab Flood Affected Visit Live Update. Follow Amritsar Gurdaspur Pathankot Rainfall Flood Latest News And Updates On Dainik Bhaskar.
Read more »
Kangana Ranaut: আমার রেস্তোরাঁয় মাত্র ৫০ টাকার বিক্রি হয়েছে! ১৫ লাখ বেতন দিতে হবে!, বন্যাদুর্গতদের নিজের কষ্ট দেখালেন কঙ্গনা...Kangana Ranaut said himachal flood victim that Restaurant Made rupees 50 Understand My Pain
Read more »
373 अरब डॉलर की संपत्ति, 95% संपत्ति को दान करने के लिए तैयार; कौन है यह शख्स?Elon Musk Networth: एलन मस्क के बाद दुनिया के दूसरे सबसे अमीर शख्स लैरी एलिसन ने अपनी संपत्ति का 95 प्रतिशत हिस्सा दान करने की बात कही है. 373 बिलियन डॉलर के मालिक एलिसन का नाम दुनिया के प्रमुख दानकर्ताओं में शामिल हो गया है.
Read more »
'जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा', म्हणत BJP ने शेअर केला ठाकरेंचा 'तो' Video; म्हणाले, 'ओल्या..'Maharashtra Rains Marathwada Flood: उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा व्हिडीओ भाजपाने शेअर केला असून या व्हिडीओमधून त्यांनी राऊतांना लक्ष्य केलंय.
Read more »
Maharashtra Marathwada Flood Crisis: मराठवाड्यातील पूरस्थितीत महिलांपुढं भीषण संकट; केली 'ही' मागणीMaharashtra Marathwada Flood Crisis: मराठवाड्यातील पूरस्थितीमुळं शेतकरी बेजार झाला असतानात आता इथं आरोग्यविषयक संकटानं डोकं वर केलं असून महिला त्यात कैक अडचणींचा सामना करताना दिसत आहेत.
Read more »
